Buddha Purnima 2023 Saam Tv
लाईफस्टाईल

Buddha Purnima 2023 : वर्तमानाचा कसा होतो भविष्यावर परिणाम ? जाणून घ्या गौतम बुद्धांचे अनमोल विचार

Buddha Thoughts : हा दिवस विशेष मानला जातो कारण या दिवशी बुद्धाला बोधीवृक्षाखाली ज्ञान प्राप्त झाले होते.

कोमल दामुद्रे

Buddha Jayanti 2023 : मे महिन्यातील येणाऱ्या वैशाख पौर्णिमेला बुध्द जयंती किंवा बुद्ध पौर्णिमा असे म्हटले जाते. बुद्ध पौर्णिमा विशेषत: आशिया, तिबेट, आग्नेय आशिया, थायलंड, चीन, कोरिया, व्हिएतनाम, कंबोडिया इत्यादी देशांमध्ये साजरी केली जाते.

बुद्ध पौर्णिमा ही तीन कारणांसाठी (Reasons) खास आहे. या दिवशी पहिला राजकुमार सिद्धार्थचा जन्म झाला. त्यांचा जन्म वैशाख पौर्णिमेच्या दिवशी लुंबिनी येथे झाला होता. दुसरा, हा दिवस विशेष मानला जातो कारण या दिवशी बुद्धाला बोधीवृक्षाखाली ज्ञान प्राप्त झाले होते.

बुद्ध (Buddha) हा एक महान धर्मोपदेशक होता ज्याने बौद्ध धर्माची स्थापना केली. त्यांचे विचार खूप प्रेरणादायी आहेत आणि आपल्याला योग्य मार्गावर चालायला शिकवतात. तुम्ही कितीही पुस्तके वाचलीत, कितीही चांगली प्रवचने ऐकलीत तरी जीवनात (Life) अवलंब केल्याशिवाय त्यांचा काहीही उपयोग होणार नाही, असे त्यांनी म्हटले आहे. गौतम बुद्धांचे अनमोल विचार

1. आपल्याकडे जे आहे ते अतिशयोक्ती करू नका आणि इतरांचा मत्सर करू नका.

2. वाद झाल्यास राग येतोच परंतु, आपण सत्याचा मार्ग सोडून स्वतःसाठी प्रयत्न करू लागतो.

3. तुमच्या प्रगतीच्या आड येणाऱ्या लोकांसोबत असण्यापेक्षा एकटे राहणे चांगले.

4. तुमच्या भविष्याची काळजी करू नका, वर्तमानात जगा आणि तुमचे वर्तमान सुधारा, तुमचे भविष्य आपोआप सुधारेल.

5. जर तुम्ही अंधारात मग्न असाल तर प्रकाशाचा शोध कधीच घेत येणार नाही

6. जी व्यक्ती इतरांवर प्रेम करत नाही त्याला आनंदी राहण्याचे कारण नाही.

7. जो आपल्या मनावर ताबा ठेवतो त्याला शांती मिळते.

8. अज्ञान हा जगातील सर्वात मोठा अंधार आहे, म्हणून ज्ञान मिळवा तरच तुम्ही अंधारातून बाहेर पडू शकाल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Artificial Intelligence: दररोज ChatGPT कडे किती प्रश्न विचारले जातात? ऐकून तुम्ही थक्क व्हाल

मोठी बातमी! शिवसेना ठाकरे गटातील नेत्यानं उचललं टोकाचं पाऊल; राहत्या घरात आयुष्य संपवलं

Pune Traffic News : 'या' शहरात बांधकामाच्या जड वाहनांना वाहतुकीसाठी रेड झोन तात्पुरता सुरु; जाणून घ्या सविस्तर

Son Of Sardaar 2 VS Dhadak 2 collection : अजय देवगन अन् सिद्धांत चतुर्वेदीमध्ये कांटे की टक्कर, पहिल्या दिवशी कोणी मारली बाजी?

Tulja Bhavani : तुळजाभवानी मातेची तलवार गहाळ, पुजाऱ्यांचा गंभीर आरोप | VIDEO

SCROLL FOR NEXT