सध्या ऋतूत बदल होताना पाहायला मिळतोय. थंडी कमी आणि ऊन वाढताना दिसतय. या दिवसांमध्ये अनेकांना आणि विशेषत: प्रौढांना खूप काळजी घ्यावी लागते. कारण त्यांना हार्टशी संबंधित आजार असतात. त्यामुळे त्यांनी या दिवसात खूप काळजी घेतली पाहिजे. खूप चालल्यामुळे किंवा ऊन्हामुळे त्यांना अचानक घाम खूप जास्त घाम फुटणे, जीव घाबरल्यासारखा वाटणे अशा समस्यांना सामोरं जावं लागतं. त्यासाठी त्यांना डॉक्टर तपासणी करुन गोळ्या औषधही देतात.
बऱ्याचदा हार्ट पेशंटला म्हणजेच ज्यांना BPचा त्रास आहे त्यांना गोळ्या खाऊनही अनेक समस्यांना सामोरं जावं लागू शकतं, असं का होतं? हा प्रश्न अनेकांच्या मनात असतो. पुढे आपण त्याबद्दल सविस्तर जाणून घेणार आहोत.
तज्ज्ञांच्या मते, रोजच्या रोज घरी रक्तदाब तपासायचा असतो. त्याने तुम्हाला तुमच्या रोजच्या जीवनशैलीचा एक अंदाज येतो. कारण ब्लड प्रेशरचा शरीरात शांतपणे परिणाम करत असतो. पण त्याने तुमच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो. डॉक्टर नेहमीच तुम्हाला जीवनशैलीत बदल करायला सांगतात. त्याचं कारण म्हणजे , तुम्हाला दिलेल्या गोळ्यांचा तुमच्या शरीरावर योग्य प्रकारे परिणाम व्हावा.
तज्ज्ञांच्या मते, अनेकांना वाटतं की औषधं घेतल्यानंतरही रक्तदाब जास्त राहतो म्हणजे ते ताणतणावामुळे किंवा औषधांचा डोस कमी असल्यामुळे असेल. पण रेझिस्टंट हायपरटेन्शन ही एक विशिष्ट अवस्था आहे. तीन किंवा त्याहून जास्त औषधं घेतल्यानंतरही रक्तदाब नियंत्रित होत नसेल तर डॉक्टर याचा सखोल तपास करतात. तरीही अनेक रुग्णांची या दृष्टीने योग्य तपासणी होत नाही. त्यात ५० ते ८० टक्के रुग्ण डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे औषधं रोज घेत नाहीत. काही वेळा औषधांचे दुष्परिणाम, खर्च किंवा माहितीचा अभाव यामुळेही रुग्ण औषधं टाळतात. अशा वेळी रक्तदाब नियंत्रणात येत नाही आणि त्याला चुकीने रेझिस्टंट हायपरटेन्शन समजलं जातं.
तज्ज्ञांच्या मते, फक्त रक्तदाब मोजणं पुरेसं नाही, तर तो नियंत्रणात ठेवण्यासाठी योग्य उपचार, नियमित तपासणी आणि जीवनशैलीतील सुधारणा आवश्यक आहेत. रक्तदाब सतत वाढलेला दिसत असल्यास त्यामागील कारणांचा शोध घेणं आणि वेळेवर उपचार घेणं महत्वाचं आहे.
टीप: हा लेख केवळ माहितीच्या उद्देशाने आहे. कोणत्याही आरोग्य समस्येसाठी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.