How to get rid of gas and acidity problem Saam Tv
लाईफस्टाईल

Remedies for Gas and Acidity: उन्हाळ्यात अपचन- अ‍ॅसिडीटीचा त्रास होतोय? हे घरगुती उपाय करुन पाहा, मिळेल आराम

Home Remedies For Acidity And Gas Problem: उन्हाळ्यात आपल्या पचनाच्या संबंधित अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. यामध्ये पोटात गॅस होणे, सूज येणे किंवा पोट दुखू लागणे यांसारख्या आजारांना आपण बळी पडतो.

कोमल दामुद्रे

Acidity-Gas Problem Var Upay (in Marathi):

उन्हाळ्यात आपल्या पचनाच्या संबंधित अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. यामध्ये पोटात गॅस होणे, सूज येणे किंवा पोट दुखू लागणे यांसारख्या आजारांना आपण बळी पडतो.

चुकीच्या खाण्यापिण्याच्या सवयींमुळे अनेकदा ही समस्या उद्भवते. सोडा, च्युइंगम चघळणे, मद्यपान करणे, धुम्रपान करणे किंवा पटापट खाणे यांसारख्या गोष्टी केल्यामुळे अपचन आणि अॅसिडीटीचा त्रास होऊ शकतो.

याशिवाय ब्रोकोली, राजमा, मटार, कडधान्ये इत्यादी फायबरयुक्त पदार्थांमुळे गॅसची समस्या उद्भवू शकते. तसेच यामध्ये काही लोकांना दूध, दही किंवा चीजमुळे गॅसची (Gas) समस्या देखील होऊ शकते. यासाठी याचे नियंत्रित सेवव करायला हवे.

अन्नाचे पचन नीट न झाल्याने पचनसंस्थेत वायू अडकतो, त्यामुळे पचनसंस्थेवर दाब पडू लागतो. ज्यामुळे गॅस आणि अॅसिडीटीच्या समस्येमुळे पोटदुखीचा त्रास होतो. जर तुम्हालाही असा त्रास होत असेल तर हे घरगुती उपाय (Home Remedies) करुन पाहा.

1. शारीरिक हालचाल

शरीराची योग्यप्रकारे हालचाल होणे गरजेचे आहे. एकाच ठिकाणी बसून राहिल्यामुळे शरीरासोबत आतड्यांची हालचाल थांबते. अशावेळी आतड्यांसंबंधी स्नायूंना झटकून टाकते. शरीराची हालचाल केल्यास पचनसंस्थेतून वायू बाहेर पडण्यास मदत करते.

2. अ‍ॅपल व्हिनेगर

गॅस, ब्लोटिंग आणि अपचन यांसारख्या समस्येपासून आराम मिळवण्यासाठी घरगुती उपाय करा. यासाठी कोमट पाण्यात एक चमचा अ‍ॅपल व्हिनेगर टाका आणि ते प्या. ज्यामुळे आराम मिळेल.

3. बडीशेप

बडीशेप नीट चावून खाल्ल्याने लाळेमध्ये मिसळून पोटदुखी (Stomach Pain) आणि गॅसेसची समस्या कमी करण्यास मदत करते. यासाठी याचे उन्हाळ्यात सेवन करा.

4. वॉक करा

जेवल्यानंतर किंवा पोट गच्च भरले आहे असे वाटू लागल्यावर वॉक करा. ज्यामुळे गॅस बाहेर निघण्यास मदत होईल.

5. योग

बालासनामुळे गॅसेसच्या समस्यापासून सुटका होते. यामुळे गॅस आणि अपचनाची समस्येपासून सुटका हवी असल्यास योगासने करा.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Baramati : बारामतीच्या शेवटच्या सभेत शरद पवारांचा बोलबाला; काका-पुतण्याच्या लढाईत बारामतीकर कुणासोबत? पाहा स्पेशल रिपोर्ट

Amravati : भाजप आमदाराच्या बहिणीवर जीवघेणा हल्ला; राजकीय वर्तुळात खळबळ

Nashik: नाशिकमध्ये पुन्हा एकदा राडा; भाजप आणि शरद पवार गटात तुंबळ हाणामारी| Video

Maharashtra News Live Updates: मुंबईतून रोकड जप्त होण्याचं सत्र सुरूच, एक्स्प्रेसमधून ४२ लाखांची रोकड जप्त

Jharkhand Election: झारखंड विधानसभा प्रचार सभांच्या तोफा थंडावल्या; मुख्यमंत्र्यांची प्रतिष्ठपणाला

SCROLL FOR NEXT