Dark Circles
Dark Circles  saam tv
लाईफस्टाईल

Dark Circles : डोळ्यांखाली काळी वर्तुळे का येतात? घरगुती उपाय करुन पाहा, दिसाल अधिक सुंदर

कोमल दामुद्रे

Remove Dark Circles :

चेहरा हा माणसाचा आरसा असतो. चेहऱ्याचे सौंदर्य टिकून राहाते ते डोळ्यांमुळे. परंतु, हल्ली याचे सौंदर्य बिघडत चालले आहे. डोळ्यांखाली काळी वर्तुळे ही केवळ महिलांसाठीच नाही तर पुरुषांसाठी मोठी समस्या बनत चालली आहे.

सतत स्क्रीन पाहाणे, कमी झोप, टेन्शन आणि इतर कारणांमुळे असे होऊ शकते. जेव्हा डोळ्यांखाली काळी वर्तुळे दिसू लागतात. तेव्हा थकलेले आणि वृद्ध दिसू लागतात. डोळ्यांखाली (Eye) येणारे काळी वर्तुळे ही झोप आणि थकवा यामुळे येते. डोळ्यांखाली काळी वर्तुळे कशी येतात. यावर घरगुती उपाय (Home Remedies) कसे करायचे जाणून घेऊया.

1. डोळ्यांखाली काळी वर्तुळे का येतात?

1. पौष्टिकतेची कमतरता

शरीरात लोह, व्हिटॅमिन (Vitamins) ए, सी, के आणि ई सारख्या पोषणाच्या कमतरतेमुळे डोळ्यांखाली काळी वर्तुळे तयार होतात. काळी वर्तुळे काढून टाकण्यासाठी डॉक्टरांचा सल्ला घ्या.

2. अॅनिमिया

शरीरात लोहाच्या कमतरतेमुळे काही वर्तुळे होतात. हे अशक्तपणाचे लक्षण मानले जाते. लोहाच्या कमतरतेमुळे शरीरात ऑक्सिजनची कमतरता होऊ शकते. त्यामुळे चेहऱ्यावर काळी वर्तुळे आणि सुरकुत्या येण्याची समस्या वाढू शकते.

3. थकवा आणि झोप

दिवसभराच्या थकव्यामुळे रात्री पुरेश झोप मिळत नसेल तर थकव्यामुळे चेहऱ्यावरील लहान शिरा काळया होऊ लागतात. त्यामुळे डोळ्यांखाली काळी वर्तुळे येऊ लागतात.

2. हे उपाय करुन पाहा

1. बटाटा

डोळ्यांखाली दिसणारी काळी वर्तुळे दूर करण्यासाठी बटाटा फायदेशीर ठरतो. हा उपाय करण्यासाठी बटाटाच्या रसामध्ये लिंबाचे काही थेंब मिसळा आणि कापसाच्या मदतीने डोळ्यांखाली लावा. असे केल्याने फायदा होईल.

2. कच्चे दूध

डोळ्यांखाली काळी वर्तुळे दूर करण्यासाठी कापसाच्या मदतीने कच्चे दूध लावा. असे दिवसातून दोनदा केल्याने आराम मिळेल.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ashvini Mahangade : नानांच्या एका सल्ल्याने आश्विनी महांगडेचं कसं आयुष्य बदललं? पोस्ट शेअर करत सांगितला किस्सा

NIA Raid: ब्रेकिंग! एनआयएकडून देशभरात ११ ठिकाणी छापेमारी; रामेश्वरम कॅफे प्रकरणात कारवाई

Today's Marathi News Live : अवकाळी पावसानंतर नंदुरबार जिल्ह्यात उष्णतेची लाट

Name Astrology: स्वभावाने प्रेमळ असतात या अक्षराचे लोक, बनतात चांगले पार्टनर

Team India Head Coach: टीम इंडियाचा हेड कोच निवडण्यासाठी एमएस धोनीवर मोठी जबाबदारी

SCROLL FOR NEXT