Chicken Biryani Recipe Saam Tv
लाईफस्टाईल

Chicken Biryani Recipe: घरच्या घरी बनवा हॉटेलसारखी चिकन बिर्याणी, चव चाखतच राहाल; पाहा रेसिपी

Home Made Hotel Style Chicken Biryani : रेडिमेड हॉटेल स्टाईलसारखी बिर्याणीची चव चाखायची असेल तर या सोप्या टिप्स फॉलो करा.

कोमल दामुद्रे

Weekend Special Recipe :

वीकेंड आला किंवा कुठलीही पार्टी असली बिर्याणी शिवाय तो पूर्ण होऊच शकत नाही. बिर्याणीचं नाव ऐकताच अनेकांच्या तोंडाला पाणी सुटते. लग्न, पार्टी, सण, वाढदिवस किंवा कोणताही खास क्षण असला की, आपण सगळ्यात सोपी आणि परफेक्ट डिश म्हणून बिर्याणीला प्राधान्य देतो.

बऱ्याचदा आपण हॉटेलमध्ये गेल्यावर बिर्याणीची चव चाखतो परंतु, घरी आल्यानंतरही त्याची चव जिभेवर टिकून राहाते. घरी बनवताना याची हॉटेलसारखी टेस्ट येत नाही. पण रेडिमेड हॉटेल स्टाईलसारखी बिर्याणीची चव चाखायची असेल तर या सोप्या टिप्स फॉलो करा. बनेल एकदम परफेक्ट आणि चविष्ट

1. Ingredients / साहित्य (1 किलो चिकन बिर्याणी साठी)

  • Chicken / चिकन 1 kg

  • Long grain biryani Rice / बिर्याणी तांदूळ 750 gms (or 1 kg)

  • Onion / कांदे 500 gms

  • Fresh curd / ताजे दही 250gms

  • Kashmiri red chilly powder / कश्मीरी लाल मिरची पावडर

  • Turmeric / हळद 1/2 tsp

  • Green chilies / हिरव्या मिरच्या 2-3

  • Fresh coriander / कोथिंबीर 2 - 3 tbsp

  • Mint leaves / पुदीना 20-25

  • Salt / मीठ

  • Garam masala pw / गरम मसाला पावडर 2 tsp

  • Cinnamon / दालचीनी 3 inch

  • Cumin seeds / जिरे 1 tsp

  • Cloves / लवंग 4-5

  • Green cardamom / हिरव्या वेलची 5

  • Ginger garlic paste / आले लसुण पेस्ट 4 tsp

  • Fried onion / तळलेले कांदे

  • Oil / तेल 1/2 cup

  • Saffron or plain milk / दूध 1/2 cup

2. भात बनविण्यासाठी

  • Rice / तांदूळ 750 gms

  • Cumin seeds / जिरे 1 tsp

  • Cinnamon / दालचीनी 1

  • Star anise / चक्री फूल 1

  • Bay leaves / तमालपत्र 4

  • Salt / मीठ

  • Lemon juice / लिंबू रस 1 tbsp

  • Mint leave / पुदीना पाने 10-12

  • Fresh coriander / कोथिंबिर

3. थर देताना -

  • Saffron soaked milk / केशर दूध 1/2 cup

  • Ghee / तूप 4 tsp

  • Fresh coriander / कोथिंबीर 2 tbsp

  • Mint leaves / पुदीना 7-8

  • Fried onion / तळलेला कांदा

4. कृती

  • सर्वप्रथम गॅसवर कढई ठेवून तेल कडकडीत गरम करुन घ्या. उभे चिरलेले कांद्याचे काप कुरकुरीत होईलपर्यंत तळून घ्या.

  • तळलेला कांदा प्लेटमध्ये काढून घ्या. त्यानंतर कुकरमध्ये चिकन, दही, लाल मिरची पावडर, हळद, लिंबाचा रस, मीठ, हिरवी मिरची, दालचिनी, लवंग, वेलची, जिरे, कोथिंबीर, पुदीन्याची पाने, आले-लसूण पेस्ट, गरम मसाला आणि केशरचे दूध घाला.

  • नंतर त्यात तळलेला कांदा आणि तेल घालून चांगले मिक्स करुन झाकूण ठेवा. एका पातेल्यात पाणी गरम करायला ठेवून त्यात खडा मसाला घाला. वरुन कोथिंबीर, पुदिन्याची पाने आणि मीठ गरम पाण्यात घाला. लिंबू पिळा

  • पाणी उकळवल्यानंतर भिजवलेला तांदूळ त्यात घाला. पाण्याला उकळी आल्यानंतर अर्धा शिजलेला भात तयार केलेल्या चिकनच्या मिश्रणावर पसरवून घ्या. वरुन केशरी दूध आणि तूप घाला. कोथिंबीर, पुदिन्याची पाने आणि तळलेला कांदा घालून गार्निश करा.

  • कुकरच्या शिट्ट्या झाल्यानंतर थोड्यावेळाने चेक करा. मग सर्व्ह करा गरमा गरम चिकन बिर्याणी.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT