Tuesday Rashifal Saam Tv
लाईफस्टाईल

Tuesday Rashifal : आज या राशींवर होणार हनुमानाची कृपा, तर यांचे नशीब पालटणार; पैशांचाही होणार वर्षाव

कोमल दामुद्रे

Horoscope : आज 30 मे 2023 ला ज्येष्ठ महिन्यातील शेवटचा मंगळवार आहे. तसेच यासोबतच आज सिद्धी योगही तयार होत आहे. रोजच्या राशीनुसार आजचा दिवस काही राशींसाठी अधिक शुभ आहे.

मंगळवार हा हनुमानजींना समर्पित आहे. दुसरीकडे बजरंगबलीचा आशीर्वाद मिळवण्यासाठी आजचा दिवस हा विशेष मानला जात आहे. ज्येष्ठ महिन्यातील हा मंगळवार अनेक राशींसाठी लाभदायक ठरणार आहे. जाणून घेऊया त्याबद्दल

1. मेष:

मेष राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस खूप चांगला जाणार आहे. नोकरी (Job) करणाऱ्यांना प्रगतीची संधी मिळेल. जीवनात सुख, शांती आणि समृद्धी वाढेल. नवीन मित्र (Friends) बनू शकतात.

2. वृषभ :

वृषभ राशीच्या लोकांना अनेक आनंदाच्या बातम्या मिळतील. व्यवसायात (Business) लाभ होईल. योजना पूर्ण होतील. लोक तुमच्या कामाचे कौतुक करतील. प्रगतीचे नवे मार्ग मिळतील.

3. कर्क :

कर्क राशीच्या लोकांसाठीही आजचा दिवस शुभ आहे. बजरंगबलीच्या कृपेने तुम्हाला चांगली बातमी मिळेल. कुटुंबासोबत कुठेतरी जाण्याचा बेत आखाल. सर्वांचे सहकार्य मिळेल.

4. तूळ :

तूळ राशीच्या लोकांसाठी हा दिवस चांगला राहील. तुमचे रखडलेले काम पूर्ण होईल. वरिष्ठ आणि कनिष्ठ यांचे पूर्ण सहकार्य मिळेल. नवीन वाहन खरेदी करू शकता. उत्पन्न वाढेल.

5. धनु:

आज धनु राशीच्या लोकांना नवीन नोकरीची ऑफर मिळू शकते. तुमच्या प्रगतीचा मार्ग खुला होईल. बेरोजगारांना रोजगार मिळण्याची दाट शक्यता आहे. तुम्ही कोणत्याही स्पर्धेत जिंकू शकता.

6. मकर :

मकर राशीच्या लोकांना आज कुठूनतरी अचानक लाभ होऊ शकतो. छोट्या व्यावसायिकांना आज मोठा फायदा होऊ शकतो. तुम्ही उर्जेने परिपूर्ण असाल आणि अनेक गोष्टी पूर्ण कराल.

7. मीन :

मुलाकडून मिळालेली कोणतीही सुखद माहिती तुमचे मन प्रसन्न करेल. गुंतवणूक करू शकता. थांबलेले पैसे मिळतील. हनुमानजींच्या कृपेने तुम्हाला जमीन आणि इमारती मिळू शकतात. कुठेतरी जाण्याचा बेत आखता येईल.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. याचा आमच्याशी कोणताही संबंध नाही.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Badlapur Case : बदलापूर अत्यार प्रकरणी मोठी अपडेट; एसआयटीकडून कोर्टात २ चार्जशीट दाखल, पाहा व्हिडिओ

Bharat Gogavale: महामंडळावर बोळवण, मंत्रिपदाची हुलकावणी; भरत गोगावले एसटीचं अध्यक्षपद स्वीकारणार?

NPS Vatsalya Scheme: तुमच्या मुलांनाही मिळणार पेन्शन! महिन्याला गुंतवा हजार, मुलं होतील कोट्याधीश; जाणून घ्या काय आहे योजना

UPI स्कॅम कसा ओळखायचा? तुमचे पैसे सुरक्षित करण्यासाठी या टिप्स करा फॉलो

Mhada Lottery 2024: म्हाडा लॉटरी घरांसाठी शेवटच्या दिवशी 'पेमेंट फेल'चा फटका! घराचे स्वप्न पूर्ण होणार का? शेकडो अर्जदार चिंतेत

SCROLL FOR NEXT