HIV Positive Person Precautions saam tv
लाईफस्टाईल

How HIV spreads: फक्त शरीरसंबंधांतून नाही, 'या' चुकांमुळंही होतो एड्स; काय काळजी घ्याल?

HIV Positive Person Precautions: एचआयव्हीचा संसर्ग फक्त शारीरिक संबंधातून होतो, असा अनेकांचा समज आहे. पण, हे पूर्णपणे सत्य नाही. लैंगिक संबंधांव्यतिरिक्तही काही चुकांमुळे हा गंभीर संसर्ग पसरू शकतो, ज्याकडे अनेक लोक दुर्लक्ष करतात.

Surabhi Jayashree Jagdish

HIV हा एक असा व्हायरस आहे जो शरीराला हळूहळू आतून कमकुवत करत जातो. अनेकांना वाटतं की हा आजार फक्त असुरक्षित लैंगिक संबंधांमुळे होतो, पण खरं तर यापेक्षा अधिक गंभीर आहे आणि समाजात याबाबत जागरूकतेची खूप गरज आहे. आजही आपल्या समाजात HIV/AIDS बाबत अनेक गैरसमज आहेत.

अनेक जण याला केवळ लैंगिक संबंधांशी जोडलेली गोष्ट समजतात, पण काही अगदी सामान्य वाटणाऱ्या सवयीही या विषाणूच्या प्रसाराचं कारण ठरू शकतात. तज्ज्ञांच्या मते, HIV केवळ लैंगिक संबंधांमुळे पसरतो असं नाही. संक्रमित रक्त, एकाच सुईचा वापर किंवा वैयक्तिक वस्तूंचा इतरांनी वापर केल्यामुळेही हा आजार होऊ शकतो.

संक्रमित रक्त

जर रक्त चढवण्याआधी HIV ची तपासणी केली गेली नाही तर विषाणू थेट शरीरात जाऊ शकतो. विशेषतः गावांमध्ये किंवा अप्रमाणित वैद्यकीय सुविधांमध्ये याचा धोका अधिक असतो.

सुई किंवा इंजेक्शनचा वापर

ड्रग्ज घेणारे किंवा एखाद्या आजारामुळे सतत इंजेक्शन घेणारे जर एकाच सुईचा वापर करत असतील तर HIV झपाट्याने पसरू शकतो.

संक्रमित व्यक्तीच्या वैयक्तिक वस्तूंचा वापर

रेझर, ब्लेड, टूथब्रश अशा वस्तूंवर जर संक्रमित व्यक्तीच्या रक्ताचे अंश असतील आणि त्या जर दुसऱ्याने वापरल्या, तर ही समस्या होण्याचा धोका असतो.

गर्भावस्था

जर एखादी महिला HIV पॉझिटिव्ह असेल आणि तिच्यावर उपचार सुरू नसतील तर गर्भात किंवा स्तनपानादरम्यान बाळालाही हा व्हायरस होऊ शकतो.

HIV पॉझिटिव्ह व्यक्तींनी कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी?

  • आपल्या वैयक्तिक वस्तू इतरांबरोबर कधीच शेअर करू नयेत.

  • नेहमी संरक्षित लैंगिक संबंध ठेवावेत.

  • डॉक्टरांनी दिलेली औषधं वेळेवर घ्यावीत, अँटीरेट्रोव्हायरल थेरपी नियमितपणे घ्यावी.

  • HIV पॉझिटिव्ह व्यक्तींनी कधीच रक्तदान करू नये.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

8th Pay Commission: सरकारी कर्मचाऱ्यांना लॉटरी लागणार! आठव्या वेतन आयोगात पगारवाढीचा फॉर्म्युला बदलणार?

Maharashtra News Live Update: आसाममध्ये सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार यांचे भव्य स्वागत

Maharashtra Government : पंतप्रधान मोदींच्या आवाहनानंतर महाराष्ट्र सरकारनं घेतले ३ मोठे निर्णय, अधिकार्‍यांच्या दौऱ्यावर बंदी अन्...

IPL Playoff Scenario: पंजाबच्या पराभवाचा फायदा चेन्नई-कोलकात्याला, वाचा ८ संघाचे प्लेऑफचे नेमकं गणित

Diabetes Diet Tips: डायबिटीजमध्ये ब्रेड खावा की नाही? रक्तातील साखर नियंत्रित ठेवण्यासाठी हे 3 ब्रेड ठरतील बेस्ट

SCROLL FOR NEXT