Buying Geyser Tips Saam Tv
लाईफस्टाईल

Buying Geyser Tips : गिझर खरेदी करताना या ५ गोष्टी लक्षात ठेवा, अन्यथा पैसे जातील पाण्यात

Buying Geyser For Home : तुम्हाला देखील घरासाठी गिझर घ्यायचा असेल तर काही गोष्टी समजून घेणे गरजेचे आहे.

कोमल दामुद्रे

Geyser Buying Guide :

हल्ली राज्यात काही प्रमाणात थंडी जाणवू लागली आहे. अशातच आरोग्य निरोगी राहाण्यासाठी आपण अनेक गोष्टीची काळजी घेत आहोत. आंघोळीला गरम पाण्यासाठी हल्ली घरोघरी गिझरचा वापर केला जातो. परंतु, तो विकत घेताना आपण अशा अनेक चुका करतो ज्यामुळे पश्चाताप करण्याची वेळ येते.

सध्या वेळ वाचवण्यासाठी गिझरचा वापर प्रत्येक घरोघरी दिसून येत आहे. परंतु, तुम्हाला देखील घरासाठी गिझर घ्यायचा असेल तर काही गोष्टी समजून घेणे गरजेचे आहे. गिझर खरेदी करताना या ५ गोष्टी नेहमी लक्षात ठेवा. जाणून घेऊया त्याबद्दल ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

1. गीझरचे प्रकार

सध्या बाजारात (Market) दोन प्रकारचे गिझर उपलब्ध आहे. त्यात स्टोरेज आणि इन्स्टंट प्रकार. स्टोरेज गिझर पाणी (Water) गरम करुन साठवतो. तर इन्स्टंट गिझर आपल्याला हवे असेल तेव्हा पाणी गरम करतो. इन्स्टंट गिझरमध्ये अधिक प्रमाणात विजेचा वापर होतो.

2. घरासाठी कोणता गिझर घ्याल?

किचनमध्ये गिझर लावण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी इन्स्टंट गिझर सोयीस्कर ठरेल. तुमच्या कुटुंबात २ ते ३ लोक असतील तर १५ लीटरचा गिझर विकत घ्या. ४ पेक्षा जास्त व्यक्तींसाठी हवा असेल तर ३५ लीटरचा गिझर विकत घ्या.

3. डिझाइन

गिझर खरेदी करताना त्याची डिझाइन पाहा. तुमच्या घरात जागेची अडचण नसेल तर कोणत्याही प्रकारचा गिझर (Shopping) तुम्ही खरेदी करु शकता. पण जागा कमी असल्यास तुम्हाला चौकोनी किंवा दंडगोलाकाराचा गिझर खरेदी करावा लागेल.

4. स्टार रेटिंग

गिझर विकत घेताना सर्वात आधी त्याचे स्टार रेटिंग तपासा. त्याच्या एनर्जीकडे दुर्लक्ष करु नका. कमीत कमी ४ रेटिंग असणारा गिझर खरेदी करावा. यामुळे विजेची मोठ्या प्रमाणात बचत होईल आणि अधिक काळ वापरु शकता.

5. ब्रँड व्हॅल्यू

इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदी करताना त्याची सुरक्षित वैशिष्ट्ये आणि ब्रँड व्हॅल्यू सुरक्षितता असणे महत्त्वाचे आहे. सेफ्टी व्हॉल्व्ह, ऑटो कटऑफ फीचर आणि फेल सेफ मेकॅनिझम यासारखी सुरक्षा वैशिष्ट्ये तपासल्यानंतरच गिझर खरेदी करा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: मुनगंटीवार निवडणूक आयोगावर कडाडले

Pune : पाळीव कुत्रा चावल्यामुळे मालकासह तिघांवर गुन्हा, पुण्यात नेमकं घडलं काय?

Street Food : स्ट्रीट फूडच्या नावाखाली विषाची विक्री, FDAचा नाही मेळ, जनतेच्या जीवाशी खेळ

Gold Rate Today: गुड न्यूज! सोन्याच्या दरात मोठी घसरण, वाचा १८, २२ अन् २४ कॅरेटचे आजचे दर

RBI Repo Rate : लोन महागणार की स्वस्त? तुमच्या EMI वर काय फरक पडणार? जाणून घ्या RBI गव्हर्नरांचा मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT