Medicine Taste YANDEX
लाईफस्टाईल

How Painkillers Work: पेनकिलर घेतल्यानंतर लगेच कशा गायब होतात वेदना? वाचा औषधं पोटात गेल्यावर कसं काम करतं?

Painkiller how it works: पेनकिलर घेतल्यानंतर वेदना कशा कमी होतात यामागील विज्ञान जाणून घ्या. शरीरातील नर्व सिग्नल्स, सूज आणि मेंदूवर होणाऱ्या परिणामामुळे औषध कसे काम करते हे सोप्या भाषेत समजून घ्या.

Surabhi Jayashree Jagdish

डोकं दुखत किंवा दात दुखत असेल तर आपण कोणताही विचार न करता लगेच पेनकिलर घेतो. मात्र तुम्ही कधी विचार केलाय का की, तुम्ही घेतल असलेल्या पेनकिलरचा शरीरात गेल्यावर कसा परिणाम होतो. अचानक डोकेदुखी असो, अंगदुखी असो किंवा एखाद्या जखमेची वेदना गोळी घेतल्यानंतर काही वेळातच आराम कसा मिळतो? आज आपण यामागील सायन्स जाणून घेणार आहोत.

दुखणं म्हणजे शरीराचा इशारा

डॉक्टरांच्या सांगण्यानुसार, दुखणं हे शरीराकडून मिळणारं एक महत्त्वाचं इशारा असो. शरीरात कुठे इजा झाली, सूज आली किंवा काही बिघाड झाला तर त्या भागातील विशेष नर्व सेल्स एक्टिव्ह होतात. हे सेल्स मेंदूकडे सिग्नल पाठवतात आणि मेंदू त्याला दुखणं म्हणून ओळखतो. त्यामुळे दुखणं थेट जखमेच्या ठिकाणाहून येत नाही, तर मेंदू त्याचा अर्थ लावतो.

पेनकिलरचं काम नेमकं काय?

पेनकिलर गोळी घेतल्यानंतर ती आधी पोटात विरघळते. विरघळ्यानंतर ती रक्ताद्वारे संपूर्ण शरीरात पोहोचते. काही औषधांचा परिणाम काही मिनिटांत दिसू लागतो तर काहींना एक तासापर्यंत वेळ लागू शकतो. या औषधांचं मुख्य काम म्हणजे सूज आणि वेदना वाढवणारे केमिकल्स कमी करणं.

नर्व सिस्टमवर थेट परिणाम

काही पेनकिलर औषधं थेट नर्वस सिस्टिमवर परिणाम करतात. ही औषधं मेंदूकडे जाणाऱ्या वेदनांचे सिग्नल कमी करतात. तर काही औषधं शरीरातील नैसर्गिक एंडॉर्फिन सिस्टमला एक्टिव्ह करतात. ज्यामुळे वेदना कमी जाणवू लागतात. त्यामुळेच वेगवेगळ्या प्रकारच्या दुखण्यासाठी वेगवेगळी औषधं दिली जातात.

डॉक्टरांच्या सांगण्यानुसार, प्रत्येक पेनकिलर प्रत्येक प्रकारच्या दुखण्यावर सारखाच परिणाम करत नाही. कारण दुखण्यामागील कारणं वेगळी असतात. त्यामुळे औषधांचाही परिणाम वेगळा दिसू शकतो.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

प्रसिद्ध दिग्दर्शकाचा हॉटेल रुममध्ये आढळला मृतदेह; २८ वर्षीय डायरेक्टरच्या निधनाने सिनेसृष्टीत शोककळा

Sunday Horoscope: पैशाची तंगी जाणवेल, 3 राशींचे भाग्य उजळेल; वाचा रविवारचं राशीभविष्य

Durga Puja Pandal: दुर्गा पूजेचा मंडप कोसळला; चेंगराचेंगरीत १७ जणांचा मृत्यू

दिल्लीतील आंदोलनाची धग थेट लंडनपर्यंत, ध्रुव राठीने सांभाळली लंडनमध्ये आंदोलनाची धुरा

गुरांच्या चाऱ्याला तिजोरीचं कुलूप, दुष्काळासोबत चोरीचंही संकट

SCROLL FOR NEXT