Parenting Tips Saam Tv
लाईफस्टाईल

Parenting Tips : तुमचे मुलंही शाळेत जाण्यास रडते ? या ५ टिप्स फॉलो करा, मुलांना लागेल शाळेत जाण्याची गोडी

How To Help Your Kid Wake Up Happy : तुमची मुले देखील शाळेत जाण्यास रडरड करतात तर पालकांनी काही गोष्टींची काळजी घ्यायला हवी.

कोमल दामुद्रे

5 Tips To Wake Up Kids : वातवरणातील गारव्यामुळे हल्ली प्रत्येकालाच अथंरुण सोडण्याची इच्छा होत नाही. बाहेर कोसळणाऱ्या पावसामुळे आपल्याला घराबाहेर पडण्याचे नकोसे वाटते. उन्हाळ्याच्या सुट्टीतनंतर आता अनेक मुलांच्या शाळा सुरु होऊन १५ दिवस उलटून गेले तरीही तुमची मुले देखील शाळेत जाण्यास रडरड करतात तर पालकांनी काही गोष्टींची काळजी घ्यायला हवी.

खरेतर मुलांना सकाळी लवकर उठण्याचा कंटाळा येतो. त्यांची झोप पूर्ण होत नाही त्यामुळे ते अधिक चिडचिड करतात व शाळेत जाण्यास नाटक करु लागतात. पालकांना या ५ टिप्स फॉलो केल्यास मुलांना शाळेत जाण्याची आवड लागेल. तसेच ते स्वत: शाळेत जाण्यास पुढाकार घेतील. जाणून घेऊया त्याबद्दल सविस्तर

1. पुरेशी झोप

मुलांनी (Child) पुरेशी झोप घेतली पाहिजे जेणेकरून ते कोणत्याही अडचणीशिवाय वेळेवर उठतील. खूप आवाज, घोरणे, अधिक प्रकाश, रात्री उशिरा झोपणे, खूप व्यायाम करणे, झोपायच्या आधी स्क्रीन वेळ, संध्याकाळी किंवा झोपेच्या वेळी जास्त कॅफिन आणि साखरयुक्त पदार्थांचे सेवन करणे झोपेवर परिणाम करू शकते. लहान मुलांना सुरक्षित आणि आरामदायक वाटेल अशा वातावरणात झोपावे.

2. दिनक्रम ठरवा

मुलांना स्वतः तयार होण्याची सवय लावा. ज्यामुळे त्यांना स्वत:ची कामे स्वत: करण्यास आवड निर्माण होईल. तसेच तुमचे मुलं तुमच्यावर अवलंबून राहाणार नाही.

3. महत्त्व

त्यांना शाळेत (School) का जावे हे देखील सांगा. त्याचे महत्त्व पटवून द्या. तसेच ते का रडतात त्यांना शाळा का आवडत नाही याबद्दलही त्यांना विचारा. यामुळे ते तुमच्याशी संवाद साधतील. बरेचदा मुलांना बाहेरील वातावरणात वेळ (Time) घालवायला आवडत नाही.

4. आवडीचे पदार्थ

मुलांना शाळेत पाठवताना टिफिनमध्ये पौष्टिक पण त्यांच्या आवडीचे पदार्थ द्या. त्यामुळे त्यांना शाळेत जाण्याची व हेल्दी पदार्थ खाण्याची आवड लागेल.

5. व्यायाम

मुलांनी रोज किमान अर्धा तास व्यायाम करावा. यामुळे त्यांना रात्रीची झोपही चांगली मिळण्यास मदत होईल. तुम्ही मुलांना सकाळी उठल्यानंतर हलका व्यायाम करण्याची सवय लावू शकता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

माणिकराव कोकाटे सभागृहात किती वेळ रम्मी खेळत होते? रोहित पवारांनी वेळेचा आकडाच सांगितला|VIDEO

Rajnikanth News : रजनीकांत वर्तमानपत्र उचलायला वाकले अन् तोंडावर आपटले; चाहत्यांची चिंता वाढली

ITR 2025: आयटीआर ३ फॉर्म आता ऑनलाइन पाहता येणार, आयकर रिटर्न भरण्याची सोपी पद्धत काय? वाचा...

Maharashtra Tourism: नैसर्गिक सौंदर्य अन् नयनरम्य परिसर... धुळे जिल्ह्यातील 'ही' सुंदर ठिकाणं कधी पाहिलीत का?

Maharashtra Live News Update: ठाण्यात कंपनीची सुरक्षा भिंत कोसळली

SCROLL FOR NEXT