Healthy Drinks For Summer | Healthy Tips for Summer Saam Tv
लाईफस्टाईल

Healthy Drinks: उन्हाळ्यात शरीर थंड ठेवण्यासाठी घ्या 'हे' पाच घरगुती अन् रीफ्रेशिंग पेये!

उन्हाळ्यात स्वतःला हायड्रेट (Hydrate) ठेवण्यासाठी पाणी किंवा इतर कोणत्याही आरोग्यदायी पेयांचे सेवन करणे महत्त्वाचे आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Healthy Drinks In Summer: उन्हाळ्यात डिहायड्रेशन होणे ही एक सामान्य गोष्ट आहे. उन्हाळ्यात जास्त घाम आल्याने शरीरातून अनेक हायड्रेशन मिनरल्स नष्ट होतात यामुळे डिहायड्रेशन होते. त्यामुळे स्वतःला हायड्रेट (Hydrate) ठेवण्यासाठी पाणी किंवा इतर कोणत्याही आरोग्यदायी पेयांचे सेवन करणे महत्त्वाचे आहे.

उन्हाळ्यात ताक, आम पन्ना, नारळ पाणी आणि बेल शरबत यांसारखी अनेक आरोग्यदायी पेये शरीराला थंडावा देतात. हे पेय स्वादिष्ट तसेच आरोग्यदायी असतात. ते जीवनसत्त्वे, पोटॅशियम, सोडियम, मॅग्नेशियम आणि लोह सारख्या पोषक तत्वांनी समृद्ध आहेत. ते तुम्हाला उत्साही ठेवण्याचे काम करतात. (Healthy Drinks For Summer)

जाणून घेऊयात या पेयांबद्दल-

Buttermilk

ताक;

दही, भाजलेले जिरेपूड, काळे मीठ आणि भाजलेले हिंग एकत्र करून ताक बनवले जाते. हे एक प्रोबायोटिक पेय आहे. हे शरीराला थंड ठेवण्याचे काम करते. यामुळे शरीर हायड्रेट राहते. ताक पचनसंस्था निरोगी ठेवते.

Green Mango Juice

आम पन्ना;

आम पन्ना हे आरोग्यदायी आणि लोकप्रिय पेय आहे. उन्हाळ्यात याचे भरपूर प्रमाणात सेवन केले जाते. हे चविष्ट तर आहेच पण आरोग्यासाठीही खूप फायदेशीर आहे. आम पन्ना हा हिरवा आंबा, जिरे, पुदिना, मीठ, गूळ इत्यादीपासून बनवला जातो. त्यात भरपूर जीवनसत्त्वे A, B1, B2, C आणि पोटॅशियम, सोडियम, मॅग्नेशियम आणि लोह असते. त्वचा आणि आरोग्यासाठी हे खूप फायदेशीर ठरते.

Coconut Water

नारळ पाणी;

नारळ पाणी हे उन्हाळ्याच्या दिवसामध्ये अतिशय आरोग्यदायी पेय आहे. उन्हाळ्यात याच्या सेवनाने शरीर हायड्रेट राहण्यास मदत होते. नारळाचे नैसर्गिक पाणी पौष्टिकतेने परिपूर्ण आहे. हे पेय फायबर, कॅल्शियम, मॅग्नेशियम, लोह, सोडियम आणि पोटॅशियमने समृद्ध असते. हे शरीराला हायड्रेट ठेवण्याचे काम करते.

Syrup

बेल शरबत;

बेल शर्बत हे एक उत्तम डिटॉक्स पेय आहे. हे शरीर थंड आणि ताजे ठेवण्याचे काम करते. त्याची चव गोड आणि आंबट असते. यामुळे तुमच्या शरीराला खूप थंडावा मिळतो. त्यात भरपूर जीवनसत्त्वे आणि खनिजे असतात. हे त्याच्या गुणधर्मामुळे उन्हाळ्यासाठी आरोग्यदायी पेय आहे. याशिवाय बेल सरबत पचायला सोपे असते. हे शरीराला हायड्रेट ठेवण्याचे काम करते.

Sattu

सत्तू;

सत्तू हे ऊर्जेचे पॉवरहाऊस आहे. यामध्ये लोह, सोडियम, मॅग्नेशियम, मॅंगनीज आणि प्रथिने मुबलक प्रमाणात असतात. याशिवाय सत्तूमध्ये फायबर भरपूर प्रमाणात असते. हे पचनसंस्था (Digestive system) निरोगी ठेवण्यास मदत करते

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT