Heart Attack Risk google
लाईफस्टाईल

Cigarette Risk: फक्त एका सिगारेटमुळेही आयुष्य संपेल, तज्ज्ञांनी सांगितला हार्ट अटॅकचा धोका अन्...

Heart Attack Risk: अधूनमधून किंवा कमी धूम्रपानही हृदयविकाराचा धोका वाढवते, असे संशोधनात स्पष्ट. सिगारेटची मर्यादा, धोके आणि धूम्रपान सोडल्याचे फायदे जाणून घ्या.

Sakshi Sunil Jadhav

  • अगदी कमी किंवा अधूनमधून धूम्रपानसुद्धा हार्टवर गंभीर परिणाम करतो.

  • रक्तवाहिन्यांची लवचिकता कमी होऊन हृदयविकाराचा धोका त्वरित वाढतो.

  • ‘लाइट स्मोकिंग’ आणि ‘डेली स्मोकिंग’ यांच्यात धोका खूपच कमी फरकाने दिसतो.

आज अनेक तरुण सामाजिक प्रसंगांमध्ये किंवा मित्रांसोबत अधूनमधूनच सिगारेट ओढतात. ही सवय अनेकांना फॅशनच वाटते. आणि ते सुरक्षित असल्याची समजूत बाळगतात. मुळात धुम्रपानाची सवय ही अत्यंत वाईट आणि जीवघेणी असते. धूम्रपानाचे प्रमाण कितीही असो, त्याचा हानिकारक परिणाम शरीरावर आणि विशेषतः तुमच्या हार्टवर होतो, असं तज्ज्ञ सांगतात.

अनेकांना वाटतं की दिवसातून कमी सिगारेट ओढल्याने धोका कमी होतो किंवा पूर्णपणे धूम्रपान न थांबवता फक्त कमी केल्याने हार्ट अटॅक कमी होईल. मात्र संशोधन सांगतं की, अगदी मर्यादित किंवा अधूनमधून ओढली जाणारी सिगारेटही हार्टवर गंभीर परिणाम करू शकते.

आंतरराष्ट्रीय कार्डिओव्हॅस्क्युलर संशोधनात असं आढळलं की, एकही सिगारेट न ओढणाऱ्या व्यक्तीपासून ते हलक्या प्रमाणात धूम्रपान करणाऱ्या व्यक्तीकडे होणारा बदल हा हार्ट अटॅकचा धोका आढळतो. म्हणजेच अगदी कमी प्रमाणात धूम्रपान केल्यानेही रक्तवाहिन्यांमध्ये लगेच बदल घडतात.

या धूरातील रसायनं रक्तवाहिन्यांची लवचिकता कमी करतात. त्याने हार्टच्या ठोक्यांच्या लयीत काही बदल होतात आणि शरीरातील जळजळ वाढते. याने काहीच दिवसात कोरोनरी हार्ट डिसीज, हार्ट अटॅक, हार्ट फेल्युअर आणि एट्रियल फिब्रिलेशनचा धोका वाढतो.

शरीराला प्रत्येकवेळी पूर्णपणे सावरायला वेळ मिळत नाही आणि त्यामुळे 'लाइट स्मोकर्स' आणि 'डेली स्मोकर्स' यांच्यामधला धोका अपेक्षेपेक्षा खूपच कमी फरकाने दिसून येतो. धूम्रपान पूर्णपणे सोडल्यावर शरीराची पुनर्बांधणी कशी होते यावरही मोठ्या प्रमाणात संशोधन झाले आहे.

या अभ्यासात असं आढळलं की धूम्रपान थांबवल्यानंतर पहिल्या दहा वर्षांत हृदयविकार आणि मृत्यूचा धोका प्रचंड वेगाने कमी होतो. रक्तवाहिन्यांचे कार्य सुधारतं, रक्ताभिसरण जास्त निरोगी होतं. त्यामुळे हृदयावरील ताणही कमी होतो. धूम्रपान संपूर्णपणे थांबवून वीस वर्षांनंतर व्यक्तीचा धोका सध्या धूम्रपान करणाऱ्यांच्या तुलनेत ८० टक्क्यांहून अधिक कमी होतो. दीर्घकालीन तंबाखू सेवन केलेल्यांनाही पूर्णपणे सोडल्यानंतर मोठ्या प्रमाणात संरक्षण मिळू शकतं, हे या निष्कर्षांतून स्पष्ट होते.

डिस्क्लेमर: हा लेख केवळ माहितीपुरता असून वैद्यकीय सल्ला म्हणून घेऊ नये. कोणताही आरोग्यविषयक निर्णय घेण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांचे संत गजानन महाराज मंदिरात दर्शन

Crime: बॉयफ्रेंडच्या समोर तरुणीवर सामूहिक बलात्कार, कार अडवून आधी दोघांना मारहाण, नंतर...

Bank Holiday in March कामाची बातमी! मार्चमध्ये ११ दिवस बँका बंद, RBI कडून सुट्ट्यांची यादी जारी

Holi Hair Care Tips: होळी खेळताना केसांची काळजी कशी घ्यायची?

T20 World Cup 2026: सेमीफायनलची दारं उघडी ठेवण्यासाठी भारतासमोर NRRचं गणित, झिम्बाब्वेविरुद्ध विजयाचं स्पष्ट समीकरण पाहा

SCROLL FOR NEXT