देवघरातील काळवंडलेल्या मुर्त्या साफ करण्यासाठी करा 'हे' घरगुती उपाय 
लाईफस्टाईल

देवघरातील काळवंडलेल्या मुर्त्या साफ करण्यासाठी करा 'हे' घरगुती उपाय

भारतीय महिलांना खासकरुन गृहिणींना सकाळी सर्वात आधी देवपुजा करण्याची सवय असते.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

भारतीय महिलांना (Indian Womens) खासकरुन गृहिणींना सकाळी सर्वात आधी देवपुजा करण्याची सवय असते. पण कुटुंबात अनेक वर्षांपासून देवघरात पिढ्यानपिढ्याच्यां देवाच्या मुर्त्या (Idols) असतात. अनेक वर्षांपासून देवघरात असलेल्या या मुर्त्या काळ्या पडतात आणि त्यांची चमक कमी होते. महिला मुर्त्या साफ करण्यासाठी अनेकदा भांडी घासायचं लिक्विड किंवा पावडर वापरली तरी त्या जुनाटच दिसतात. अशा वेळी या मुर्ती साफ करण्यासाठी काही सोप्या टिप्स आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

हे देखील पहा-

१. चिंचेचा वापर (tamarind)

चिंचेच्या वापराने देवघरातील मूर्त्या साफ कराव्यात. चिंचेने साफ करण्यासाठी चिंच 15 मिनिटं पाण्यामध्ये भिजवून ठेवा. भिजवून ठेवलेली चिंच सॉफ्ट झाली की स्मॅश करुन त्याचा लगदा एका स्क्रबप्रमाणे मूर्तीवर घासा. 10 मिनिटे तसेच ठेवा. त्यानंतर पाण्याने धुवा.

२. टोमॅटो केचप (Tomato ketchup)

देवघरातील मूर्ती साफ करण्यासाठी टोमॅटो केचप मुर्त्यांवर टाका आणि काही मिनिटे स्वच्छ घासून घ्या. पितळेच्या भांड्यांवर पडलेले डाग साफ करण्यासाठी टोमॅटो केचप, सॉस, टोमॅटोची पेस्ट लावल्यानेही काळवंडलेल्या मूर्ती स्वच्छ होतात. टोमॅटो केचपने मूर्त्या साफ केल्यानंतर त्यांना साबणाने धुवा

३. बेकिंग सोडा आणि लिंबू (Baking soda and lemon)

लिंबाच्या रसामध्ये 1 चमचा बेकिंग सोडा मिक्स करून पेस्ट तयार करा. ही पेस्ट कापडाच्या साहाय्याने मूर्तीवर लावून 30 मिनिटे ठेवा. नंतर गरम पाण्याने धुवा.

४. मीठ आणि लिंबू (Salt and lemon)

देवघरातील पितळेच्या मूर्ती साफ करण्यासाठी अर्धा लिंबाच्या रसात 1 चमचा मीठ घाला. लिंबू आणि मीठाची ही पेस्टमूर्तीवर घासा आणि 5 मिनिटांनी कोमट पाण्याने स्वच्छ धुवा.

५. मीठ आणि व्हिनेगर (Salt and vinegar)

पितळेच्या काळ्या पडलेल्या मूर्तीसाठी मीठ आणि व्हिनेगर या पदार्थांची पेस्ट काळ्या पडलेल्या पितळेच्या मूर्तीवर लावा. एक तासानंतर गरम पाण्याने धुवा.

Edited By- Anuradha

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: काका चुकांवर पांघरुण घालायचे, दादांना शरद पवारांची आठवण का आली

आय लव्ह मोहम्मद आणि आय लव्ह महादेव; देशभरात रंगलेला बॅनर वाद आणि त्यामागची खरी कारणे

Maharashtra Politics : शिंदे गटाच्या नेत्याच्या मुलाला मारण्यासाठी ४ कोटींची सुपारी; पोलिसांत गुन्हा दाखल, राजकीय वर्तुळात खळबळ

Ladki Bahin Yojana: सरकारी लाडकीला दणका, 15 कोटी वसूल करणार

Belly Fat: पोटाची चरबी वाढलीये? फॉलो करा 'या' सोप्या टिप्स, पोटाचा घेर होईल कमी

SCROLL FOR NEXT