उन्हाळ्याचे दिवस आता सुरु झाले आहेत आणि रस्त्यावर ठिकठिकाणी उसाचा रस विकणारे दिसतात. गर्मीच्या या दिवसात थंडावा मिळावा यासाठी तुम्ही पण उसाचा रस पित असाल. उसाच्या रसाची चव उत्तम असून तो तितकाच रिफ्रेशिंग देखील असतो. मात्र गोड पेय हे मधुमेहाच्या रूग्णांसाठी योग्य नाही. कारण याच्या सेवनाने रूग्णांच्या रक्तातील साखर वाढण्याची शक्यता असते.
मधुमेहाच्या रूग्णांनी उसाचा रस पिताना काळजी घेतली पाहिजे. जाणून घेऊया उसाच्या रसामुळे किती प्रमाणात शुगर वाढू शकते.
एक ग्लास उसाचा रस म्हणजेच 250 ml रसामध्ये जवळपास ५५-६५ ग्राम नैसर्गिक साखर असते. ज्यामध्ये शुक्रोज, ग्लुकोज आणि फ्रुक्टोस यांचा समावेश असतो. याचाच अर्थ एका ग्लासात २२०-२६- कॅलरीज असतात. या कॅलरीज डायबेटीक रूग्णांसाठी जास्त आहेत. याशिवाय प्री-डायबेटीक रूग्णांसाठी देखील हे योग्य नाही.
एक ग्लास उसाचा रस प्यायल्याने ब्लड शुगरचा स्तर प्रचंड वाढतो. मात्र तो किती वेगाने वाढू शकतो हे तुमच्या मेटाबॉलिझ्म, शरीराची एक्टिव्हीटी आणि आरोग्यावर अवलंबून असतं. उसाच्या रसाता ग्लायसेमिक इंडेक्स खूप जास्त असतो. याचाच अर्थ उसाचा रस प्यायल्याने शुगर वेगाने स्पाईक होऊ शकते. त्यामुळे जर तुम्ही उसाचा रस पित असाल तर शरीरात ग्लुकोजची मात्रा वेगाने वाढू शकते आणि इंसु्लिन स्पाइक होतो.
जर तुम्हाला मधुमेहाची समस्या असेल तर तुम्ही उसाचा रस पिऊ नये. हा शरीरातील इंसुलिन कंट्रोल बिघडवू शकतो. ज्यामुळे रक्तातील शुगर वाढण्याचा धोका असतो. परिणामी थकवा, चक्कर येणं किंवा ऑर्गन डॅमेज होण्याची शक्यता वाढू शकते.
जर तुम्हाला वाटत असेल की उसाचा रस हा सर्वांसाठी धोकादायक आहे, तर हे पूर्णपणे चूक आहे. जर तुम्ही शारीरिकदृष्ट सक्रीय असाल आणि तुम्ही याचं सेवन करत असाल, शिवाय तुम्हाला मधुमेहाची समस्या नसेल तर तुम्ही प्रमाणात उसाचा रस पिऊ शकता. वर्कआऊट केल्यानंतर हीट स्ट्रोकमध्ये उसाचा रस पिणं फायदेशीर मानलं जातं.
टीप : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.