Paralysis Saam Tv
लाईफस्टाईल

Paralysis : पॅरालिसिसिचा आजार कसा होतो? जाणून घ्या, लक्षणे

मेंदूचे कार्य सुरळीतणे चालण्यासाठी मेंदूला रक्तपुरवठा व्यवस्थित होणे गरजेचे असते.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Paralysis : मेंदूचे कार्य सुरळीतणे चालण्यासाठी मेंदूला रक्तपुरवठा व्यवस्थित होणे गरजेचे असते. मेंदूला योग्यप्रकारे रक्तपुरवठा न झाल्यास पॅरालिसीस (पक्षाघात) होतो त्यामुळे रुग्णाच्या हाता-पायातील ताकद कमी होते. याठिकाणी पक्षाघात म्हणजे काय, पॅरालिसीसची कारणे, पक्षाघात का व कशामुळे होतो, पक्षाघात लक्षणे आणि उपचार याविषयी माहिती ह्या लेखामध्ये दिली आहे.

पॅरालिसिसि हा मेंदूसंबंधी एक गंभीर असा न्यूरोमस्क्युलर आजार आहे. यावर वेळीच उपचार न केल्यास रुग्णांमध्ये (Patient) कायमचं अपंगत्वही (Disabled) येऊ शकते. उजव्या बाजूच्या मेंदूमध्ये जेंव्हा बिघाड होतो तेंव्हा डाव्या बाजूच्या हात-पाय आणि चेहऱ्यावर परिणाम होतो आणि डाव्या बाजूच्या मेंदूमध्ये जेंव्हा बिघाड होतो तेंव्हा उजव्या बाजूच्या हात-पाय आणि चेहऱ्यावर परिणाम होतो व शरीर लुळे पडते.

पॅरालिसिसिचे प्रकार -

पॅरालिसिसिचे दोन प्रमुख प्रकार असतात.

1) Ischemic Paralysis -

या प्रकारात मेंदुतील रक्तवाहिन्यांमध्ये रक्ताची गाठ तयार होते त्यामुळे मेंदूच्या विशिष्ट भागास रक्ताचा पुरवठा बंद झाल्यामुळे पॅरालिसीस होतो.

2) ‎Hemorrhagic Paralysis -

या प्रकारात मेंदुमधील रक्तवाहिन्या फुटून मेंदूत रक्तस्त्राव होऊन पक्षाघात होतो. पॅरालिसिसिचा झटका आल्यावर सीटी स्कॅन किंवा एमआरआय स्कॅनद्वारे कोणता प्रकार आहे ते उपचार करण्यापूर्वी तपासले जाते.

3) Transient Ischemic Attack -

TIA नावाचा एक तिसरा प्रकारही असतो. यामध्ये पॅरालिसिसिची लक्षणे 24 तासाच्या आत निघून जातात आणि रुग्ण पूर्ववत बरा होतो. मात्र TIA ही Warning असते. एकदा TIA येऊन गेल्यास योग्य उपचार न केल्यास आपणास पुढे पॅरालिसिसिचा झटका येण्याची शक्यता अधिक असते. तेंव्हा TIA येऊन गेल्याससुध्दा डॉक्टरांकडून निदान आणि उपचार करून घ्यावेत. त्यामुळे पॅरालिसिसिचा धोका टळण्यास मदत होईल.

पॅरालिसीसची लक्षणे -

मेंदूचा रक्त पुरवठा बंद झाल्यामुळे किंवा मेंदूमध्ये रक्तस्त्राव झाल्यामुळे मेंदूला योग्यरित्या रक्तपुरवठा होत नाही. त्यामुळे मेंदूच्या कार्यावर विपरीत परिणाम होऊन खालील पॅरालिसीसची लक्षणे दिसून येतात.

  • एका बाजूच्या हाता-पायाची ताकद कमी होते.

  • हातापायात लुळेपणा जाणवतो, मुंग्या येतात.

  • तोंड वाकडं होते, बोलण्यास त्रास होतो.

  • अन्न गिळण्यास आणि श्वास घेण्यास त्रास होतो.

  • एका डोळ्याने अंधुक दिसू लागणे.

  • चक्कर येणे, तोल जाणे.

  • चेतना कमी होणे.

  • तीव्र डोकेदूखी.

ही लक्षणे पॅरालिसीसमध्ये असतात. अशी लक्षणे जाणवल्यास त्वरीत वैद्यकीय उपचार होणे आवश्यक असते.

लक्षात ठेवा ‘FAST’

पॅरालिसीसची लक्षणे ओळखण्यासाठी ‘FAST’ लक्षात ठेवा..

F – Face (Facial Weakness) -

रुग्णास हसण्यास सांगा. हसताना एका बाजूचा चेहरा, ओठ आणि डोळे लटकलेले दिसल्यास ते पॅरालिसीसचे लक्षण असते.

A – Arms (Arm Weakness) -

रुग्णाला त्याचे दोन्ही हात पुढे व वर उचलण्यास सांगा. जर रुग्णाचा एक हात वर व समोर उचलता येत नसल्यास ते पॅरालिसीसचे लक्षण असते.

S – Speech Difficulty) -

रुग्णास प्रश्न विचारून तो व्यवस्थित बोलतो का ते पहा. जर त्याला बोलताना त्रास होत असल्यास ते पॅरालिसीसचे लक्षण असते.

T – Time (Time to Act) -

कोणतीही कृती करताना किंवा प्रतिक्रिया देताना सामान्य प्रतिक्रिया न आढळता त्यामध्ये विसंगती आढळते

वरील लक्षणे रुग्णामध्ये जास्त प्रमाणात दिसून आल्यास वेळ न दवडता रुग्णाला तातडीने रुग्णालयात उपचारासाठी घेऊन जावे. जवळ वाहतुकीचे साधन नसल्यास 108 या नंबरवर फोन करून रुग्णवाहिका बोलावून घ्या.

पक्षाघाताचा झटका आल्यानंतरची पहिले 3 तास हे Golden Period असतात ह्या काळामध्ये रुग्णावर उपचार केल्यास रुग्ण लवकरात लवकर बरा होतो तसेच पक्षाघाताच्या झटक्यामुळे मेंदूमध्ये होणारा बिघाड थांबवता येऊ शकतो. रुग्णास वेळीच उपचार मिळाल्यास पुढील मोठा धोका टळू शकतो.

वरील लक्षणे जर कमी प्रमाणात जाणवत असतील तर निगेटीव्ह आयनची टोपी मिळते ती वापरण्यास सुरुवात करावी व मेंदूचे रक्ताभिसरण सुरळीत होण्यासाठी हर्बल ट्रीटमेंट घेणे उत्तम ज्यायोगे मेंदूचे रक्ताभिसरण सुरळीत होऊ शकेल व संभाव्य धोका टळू शकेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Lapandav Serial: स्टार प्रवाहवर लवकरच सुरू होणार 'लपंडाव'; 'ही' मालिका अखेर घेणार प्रेक्षकांचा निरोप

Prajakta Mali: युनिव्हर्सिटी टॉपर ते टीव्ही होस्ट; प्राजक्ता माळीचा प्रेरणादायी प्रवास

Raksha Bandhan 2025: रक्षाबंधनाच्या दिवशी ६ ग्रह येणार एकत्र; दुर्मिळ संयोगाचा ३ राशींना होणार भरपूर फायदा

Maharashtra Live News Update: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज पुणे दौऱ्यावर

Kapil Sharma: सलमान खाननंतर कपिल शर्माला का टार्गेट करतेयं लॉरेन्स बिश्नोई टोळी? 'हे' आहे खरे कारण

SCROLL FOR NEXT