Child care, Baby care tips in Marathi, Parenting tips ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
लाईफस्टाईल

Baby Care Tips: ६ महिन्यांचा बाळाला अन्नपदार्थ कसे द्याल ? त्यात कोणते पदार्थ असायला हवे ?

६ महिने पूर्ण झाल्यानंतर बाळाला कोणते अन्नपदार्थ द्याल ?

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : बाळ जन्माला आल्यानंतर डॉक्टर आपल्याला आईचे दुध पाजण्यास सांगतात परंतु, आपल्या बाळाला सहा महिने पूर्ण झाल्यानंतर त्यांना कोणते पदार्थ द्यावे याबाबतीत नवख्या आईना बरेच प्रश्न पडलेले असतात. (Baby care tips in Marathi)

हे देखील पहा -

आपल्या घरातील आजी, आई, शेजारी किंवा डॉक्टर बाळाला कोणते पदार्थ द्यावे याविषयी सांगत असतात. काही तर बाजारात मिळणाऱ्या पदार्थांबद्दलही आपल्याला सांगतात. हल्ली बाजारात साठवून ठेवलेल्या पदार्थांवर बाळाच्या वाढत्या वयानुसार पदार्थ मिळतात. आपल्यापैकी बरेच पालक त्यांचा उपयोग करतात पण ते मुलांनासाठी योग्य आहे की, अयोग्य हे जाणून घेऊया.

१. ६ महिन्याच्या बाळाला घरचे पदार्थ खाऊ घालत असाल तर ते पचायला हलके असायला हवे. त्याला कोणतीही चव नसायला हवी. गोड पदार्थ त्यांना खाऊ घालू नका. बाळाला एकदा का गोडाची चव लागली की, ते इतर पदार्थ खाण्यास टाळाटाळ करु लागतात.

२. साल काढलेली मुगाची डाळ व तांदळाची पेच बनवून बाळाला खाऊ घाला. मुगाची डाळ ही पचण्यास हलकी असते त्यामुळे यांचे सेवन केल्यास बाळाला कोणताही त्रास होणार नाही. याचे पिठही आपण तयार करुन ठेवू शकतो त्यामुळे हव्या त्या वेळेला त्याचा आपल्याला वापर करता येईल.

३. बाळाला आपण शिजवलेले गाजर, रताळे व बटाटा देखील खाऊ घालू शकतो. गाजर व बटाट्यात अनेक पोषण तत्व असतात. ज्याचा मुलांच्या आरोग्यावर चांगल्यारित्या परिणाम होईल. बटाटा, रताळे किंवा गाजर मॅश करुन किंवा त्याची प्युरी करुन आपण त्यांना खाऊ घालावे.

४. बाळाला जास्त प्रमाणात हे पदार्थ (Food) खाऊ घालू नका. त्याची खाण्याची वेळ निश्चित करा. दिवसांतून दोन वेळा हे पदार्थ त्यांना खाऊ घाला.

५. ज्यावेळी आपल्या बाळाला (Baby) खाण्याची सवय लागेल तेव्हा त्यात काही पालेभाज्या व फळांचा समावेश करा. हे पदार्थ एकदम मऊ असायला हवे ज्यामुळे बाळाला खाताना अधिक त्रास होणार नाही.

५. पालक, बीट व लेट्युस हे पदार्थ शक्यतो बाळाला खाण्यास देऊ नका. बाळाच्या नाजूक पंचनसंस्थेला पचवणे जड जाते त्यामुळे हे पदार्थ देणे टाळा.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

Edited By - Komal Damudre

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Akash Deep : आकाश दीपने इंग्लंडमध्ये 'पंजा' खोलला, पाचव्या विकेटनंतर मैदानावरच रडू कोसळलं

Kiwi: किवी खाण्याचे 'हे' आरोग्यदायी फायदे माहितीये का?

Pandharpur to london wari : पंढरीची वारी लंडनच्या दारी; 70 दिवसांत विठुरायाची वारी पोहोचली लंडनला, फोटो पाहून उर भरून येईल

Classy Co-ord Set: ऑफिस किंवा कॉलेजसाठी ट्राय करा 'हे' क्लॉसी को-ऑर्ड सेट्स

Maharashtra Live News Update : पालघर जिल्ह्याला सोमवारी रेड अलर्ट, प्रशासनाकडून सुट्टी जाहीर

SCROLL FOR NEXT