Career In Social Media Saam Tv
लाईफस्टाईल

Career In Social Media : सोशल मीडियामध्ये करिअरची संधी! मिळेल बक्कळ पैसा, शिक्षण मर्यादा किती? वाचा एका क्लिकवर

Career In Digital Manager : डिजिटल क्षेत्रात करिअर करण्याची संधी तुमच्याकडे आहे. या क्षेत्रामध्ये तुम्हाला लाखोंचा पगार मिळेलच पण तुम्ही सोशल मीडिया मॅनेजरही बनू शकता.

कोमल दामुद्रे

Social Media Manager :

सध्याच्या डिजिटल युगात अनेक तरुण पिढी सोशल मीडियावर बराच वेळ आपला वाया घालवताना दिसून येत आहे. परंतु, यामध्ये करिअर करण्याचा विचार केल्यास तुम्ही बक्कळ पैसा कमावू शकता.

डिजिटल क्षेत्रात करिअर करण्याची संधी तुमच्याकडे आहे. या क्षेत्रामध्ये तुम्हाला लाखोंचा पगार मिळेलच पण तुम्ही सोशल मीडिया मॅनेजरही बनू शकता. डिजिटल क्षेत्र झपाट्याने विस्तारत असल्याने या क्षेत्रात मोठ्या संख्येने करिअरच्या संधी आहेत. या क्षेत्रात करिअर कसे कराल? शिक्षणाची अट किती? जाणून घेऊया सविस्तर  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

1. या क्षेत्रात करिअरसाठी कौशल्य काय हवे?

डिजिटल क्षेत्रात करिअर (Career) करण्याचा सध्या चांगलाच ट्रेंड आहे. यामध्ये आपण अधिकाधिक फॉलोअर्स जोडून बिझेनस (Business) वाढवू शकतो. कंपनीला पुढे आणण्यासाठी योग्य प्रकारे जाहिरात देणे. कंपनीला वेगवेगळे विषय पुरवणे. तसेच सध्या मार्केटमध्ये कोणता ट्रेंड सुरु आहे याचे उत्तम नॉलेज असणे गरजेचे आहे. यामधून कंपनीचा बिझनेस कसा वाढले आणि ग्राहकांना आकर्षित कसे करता येईल हे समजायला हवे.

2. शैक्षणिक पात्रता

डिजिटल मार्केटिंग विषयी असलेल्या बिझनेस अॅडमिनिस्ट्रेशन (बीबीए), मार्केटिंग, जर्नलिझम, मास मीडिया या विषयात पदवी किंवा पदव्युत्तर असणे गरजेचे आहे. याशिवाय गुगल अनॅलिटिक्सचे सर्टिफिकेट कोर्स केलेला असावा.

3. पगार किती मिळेल?

प्रत्येक कंपनी उमेदवाराच्या पात्रतेनुसार पगार (Salary) देते. परंतु, आपला बिझनेस वाढवण्यासाठी सगळ्यांनाच सोशल मीडिया मॅनेजरची गरज भासते. यामध्ये वर्षाला पाच लाख रुपयांपासून ते १८ लाखांपर्यंतचे सॅलरी पॅकेज मिळू शकते. तसेच या क्षेत्रात स्वतंत्रपणे बिझनेसही करता येतो.

4. करिअरच्या संधी

या क्षेत्रात करिअरसाठी जाहिरात व्यवस्थापक, कंटेट मॅनेजर, पीआर स्पेशालिस्ट, सीईओ मॅनेजर अशा विविध क्षेत्रात संधी मिळतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update :रायगडात महायुतीमध्ये खटके सुरूच, दळवी आणि तटकरे यांच्यात जुंपली

Alu Vadi Recipe: रोज मुलांना डब्यात काय द्यायचं? टेन्शन सोडा, बनवा कुरकुरीत आळू वडी; वाचा रेसिपी

Heart attack: हार्ट अटॅकचा धोका वाढवतात या 9 गोष्टी; लक्षणं ओळखून वेळीच उपचार करा

KKK 15 Winner : 'खतरों के खिलाडी १५' च्या ट्रॉफीवर कोणी कोरलं नाव? प्राईज मनीसोबत मिळाली एकापेक्षा एक आकर्षक बक्षिसे

Ujjal Bhuyan : "शरीरातून आत्मा बाहेर काढण्यासारखे..."; SIR मोहिमेवर सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींचे सर्वात मोठे विधान

SCROLL FOR NEXT