Heart Attack Treatment x
लाईफस्टाईल

Symptoms of Heart Attack: महिनाभर आधीच दिसतात हार्ट अटॅक लक्षणं, या ५ संकेताकडे दुर्लक्ष करू नका

Early Symptoms: हार्ट अटॅक येण्याआधी शरीर १ महिन्याआधी संकेत देतं. छाती जड वाटणे, थकवा, श्वास घेण्यात त्रास, खांदा-हात दुखणे यासारखी लक्षणे दिसल्यास तज्ज्ञांचा सल्ला घ्या.

Sakshi Sunil Jadhav

हार्ट अटॅक हा लगेचच येत नाही, तर यामागे अनेक कारणं असतात. बऱ्याच वेळेस लोकांचा गैरसमज असतो की, हार्ट अटॅक येण्यापुर्वी काहीच लक्षणे जाणवत नाहीत. पण तुम्हाला माहितीये का? तुमचं शरीर हे हार्ट अटॅक येण्याच्या १ महिना आधीच काही संकेत देतं. त्यामुळे कोणतीही लक्षणे जाणवल्यास तुम्ही त्वरिक तज्ज्ञांचा सल्ला घेतला पाहिजे. पुढे आपण हार्ट अटॅक येण्याआधी शरीर काय संकेत देतं याबद्दल जाणून घेणार आहे.

हार्ट अटॅक म्हणजे छातीत कळ येणे हे अनेकांना माहीतच असेल. त्याचसोबत तुम्हाला १ महिन्याआधी ही समस्या जाणवते. त्यामध्ये छातीत हलकी कळ येत असते, छाती जड झाल्यासारखे वाटू शकते. काही वेळेस हे दुखणे खांदे, हात, मान आणि पाठीच्या भागात सुद्धा जाणवतात. जर तुम्हाला ही लक्षणं वारंवार जाणवत असतील तर त्याकडे दुर्लक्ष करु नका.

तुम्हाला जर सतत थकवा जाणवत असेल आणि त्याला काहीच कारण नसेल तर तुम्हाला हार्ट अटॅकचा धोका जाणवत असतो. यामध्ये तुम्हाला थकवा, आळस आणि अशक्तपणा जाणवतो. हे हार्ट अटॅकचे लक्षण असू शकते. जर तुम्हाला खूप काम केल्याशिवाय थकवा जाणवत असेल तर त्याकडे दुर्लक्ष करु नका. याचं एक मुख्य कारण म्हणजे तुमच्या शरीरातील ऑक्सीजनची कमतरता सुद्धा असू शकते.

तज्ज्ञ सांगतात की, हृदयाच्या ठोक्यात अडथळा आल्यास फुफ्फुसांना पुरेसा ऑक्सिजन मिळत नाही. त्यामुळे श्वास घेताना अडथळा निर्माण होतो, अस्वस्थता येते आणि चिंता वाढते. जर दुखणे, हालचाली केल्यानंतरही श्वास घ्यायला त्रास होत असेल, तर ते हार्ट अटॅकचे लक्षण असू शकते. अनेकदा लोक गॅस, अपचन किंवा छातीत जळजळ यासारख्या समस्यांना सामान्य मानतात. पण, जर ही लक्षणे वारंवार दिसू लागली आणि औषधोपचारानंतरही आराम मिळत नसेल, तर तेही हार्ट अटॅकचे संकेत मानले जातात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Farmers : हातातोंडाशी आलेला घास पाण्यात, शेतातील कपाशीचं पीक वाया; शेतकऱ्याने घेतला टोकाचा निर्णय

Maharashtra Live News Update: गेवराईत 3 एकर बागायती जमीन गेली वाहून

Kalyan: कामावर गेला पण परत आलाच नाही, हाय टेन्शन वायरला स्पर्श; विजेचा झटका लागून तरुणाचा जागीच मृत्यू

Pandharpur News: पंढरपूरमध्ये शासकीय धान्याचा काळाबाजार उघड – दोन ट्रक जप्त|VIDEO

Horrific Accident : मुंबई-गोवा महामार्गावर अपघाताचा थरार; सरस्वती पूजन करून परतताना विद्यार्थ्याचा अपघाती मृत्यू

SCROLL FOR NEXT