Onion For Diabetes  saam tv
लाईफस्टाईल

Onion For Diabetes: डायबिटीजच्या रुग्णांसाठी कांदा ठरेल बेस्ट, रक्तातली साखर होईल झटक्यात कमी, तज्ज्ञांनी दिली माहिती

Blood Sugar Control: कांद्याचे नियमित सेवन डायबिटीज नियंत्रणात ठेवू शकते. तज्ज्ञांच्या मते कांद्यातील घटक ब्लड शुगर लेव्हल ५०% ने कमी करतात आणि नैसर्गिक इन्सुलिनप्रमाणे कार्य करतात.

Sakshi Sunil Jadhav

कांद्याचे सेवन केल्याने रक्तातील साखर नैसर्गिकरीत्या कमी होते.

एलियम सेपा घटक मेटफॉर्मिन औषधासोबत प्रभावी ठरतो.

कांदा हृदय आणि हाडांच्या आरोग्यासाठीही उपयुक्त आहे.

सर्वसामान्यांपासून उच्च वर्गीयांपर्यंत डायबिटीजचा आजार सगळ्यांनाच असतो. एकदा डायबिटीजच झाली की ती आटोक्यात फार कठीण होऊन बसतं. मग जेवणातले अनेक पदार्थ आणि विशेषत: साखरेतले पदार्थ टाळावेच लागतात. त्यामध्ये लोक विविध प्रकारच्या डायेटचा विचार करतात. त्यामध्ये तज्ज्ञांनी एक मोलाचा सल्ला दिला आहे. ज्याचा वापर करुन तुम्ही नैसर्गिक रित्या झटपट डायबिटीज कमी करु शकता.

आरोग्य क्षेत्रात नेहमीच नवीन संशोधन समोर येत असतात. अशाच एका अभ्यासात वैज्ञानिकांनी असा दावा केला आहे की कांद्याच्या अर्काच्या सेवनाने ब्लड शुगर लेव्हल ५० टक्क्यांपर्यंत कमी होऊ शकते. हा दावा उंदरांवर केलेल्या अभ्यासावर आधारित आहे. वैज्ञानिकांच्या मते, कांदा हा डायबिटीजसाठी सर्वात स्वस्त आणि सहज उपलब्ध उपचार ठरू शकतो.

स्टडीत नेमकं काय आढळलं?

ब्रिटिश वेबसाइट एक्सप्रेसच्या अहवालानुसार, संशोधकांनी आढळून दिलं की एलियम सेपा (Allium cepa) म्हणजेच कांद्याचा अर्क, अँटी डायबेटिक औषध मेटफॉर्मिनसोबत दिल्यास उच्च रक्तातील साखर कमी करण्यात प्रभावी ठरतो.

मेटफॉर्मिन हे टाइप-२ डायबिटीजच्या उपचारासाठी सर्वाधिक वापरले जाणारे औषध आहे.

कांद्यातील नैसर्गिक घटकांनी शरीरातील ग्लुकोज नियंत्रणात ठेवण्यास मदत होते.

कांद्याचे सेवन केल्याने कोणकोणते फायदे होतात?

१. कॅन्सरचा धोका कमी होतो.

Cleveland Clinicच्या अहवालानुसार दरवर्षी सुमारे ३५ पाउंड कांदा किंवा इतर एलियम वर्गातील भाज्यांचे सेवन केल्यास कोलन कॅन्सरचा धोका सुमारे ८०% ने कमी होतो.

२. हृदय रोगांचा धोका कमी होतो.

कांद्यात असलेले अँटिऑक्सिडंट्स आणि क्वेरसेटिन नावाचं फ्लेवोनॉइड शरीराला फ्री रॅडिकल्सपासून संरक्षण देतात आणि हृदयाचे आरोग्य टिकवून ठेवतात.

३. हाडांमधला मजबुतपणा वाढतो.

कांद्यातील अँटिऑक्सिडंट्स हाडांचे नुकसान आणि ऑस्टिओपोरोसिसचा धोका कमी करतात, विशेषतः वाढत्या वयात हाडांची झीज टाळण्यासाठी हे उपयुक्त ठरते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: निवडणुकांमुळे नागपुरात होणारं हिवाळी अधिवेशन १० दिवस पुढे जाण्याची शक्यता

Pune: पुण्यात खाकीवर डाग! २ कोटींची लाच मागितल्याप्रकरणी PSI ताब्यात, गुन्ह्यात मदत करण्यासाठी घेतले पैसे

Women World Cup Final: हातात तिरंगा आणि पाणावलेले डोळे! एकमेकींना मिठी मारल्यानंतर हरमनप्रीत-स्मृतीला अश्रू अनावर

Rohit Sharma Reaction: रोहितला आठवला 19 नोव्हेंबर? महिलांनी वर्ल्डकप जिंकताच स्टँडमध्ये बसलेला हिटमॅन भावूक; रिएक्शन होतेय Viral

हरमनप्रीत कौरचा जबरदस्त डाव; त्या दोन षटकांत गेम फिरला, टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेच्या हातून ट्रॉफी हिसकावली

SCROLL FOR NEXT