Which direction is best to install a geyser in the bathroom according to Vastu Shastra? saam tv
लाईफस्टाईल

Home Vastu Tips : घरात गिझर कोणत्या दिशेला बसवावा? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या योग्य दिशा

Which direction is best to install a geyser in the bathroom : हिवाळ्यात गरम पाण्यासाठी गिझरचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. मात्र, घरात गिझर बसवताना त्याची दिशा योग्य असणेही महत्त्वाचे मानले जाते.

Saam TV News

घर बांधताना किंवा घराचे नूतनीकरण करताना अनेकजण वास्तुशास्त्राचा विचार करतात. घरातील फर्निचरपासून स्वयंपाकघर, बाथरूम आणि इलेक्ट्रॉनिक उपकरणांच्या मांडणीपर्यंत अनेक गोष्टींची काळजी घेतली जाते. त्यापैकीच एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे बाथरूममध्ये बसवण्यात येणारा गिझर. वास्तुशास्त्रानुसार गिझर कोणत्या दिशेला बसवावा आणि कोणत्या गोष्टी टाळाव्यात, जाणून घ्या.

गिझर बसवण्यासाठी आग्नेय दिशा शुभ

वास्तुशास्त्रानुसार, गिझर हे विद्युत उपकरण असून त्याचा संबंध अग्नी तत्त्वाशी जोडला जातो. त्यामुळे बाथरूममध्ये गिझर बसवण्यासाठी दक्षिण-पूर्व म्हणजेच आग्नेय दिशा योग्य मानली जाते. या दिशेला अग्नीचे स्थान असल्याची मान्यता आहे. त्यामुळे या ठिकाणी गिझर बसवल्यास घरातील सकारात्मक ऊर्जा टिकून राहते, असे वास्तुशास्त्रात सांगितले जाते.

ईशान्य दिशेला गिझर बसवणे टाळा

वास्तुशास्त्रानुसार, ईशान्य दिशा ही जलतत्त्वाशी संबंधित मानली जाते. त्यामुळे या दिशेला गिझरसारखे अग्नितत्त्वाशी संबंधित उपकरण बसवणे टाळावे, असे सांगितले जाते. पाणी आणि अग्नी या परस्परविरोधी तत्त्वांचा समतोल राखण्यासाठी गिझरची जागा योग्य असावी, अशी मान्यता आहे.

गिझर बसवताना घ्या ही काळजी

गिझर बसवताना केवळ वास्तुदिशाच नव्हे, तर सुरक्षिततेलाही प्राधान्य द्या. गिझर योग्य उंचीवर आणि हवेशीर ठिकाणी बसवावा. इलेक्ट्रिक गिझरसाठी योग्य अर्थिंग, सुरक्षित वायरिंग आणि योग्य क्षमतेचा सर्किट ब्रेकर असणे आवश्यक आहे. गॅस गिझरच्या बाबतीत पुरेसे वायुवीजन आणि योग्य धूरनिस्सारण व्यवस्था असणे अत्यंत महत्त्वाचे आहे.

टीप : वरील माहिती वास्तुशास्त्रातील पारंपरिक मान्यतांवर आधारित आहे. याला वैज्ञानिक आधार नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: पुण्यात सिंहगड रोडवरील माणिकबाग खाऊ गल्लीतील सहा खाद्य व्‍यावसायिकांवर एफडीएची कारवाई

Higher Pension Update: पेन्शनधारकांसाठी मोठी बातमी! EPFO हायकोर्टाच्या निर्णयांना देणार आव्हान; नेमकं काय घडणार?

साताऱ्यात भाजपला जोरदार धक्का! शिंदेसेना आणि राष्ट्रवादीच्या खेळीने जिल्हा बँकेत नवी समीकरणे, पाहा कुणाची झाली निवड?

Road Accident: खोल दरीत कार कोसळली; कारचा चेंदामेंदा, भीषण अपघातात ६ मित्रांचा जागीच मृत्यू

Helth Tips : रोज अॅसिडिटीचा त्रास होतोय? गोळी घेतल्याने आराम मिळतो, पण पोटात पुन्हा-पुन्हा जळजळ का होते?

SCROLL FOR NEXT