How to choose saree according to skin color, Fashion tips ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
लाईफस्टाईल

Fashion tips : त्वचेच्या रंगानुसार कसा निवडाल साडीचा रंग ?

डस्की, गव्हाळ, गडद आणि गोऱ्या त्वचेच्या रंगानुसार निवडा साडीचा रंग.

कोमल दामुद्रे

मुंबई : प्रत्येक स्त्रीला साडी नेसायला अधिक आवडते. ऑफिस, पार्टी किंवा घरातील कार्यक्रमात स्त्रिया या साडीला विशेष प्राधान्य देतात.

हे देखील पहा -

साडीची (Saree) विशेष आवड आहे परंतु, कोणत्या रंगाची साडी आपण घ्यायला हवी हे आपल्याला कळत नाही. आपल्या त्वचेच्या रंगानुसार आपण ज्वेलरी व मेकअपची उत्पादने घेत असतो परंतु, साडीची निवड करताना आपण गोंधळतो. आपल्या त्वचेच्या रंगानुसार साडी कशी निवडायची हे जाणून घेऊया.

१. धूसर रंगाची त्वचा ही भारतीयांमध्ये अधिक प्रमाणात आढळून येते. आपल्यापैकी बहुतेकांना असे वाटते की डस्की किंवा तपकिरी त्वचेचा टोन हलका किंवा गडद रंगामध्ये मिसळत नाही. अशा त्वचेच्या रंगासाठी आपण गाजर लाल, नारिंगी, विट लाल, पीच, बाटली हिरवा, ऑलिव्ह हिरवा, मरून, नारंगी, मोहरी, मिंट हिरवा, आकाश निळा आणि बेबी पिंक यांचा समावेश आहे. एखाद्या खास प्रसंगासाठी साडी नेसताना निळ्या, हिरव्या आणि गुलाबी रंगाच्या साड्याची खरेदी करु शकतो.

२. गडद रंगाच्या त्वचेसाठी पेस्टल रंगाच्या साड्या उठून दिसतील. यामध्ये आपण राखाडी, हिरवा, रॉयल ब्लू, टील ग्रीन, माउव्ह, गोल्डन, मरून, सी ग्रीन, किरमिजी, बेज आणि क्रीम या रंगांचा समावेश आपल्या कपाटात करु शकतो. तसेच काळा रंगाची देखील निवड आपण करु शकतो.

३. गव्हाळ त्वचेच्या रंगासाठी किंवा तपकिरी व पिवळसर रंग असणाऱ्या स्त्रियांसाठी आपण निऑन रंग व त्यावर धातूच्या छटा असलेली साडी खरेदी करु शकतो. तसेच गव्हाळ रंग असलेल्या महिलांनी टेंगेरिन, गुलाबी, मरून, मोहरी, पांढरा, फुशिया, कोबाल्ट निळा, पन्ना हिरवा, किरमिजी आणि आकाश निळा वापरून पहावे. निळ्या रंगाच्या छटा हलक्या तपकिरी रंगाच्या स्त्रियांसाठी सुंदर दिसतात.

४. गोऱ्या रंगाच्या महिलांसाठी (Womens) गडद व फिकट रंग उठून दिसतात. यासाठी आपण पिवळा, गडद राखाडी, मरून, हिरवे, तपकिरी, हलका गुलाबी, लाल, नीलमणी, तपकिरी, पीच, निळे आणि लॅव्हेंडर या रंगांचा समावेश आहे. वाईन आणि रॉयल ब्लू रंग आपल्या त्वचेच्या रंगाला हायलाइट करतात.

Edited By - Komal Damudre

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

रायगडमध्ये राष्ट्रवादीला मोठा धक्का; सुनील तटकरेंच्या समर्थकांचा शिवसेनेत प्रवेश

Maharashtra News Live Update: Mumbai: पवई पोलिसांची अवैध डिझेल साठवणूक आणि विक्री करणाऱ्यांविरोधात मोठी कारवाई.

तटकरे जन्माला आले तेव्हाच...; शिंदेसेनेच्या आमदाराची जीभ घसरली, काय म्हणाले? पाहा व्हिडिओ

Natural Plants : घरात डास, माश्या आणि मुंग्यांचा त्रास होतोय? लावा ही ५ रोपे आणि कीटकांना ठेवा दूर

उत्तर प्रदेशसह 5 राज्यांच्या निवडणुका कधी होणार? तारखांबाबत मोठी अपडेट

SCROLL FOR NEXT