Relationship Tips Saam tv
लाईफस्टाईल

Relationship Tips: प्रेम विवाह करण्यासाठी पालकांकडून परवानगी कशी मिळवाल? फॉलो करा या टिप्स

Relationship Tips In Marathi: भारतात विवाह फक्त जोडप्यामध्ये नसतो, तर दोन कुटुंबामध्ये विवाह होतो, असं म्हटलं जातं. त्यामुळे भारतात प्रेम विवाह करण्यासाठी जोडप्याना त्यांच्या घरच्यांकडून परवानगी घ्यावी लागते. यासाठी जोडप्याच्या मनात भीती असते.

Vishal Gangurde

Relationship Tips in Marathi:

भारतात प्रेम विवाहाची भरपूर चर्चा होते. भारतात लग्न झालेल्या जोडप्याला पहिला प्रश्न विचारला जातो की, तुम्ही प्रेम विवाह केलं की अरेंज मॅरेज केलं आहे? भारतात विवाह फक्त जोडप्यामध्ये नसतो, तर दोन कुटुंबामध्ये विवाह होतो, असं म्हटलं जातं. त्यामुळे भारतात प्रेम विवाह करण्यासाठी जोडप्याना त्यांच्या घरच्यांकडून परवानगी घ्यावी लागते. यासाठी जोडप्याच्या मनात भीती असते. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

अनेक जोडप्याला त्यांच्या पालकांची लग्नासाठी परवानगी मिळवण्यासाठी वर्षानुवर्षे निघून जातात. तुम्हीही प्रेम विवाह करण्यास इच्छुक आहात, पण पालकांकडून लग्नासाठी परवानगी मिळविण्यास अवघड जात आहे, तर तुम्ही या टिप्स फॉलो करू शकता.

पालकांशी बोला - प्रत्येक मुलगा-मुलगी त्यांच्या पालकांशी भरपूर प्रेम करतो. पण काही घरात मुले-मली त्यांच्या पालकांशी अशा मु्द्द्यावर बोलण्यास घाबरत असतात. तुम्हाला प्रेम विवाह करायचा असेल तर तुम्हाला तुमच्या पालकांशी मैत्री करावी लागेल. त्यासाठी पालकांसोबत जास्त वेळ खर्च करावा लागेल.

लग्नाविषयी चर्चा करा - पालकांशी लग्नाविषयी चर्चा करताना मनात किंतु-परंतु ठेवू नका. पालकांकडे जाऊन थेट लग्नाविषयी चर्चा करा. त्यांच्या मनातील सून आणि जावयाबद्दलची कल्पना जाणून घ्या. तुम्ही देखील तुम्हाला कसा पार्टनर आवडतो, त्याबद्दल सांगा.

आई किंवा वडिलांना विश्वासात घ्या - तुम्ही लग्नाविषयी चर्चा करताना आई किंवा वडिलांना अधिक विश्वासात घ्या. तुम्ही त्यांना विश्वासात घेऊन तुमच्या पार्टनरची भेट घालून द्या.

नातेवाईकांची मदत घ्या- सर्वच नातेवाईक प्रेम विवाहाच्या विरोधात नसतात. प्रेम विवाहाला पाठिंबा देणाऱ्या काका-काकी किंवा मामा-मामींची मदत घ्या.

पार्टनरची भेट घालून द्या- तुम्ही ज्या पार्टनरशी प्रेम विवाह करणार आहे, त्या व्यक्तीची तुमच्या पालकांशी भेट घालून द्या. तुमच्या पार्टनरला तुमच्या कुटुंबातील सर्व सदस्यांची माहिती द्या. जेणेकरून आपल्या पार्टनरला नेमकं काय बोलायचं आहे, याची कल्पना येईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

दुष्काळग्रस्त भागांसाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय; कोणत्याही रेशन दुकानात मिळणार धान्य

Maharashtra News Live Update: भाजपने आणीबाणीलाही मागे टाकले, आशुतोष रांकांचा गंभीर आरोप

CNG कार चालकांचा थरकाप उडवणारी बातमी! धावत्या कारने अचानक घेतला पेट, चालकाचा जागीच कोळसा

Amravati Crime: इंजिनिअर मुलाचं आईसोबत भयंकर कृत्य, घरातील दृश्य पाहून सर्वजण हादरले

Kidney disease symptoms: किडनी निकामी होण्यापूर्वीच सावध व्हा; 'या' 3 टेस्ट देतील जीवनदान

SCROLL FOR NEXT