Honda CB300F Bike  Saam Tv
लाईफस्टाईल

Honda CB300F: होंडाची 300cc बाईक लाँच! कमी किमतीत जबरदस्त परफॉर्मन्स; जाणून घ्या फिचर्स

Honda CB300F Bike launch : होंडाने नवीन बाईक भारतात लॉंच केली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Honda CB300F Bike Price And Features

होंडाने नवीन बाईक भारतात लॉंच केली आहे. ही बाईक CB300F ची अपडेटेड व्हर्जन आहे. ही बाईक नवीन किंमत आणि फिचर्ससह बाजारात उपलब्ध आहे. विशेष म्हणजे, या बाईकची किंमत कमी करण्यात आली आहे. त्यामुळे जर तुम्ही नवीकोरी बाईक घ्यायचा विचार करत असाल तर ही बाईक सर्वोत्तम पर्याय आहे.

होंडाडा मोटारसायकल आणि स्कूटर इंडिया (HMSI)ची ही नवीन बाईक BSVI फेज-2 च्या नवीन मानकांनुसार तयार करण्यात आली आहे. ही बाईक आकर्षक लूक आणि पावरफुल इंजिनने सुसज्ज आहे. या बाईकची किंमत 1.70 लाख रुपये ठेवण्यात आली आहे. ही बाईक कंपनीच्या सर्व बिंगविंग डिलरशिपवर उपलब्ध आहे.

पॉवर आणि परफॉर्मन्स

होंडा मोटारसायकल आणि स्कूटर इंडियाचे संचालक, अध्यक्ष आणि सीईओ सुत्सुमु ओटानी यांनी बाईकबद्दल माहिती दिली. ही बाईक ग्राहकांच्या गरजेनुसार तयार करण्यात आली आहे. या बाईकमध्ये 293cc क्षमतेचे ऑइल कूल्ड, 4- स्ट्रोक सिंगल सिंलेडर देण्यात आले आहे. हे PGMI-Fi इंजिन आहे. हे इंजिन 24.5PS ची पॉवर आणि 25.6Nm चा पीक टॉर्क जनरेट करते. इंजिन 6-स्पीड गिअरबॉक्ससह जोडलेले आहे. असं त्यांनी सांगितले.

वैशिष्ट्ये

Honda CB300Fमध्ये यूएसडी फ्रंट फोर्क्स आणि मागील बाजूस 5-स्टेप अॅडजस्टेबल मोनोशॉक सस्पेंशन वापरण्यात आले आहे. ड्युअल-चॅनल अँटी-लॉक ब्रेकिंग सिस्टम (ABS) आणि हॉंडा सिलेक्टेबल टॉर्क कंट्रोल (HSTC)सह ड्युअल डिस्क ब्रेकसह सुसज्ज आहे. या बाईकमध्ये समोर 276 mm रियर डिस्क ब्रेक आणि 220 mm रियर डिस्क ब्रेक आहे. 

या बाईकमध्ये स्लिपर क्लच, होंडा स्मार्टफोन व्हॉईस कंट्रोल सिस्टीम आणि ऑल-एलईडी लाइटिंग सिस्टम देण्यात आली आहे. याशिवाय स्पीडोमीटर, ओडोमीटर, टॅकोमीटर, फ्यूएल गॅस, ट्विन ट्रिप मीटर, गियर पोझिशन इंडिकेटर यासारखी डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर दिले आहे. ही बाईक डिलक्स प्रो या एकाच प्रकारात उपलब्ध आहे. ग्राहक स्पोर्ट रेड, मॅट मार्वल ब्लू मेटॅलिक आणि मॅट अॅक्सिस ग्रे मेटॅलिक पेंट स्कीममधून बाईक खरेदी शकतात. 

किंमत

ही बाईक पहिल्यांदा लॉंच केली होती, तेव्हा तिची किंमत २.२९ लाख रुपये होती. यानंतर तिची किंमत जवळपास ५०,००० रुपयांनी कमी करण्यात आली आहे. आता या किंमतीत अजून ६००० रुपयांनी कपात करण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dhule News: पांझरा नदीला पूर, दुचाकीस्वाराचा जीवघेणा प्रवास, स्थानिकांच्या मदतीनं बचावला; काळाजाचा ठोका चुकवणारा VIDEO

मीरा भाईंदरचे पोलीस आयुक्त मधुकर पांडे यांची उचलबांगडी, निकेत कौशिक यांची नियुक्ती

Mathri Recipe : चिप्स, कुरकुरे सोडा; मुलांसाठी घरीच कुरकुरीत 'मठरी' बनवा

बाहुबली फेम प्रसिद्ध कलाकाराचं निधन; मुलगा ऑस्कर विजेता, सिनेसृष्टी शोकसागरात बुडाली | Bahubali

Maharashtra Live News Update : भंडारा जिल्हा प्रशासनाकडून शाळांना आज आणि उद्या सुट्टी; हवामान विभागाकडून रेड अलर्ट

SCROLL FOR NEXT