Breast Cancer Saam Tv
लाईफस्टाईल

Metastatic breast cancer: तिसऱ्या-चौथ्या स्टेजच्या ब्रेस्ट कॅन्सर पेशंटसाठी आशेचा किरण; ट्रीटमेंट होणार स्पेशल

breast cancer: गेल्या काही वर्षांमध्ये प्रगत आणि लक्ष्यित उपचारपद्धती, इम्युनोथेरपी, आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि नेक्स्ट जनरेशन डायग्नोस्टिक्सच्या क्षेत्रांमध्ये नव्या वाटा निर्माण करणारी मोठी पावले उचलली गेली आहेत.

Surabhi Jayashree Jagdish

भारतात आणि जगभरातही मेटास्टॅटिक ब्रेस्ट कॅन्सर (MBC) च्या उपचारांमध्ये बदल घडून येतायत. या बदलांमागे औषधशास्त्र आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातील अत्यंत आधुनिक अशा नव्या शोधांची प्रेरणा आहे. नॅशनल लायब्ररी ऑफ सायन्सेसनुसार सुमारे भारतामध्ये ब्रेस्ट कॅन्सरच्या ६० टक्‍के रुग्णांचे निदान हे या आजाराच्या तिसऱ्या व चौथ्या टप्प्यावर होते.

कॅन्सरच्या उपचारांमध्ये होणारे नवे बदल ही केवळ आशा नसून गरजेची बाब आहे. गेल्या काही वर्षांमध्ये प्रगत आणि लक्ष्यित उपचारपद्धती, इम्युनोथेरपी, आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि नेक्स्ट जनरेशन डायग्नोस्टिक्सच्या क्षेत्रांमध्ये नव्या वाटा निर्माण करणारी मोठी पावले उचलली गेली आहेत. त्यामुळे रुग्णांच्या आणि आरोग्यसेवा पुरवणाऱ्यांच्या मनामध्ये नवी आशा निर्माण झाली आहे.

मेटास्टॅटिक कॅन्सरचे भारतातील चित्र

BLK-MAX सुपर स्पेश्यालिटी हॉस्पिटलचे डिरेक्टर मेडिकल ऑन्कोलॉजीस्ट डॉ. चंद्रगौडा दोडगौडर म्हणाले की, मेटास्टॅटिक ब्रेस्ट कॅन्सरच्या विरोधातील लढाईमध्ये भारतासमोर काही आगळीवेगळी आव्हानं उभी राहिलेली आहेत. यातील काही आव्हानांमध्ये आरोग्यसेवा सुविधांची मर्यादित उपलब्धता आणि MBC विषयी जागरुकतेचं कमी प्रमाण या समस्यांचा समावेश आहे. बहुतांश स्त्रिया स्तनांच्या कर्करोगाच्या अखेरच्या टप्प्यावर वैद्यकीय उपचार घेऊ पाहतात, पण या टप्प्यावर उपचारांचे स्वरूप आधीच गुंतागूंतीचे झालं असतं व त्यांचा परिणामही होत नाही.

भारतीय रुग्णांच्या जनुकीय आणि चिकित्सात्मक रूपरेखेनुसार आखण्यात येणाऱ्या नाविन्यपूर्ण उपचारपद्धती वापरात आणणं हे अधिक चांगलं परिणाम प्राप्त करण्याचं आणि आजारातून वाचण्याचं प्रमाण वाढवण्याचे एक महत्त्वपूर्ण धोरण म्हणून उदयास आलं आहे.

केमोथेरपीच्या पुढे पोहोचलेल्या प्रगत उपचारपद्धती

गेल्या काही वर्षांमध्ये मेटास्टॅटिक कॅन्सरच्या उपचारांमध्ये सातत्याने लागलेल्या नवनव्या शोधांमुळे प्रगत उपचारांचे नवनवे पर्याय उपलब्ध झाले आहेत. HER2- पॉझिटिव्ह आणि हार्मोन रिसेप्टर-पॉझिटिव्ह ब्रेस्ट कॅन्सर्ससाठीच्या न्यू-जनरेशन औषधांनी चांगली परिणामकारकता दाखवली आहे. ही उपचारपद्धती कॅन्सरग्रस्त पेशींवर हल्ला करते तर निरोगी ऊतींना सुरक्षित ठेवते. ज्यामुळे दुष्परिणामांचे प्रमाण किमान पातळीवर येतं आणि रुग्णाच्या जीवनमानाचा दर्जा सुधारतो. या उपचारांमुळे अनेक रुग्ण कोणत्याही अडथळ्यांशिवाय दीर्घ आयुष्य जगत आहेत.

इम्युन थेरपीला नवी कलाटणी

डॉ. चंद्रगौडा दोडगौडर यांनी पुढे म्हटलंय की, या उपचारपद्धतीमधील रोगप्रतिकार यंत्रणेला कर्कपेशी शोधण्यास मदत करणाऱ्या इम्युन चेकपॉइंट्स इनहिबिटर्सच्या आशादायी परिणामांपैकी PD-1 आणि PD-L1 ब्लॉकर्सनी कर्कपेशींना मिळणाऱ्या शरीराच्या रोगप्रतिकारक यंत्रणेचा प्रतिसाद सक्रिय करण्याच्या बाबतीत नक्कीच आश्वासक काम केले आहे. प्रत्येक रुग्णाच्या ट्यूमरच्या स्वरूपानुसार तयार केलेल्या वैयक्तीकृत लशी आशेचा नवा किरण म्हणून उदयास येत आहेत. पारंपरिक उपचारपद्धती आधीच अपयशी ठरतात अशा ठिकाणी ठोस प्रतिसाद पुरवतेय.

नेक्स्ट-जेन डायग्नोस्टिक्स

उपचारांना मिळणाऱ्या प्रतिसादावर देखरेख ठेवणे आणि मेटास्टॅसिसचे लवकरात लवकर निदान हे MBC च्या व्यवस्थापनातील महत्त्वाचे घटक आहेत. यावर्षी रक्तात अभिसरित ट्यूमर DNA चे विश्लेषण करणाऱ्या लिक्विड बायोप्सीज- मिनिमली इन्व्हेजिव्ह चाचण्या प्रगत निदानपद्धतींचा आधारस्तंभ म्हणून उदयास आल्या आहेत. खुद्द हाय-रेझोल्युशन इमेजिंग तंत्रज्ञानांनीही आजाराच्या फैलावाचा मागोवा घेण्याच्या तंत्रामध्ये प्रगती केली आहे व वेळच्या वेळी वैद्यकीय हस्तक्षेप होण्यास आवश्यक असलेला निदानातील अभूतपूर्व अचूकपणा साध्य केला आहे.

मेटास्टॅटिक ब्रेस्ट कॅन्सरवरील उपचारांमध्ये AI प्रीसिशन मेडिसीनचा उदय

आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या रेण्वीय रूपरेखा वेगाने साकारण्याच्या, पूर्वानुमानावर आधारित विश्लेषण पुरविण्याच्या आणि रोगाचे लवकरात लवकर निदान करण्याच्या क्षमतेमुळे मेटास्टॅटिक ब्रेस्ट कॅन्सरच्या निदानाचा व उपचारांचा चेहरामोहरा बदलत आहे. AI अल्गोरिदम्समुळे ट्यूमरच्या स्वरूपाचे चटकन विश्लेषण करता येते व त्यावरील उपचारासाठी सर्वात प्रभावी वैयक्तिकृत उपचारपद्धतींची निवड करता येते, हे करताना प्रेडिक्टिव्ह टूल्सच्या मदतीने आजार कशाप्रकारे वाढेल याचे पूर्वानुमान काढता येते आणि त्यानुसार उपचारांच्या नियोजनामध्ये आधीच बदल करता येतात.

यामध्ये अशाही संसाधनांचा समावेश आहे, जी जोखमीचे स्वरूप समजून घेत कर्करोगावर उपचार करण्याच्या पद्धतींचे लोकशाहीकरण करतील. या संसाधनांमुळे ज्या ठिकाणी इमेजिंग तज्ज्ञ उपलब्ध नाहीत अशा ठिकाणीही आजाराचे लवकरात लवकर निदान होण्यास मदत करणारी विश्लेषणे उपलब्ध होऊ शकतील. सेंटर फॉर फोर्थ इंडस्ट्रियल रेव्होल्युशन इंडियासारखे उपक्रम वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या सहाय्याने शहरी आणि ग्रामीण अशा दोन्ही भागांत प्रीसिशन मेडिसीन उपलब्ध करण्याच्या प्रयत्नांमध्ये AI आणि मशीन लर्निंग तंत्रज्ञान समाविष्ट करून घेत या बदलांना वेग मिळवून देतील अशी अपेक्षा आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Raj Thackeray: कुणाची माय व्यायली त्यांनी...; राज ठाकरेंचं खणखणीत भाषण, वाचा १० महत्वाचे मुद्दे

Raj Thackeray-Uddhav Thackeray: 'एकत्र आलोय एकत्र राहण्यासाठी...', राज - उद्धव ठाकरेंचे मराठी विजय मेळ्याव्यातील अभूतपूर्व क्षण

Green Bangles Shravan : श्रावण महिन्यात सुवासिनी हिरव्या बांगड्या का घालतात?

ब्रेकऐवजी अ‍ॅक्सिलरेटर दाबलं अन् कार थेट गंगेत; नाविकांनी वाचवले नवऱ्या-बायकोचे प्राण;VIDEO

Vijay Melava Worli: 'ऐ काका उठना.....' राज ठाकरेंनी सांगितला बाळासाहेबांसोबतचा तो किस्सा, पाहा, VIDEO

SCROLL FOR NEXT