Skill India Digital App  Saam Tv
लाईफस्टाईल

Skill India Digital App : तरुणांना नोकरीची सुवर्णसंधी! सरकारकडून स्किल डेव्हलपमेंटसाठी डिजिटल अ‍ॅप करणार सुरु, मिळणार नोकरीची संधी

Career Tips : स्किल इंडिया डिजिटल प्रत्येक भारतीय तरूणाला भविष्यात तयार होण्यासाठी आवश्यक स्किल्स डेव्हलपमेंटचे प्रशिक्षण देते.

Shraddha Thik

Skill Development :

स्किल इंडिया डिजिटल प्रत्येक भारतीय तरूणाला भविष्यात तयार होण्यासाठी आवश्यक स्किल्स डेव्हलपमेंटचे प्रशिक्षण देते. स्किल इंडिया डिजिटल ही भारतातील युवकांसाठी शिक्षण, रोजगार आणि उद्योजकता इकोसिस्टमसाठी डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा आहे. करिअरची प्रगती आणि आजीवन शिक्षणाच्या शोधात असलेल्या युवकांसाठी एक केंद्र आहे.

देशातील युवकांसाठी उद्योग-विशिष्ट कौशल्य अभ्यासक्रम आणि नोकरीच्या संधी आणि उद्योजकता सपोर्ट प्रदान करते. स्किल इंडिया डिजिटल (Digital) भारताच्या विविध लोकसंख्येच्या वाढत्या गरजा पूर्ण करण्यासाठी डिझाइन केले आहे.

येथे तुम्हाला अनेक कौशल्य अभ्यासक्रम सापडतील, ज्यांचा पाठपुरावा वेगवेगळ्या मार्गांनी केला जाऊ शकतो आणि यामध्ये विविध क्षेत्रे आणि उद्योगांमध्ये शिकाऊ आणि नोकरीच्या संधींचा समावेश आहे. हे व्यासपीठ अनेक भारतीय (Indian) भाषांमध्ये उपलब्ध आहे आणि वापरण्यास भारताच्या कौशल्य, अपस्किलिंग आणि रिस्किलिंग गरजा पूर्ण करणे हे त्याचे उद्दिष्ट आहे.

QR कोड स्किल इंडियाद्वारे डिजिटल पोर्टफोलिओवर काम

उपक्रम आहे आणि राष्ट्रीय कौशल्य विकास महामंडळाने (NSDC) विकसित केला आहे. स्किल इंडिया डिजिटलने वैयक्तिक QR कोडद्वारे डिजिटल CV लाँच केला आहे. कोणतीही कंपनी किंवा फर्म फक्त QR कोड स्कॅन करून कोणत्याही उमेदवाराचे कौशल्य, पात्रता, अनुभव आणि यश जाणून घेण्यासाठी त्यांचा डिजिटल पोर्टफोलिओ तपासू शकतात.('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

यूजर्ससाठी लोकेशन बेस्ड सेवा घेणे शक्य

स्किल इंडिया डिजिटलचे वापरकर्ते त्यांच्या लोकेशनवर (Location) आधारीत सेवा वापर आणि एक्सप्लोर करू शकतात. अशा सेवांमध्ये जवळील स्किल डेव्हलपमेंट सेंटर पाहणे सोपे होईल. या केंद्रांमध्ये PMKVY, JSS, ITI, स्किल डेव्हलपमेंट विद्यापीठे, पॉलिटेक्निक, CSR केंद्र, शैक्षणिक संस्था, उद्योग-मालकीच्या संस्था आणि फी-आधारित केंद्रांचा समावेश आहे. याव्यतिरिक्त, वापरकर्ते विशिष्ट फिल्टर वापरून स्थानिक नोकरी आणि शिकाऊ संधी, प्रशिक्षक, ओडीओपी आणि upcoming बॅचचे तपशील देखील शोधू शकतात.

डिस्कव्हरीची वैशिष्ट्ये

स्किल इंडिया डिजिटल वापरकर्त्यांना प्लॅटफॉर्म किंवा अ‍ॅपवर नोंदणी न करता त्यांच्या पसंती आणि आकांक्षांवर आधारित अभ्यासक्रम, योजना, प्रशिक्षणार्थी आणि नोकरीच्या संधी शोधण्यास कॅपेबल करते.

  • अभ्यासक्रम

    वापरकर्ते शॉर्ट-टर्म स्किल डेवलपमेंट कार्यक्रमांपासून ते भविष्यासाठी इन-डेप्थ लर्निंग आणि ट्रेनिंगपर्यंत विविध क्षेत्रातील कौशल्य अभ्यासक्रम निवडू शकतात.

  • योजना

    वापरकर्ते विविध मंत्रालयांकडून कौशल्य आणि उद्योजकता योजना शोधू शकतात, ज्यात शॉर्ट-टर्म स्किल कार्यक्रमांपासून ते लाँग-टर्म अभ्यासक्रमांपर्यंत करिअरचा विकास आणि शिक्षणाचा उद्देश आहे.

  • जॉब्स

    वापरकर्ते विविध क्षेत्रातील नोकरीच्या संधी शोधू शकतात आणि क्षेत्र, वेतन श्रेणी आणि लोकेशननुसार प्राधान्ये फिल्टर करू शकतात. वापरकर्त्यांना त्यांच्या आवडी, प्राधान्ये आणि आकांक्षा यावर आधारित कौशल्य अभ्यासक्रम, योजना, कौशल्य केंद्रे, प्रशिक्षणार्थी आणि नोकरीच्या संधी शोधण्यासाठी हे एक एकीकृत व्यासपीठ किंवा अ‍ॅप आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: लालबागचा राजा गिरगाव चौपाटीवर दाखल

Jio Recharge Plan: कमी खर्चात जास्त सुविधा! जिओचा 70 दिवसांचा धमाकेदार रिचार्ज प्लॅन, वाचा फायदे

Bhoplyachi Bhaji Recipe : गरमागरम वडे अन् भोपळ्याच्या भाजी, संडे स्पेशल चटपटीत बेत

Rashmika Mandanna Engagement : नॅशनल क्रश रश्मिकानं गुपचूप उरकला साखरपुडा? अंगठीने वेधलं लक्ष, पाहा VIDEO

Maharashtra Weather : गणरायाला निरोप देण्यासाठी पावसाचे आगमन, पालघरसह नाशिकला ऑरेंज अलर्ट, कुठे कसा असणार पाऊस, वाचा

SCROLL FOR NEXT