Homemade Cockroach Killer Saam TV
लाईफस्टाईल

Homemade Cockroach Killer : किचनमध्ये झुरळांचा सुळसुळाट झालाय? 'या' टिप्सने एक एक कॉक्रोज मिनिटांत पळून जाईल

Safe & Effective Cockroach Killer : घरात जास्त झुरळ असतील तर येथील व्यक्ती सतत आजारी पडत असतात. त्यामुळे आज या झुरळांचा कायमचा नायनाट कसा करायचा याची माहिती जाणून घेणार आहोत.

Ruchika Jadhav

सध्या पावसाळा सुरू आहे. पावसाळ्यात घरात अनेक प्रकारचे कीटक दिसतात. यामध्ये घरात झुरळ येणे ही तर प्रत्येक घराघरातील समस्या आहे. झुरळ हे कीटक घरात सर्वत्र फिरत राहतात. विविध वस्तूंसह जेवणाच्या भांड्यावर सुद्धा फिरतात. आपण त्या वस्तू वापरल्यास लगेचच आजारी पडतो. घरात जास्त झुरळ असतील तर येथील व्यक्ती सतत आजारी पडत असतात. त्यामुळे आज या झुरळांचा कायमचा नायनाट कसा करायचा याची माहिती जाणून घेणार आहोत.

बोरिक पावडर

झुरळांना घरातून पळवून लावायचे असेल तर त्यासाठी बोरिक पावडर मदत करेल. त्यासाठी सर्वात आशी एक चमचा बोरिक पावडर घ्या. यामध्ये एक चमचा साखर पावडर मिक्स करा. त्यानंतर ही पावडर घरात ज्या ठिकाणी झुरळ येतात तिथे पसरवून ठेवा. या ट्रिकमुळे तुमच्या घरात कधीच एकही झुरळ घरात प्रवेश करणार नाही.

बेकिंग सोडा

बोरिक पावडर वापरण्याऐवजी तुम्ही बेकिंग सोडा सुद्धा वापरू शकता. बेकिंग पावडर म्हणजेच खाण्याचा सोडा घरात सहज उपलब्ध होतो. एक चमचा बेकिंग सोडा घ्या. यामध्ये एक चमचा पिठी साखर मिक्स करा.आता तुमच्या घरात ज्या ठिकाणी झुरळ येत असतील तेथे ही पावडर पसरवून ठेवा. असे केल्याने झुरळ घरातून बाहेर पळून जातील.

लवंग

तिखट लवंग सुद्धा झुरळांचा नायनाट करण्यासाठी उपयुक्त आहे. घरात ज्या ठिकाणी झुरळ येतात तिथे लवंग टाकून ठेवा. तुम्ही या ऐवजी घरात लवंगचे तेल सुद्धा स्प्रे करू शकता. त्याने सुद्धा झुरळांना पळवून लावता येईल.

कडू लिंबाची पाने

घरात जेवणाचे विविध पदार्थ असतात. त्यामुळे बेसिंगमध्ये झुरळ होतात. झुरळांना मारण्यासाठी तुम्हाला कडू लिंबाच्या पानांचाही उपयोग होईल. त्यासाठी आधी कडू लिंबाची पाने घरात पसरवून ठेवा. ही ट्रिक फेल गेली तर मग कडू लिंबाच्या पानांची पावडर झुरळ येत असलेल्या ठिकाणी टाकून ठेवा.

पुदिन्याची पाने

पुदिन्याची पाने आपल्या आरोग्यासाठी उपयुक्त आहेत. मात्र झुरळांसाठी घातक आहेत. पुदिन्याच्या पानांमुळे घरात कधीच झुरळे येत नाहीत. झुरळांना पळवून लावण्यासाठी तुम्ही सुद्धा पुदिन्याची पाने किंवा या पानांची पावडर घरात टाकून ठेवू शकता.

टीप : ही सामान्य माहिती आहे. आम्ही या माहितीचा कोणताही दावा करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

दुबईच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर हल्ला; प्रवाशांमध्ये एकच खळबळ, VIDEO

Maharashtra Live News Update: केडीएमसी स्थायी समिती सभापतीपदावरून शिवसेना आक्रमक,तडजोडीला नकार – अरविंद मोरे

Vastu Shastra : घरात झोपताना डोके कोणत्या दिशेला ठेवावे? वास्तूशास्त्रात काय सांगितलंय? जाणून घ्या

Shocking: लटकलेल्या अवस्थेत वडील, तर जमिनीवर आईचा मृतदेह; घरातील दृश्य पाहून सगळेच हादरले

Artist Death: मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीवर शोककळा; ३१ वर्षीय कलाकाराचे अकाली निधन

SCROLL FOR NEXT