high blood pressure Google
लाईफस्टाईल

High BPControl Tips: BP चा त्रास होईल 7 दिवसांत कमी, फक्त सकाळी हे पेय घ्या; डॉक्टरांनी दिला महत्वाचा सल्ला

BP Control: धकाधकीच्या जीवनशैलीत वाढता रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यासाठी हिबिस्कस चहा, बीटाचा ज्यूस, डाळिंबाचा रस आणि ग्रीन टी यांसारखी नैसर्गिक पेये फायदेशीर ठरू शकतात, मात्र डॉक्टरांचा सल्ला आवश्यक आहे.

Sakshi Sunil Jadhav

सध्याच्या धकाधकीच्या जीवनशैलीमुळे अनेकांचा ताण वाढत चालला आहे. जग पुढे सरकत खूप बदल होतायेत, महागाई वाढतेय, खाण्यापिण्याच्या सवयींमध्ये बदल पाहायला मिळतायेत. पण याने थेट तुमच्या ह्रदयावर परिणाम होताना दिसत आहे. कमी वयातच लोकांना ब्लड प्रेशरच्या धोक्याला सामोरं जावं लागंतयं. याने तुम्हाला कधीही आणि कोणत्याही वयात हार्ट अटॅकचा धोका निर्माण होऊ शकतो. तुम्हाला याची लक्षणं आधीच जाणवत जाणवत नाहीत. त्यामुळे तुम्ही गोळ्या औषधांबरोबर आहारातही काही बदल करणं गरजेचं आहे.

औषधे, योग्य आहार आणि न चुकता व्यायाम करणं यांसोबत काही नैसर्गिक ज्युस सुद्धा रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यासाठी फायदेशीर ठरू शकतात. मात्र ही पेये औषधांचा पर्याय नाहीत, तर हार्टशी संबंधित घरगुती उपाय आहेत. हे घेण्यापुर्वी डॉक्टरांनकडून नक्कीच तपासणी करुन घ्या.

हिबिस्कस चहा

सकाळी पिण्यात येणारा हिबिस्कस चहा म्हणजे जास्वंदाचा चहाही रक्तदाब कमी सेवन करु शकता. यातील लालसर चहामध्ये अँथोसायनिन्ससारखे अँटिऑक्सिडंट्स असतात, जे रक्तवाहिन्या सैल करण्यास मदत करतात. रोज दोन कप हिबिस्कस चहा घेतल्याने उच्च रक्तदाबात कमी होतो.

टोमॅटोचा ज्युस

ताज्या टोमॅटोचा रस पोटॅशियम आणि लाइकोपीनने समृद्ध असतो. हे घटक सूज कमी करून हृदयाचे आरोग्य सुधारण्यास मदत करतात.

डाळिंबाचा ज्युस

डाळिंबाचा रस सुद्धा अँटिऑक्सिडंट्सने भरलेला असतो. रक्तवाहिन्यांचं कार्य सुधारतो. साखर न घालता घेतल्याने त्याचा जास्त फायदा होतो.

ग्रीन टी

ग्रीन टीमध्ये असलेले कॅटेचिन्स कोलेस्ट्रॉल कमी ठेवण्यास आणि रक्ताभिसरण सुधारण्यास मदत करतात. याचा वापर वजन आटोक्यात आणण्यास सुद्धा होतो.

बीटाचा ज्युस

बीटाचा ज्युसमधले नायट्रेट्स शरीरात नायट्रिक ऑक्साइडमध्ये रूपांतरित होतात, त्याने रक्तवाहिन्या मोकळ्या होतात आणि रक्तदाब कमी होतो. सकाळी कोल्ड-प्रेस्ड बीटरूट ज्यूस घेणे फायदेशीर ठरू शकते. तसेच कोमट पाण्यात लिंबू मिसळून सेवन केल्यास शरीरातील जास्तीचे मीठ बाहेर टाकण्यास मदत होते आणि रक्तदाब संतुलित राहतो.

टीप: हा लेख केवळ माहितीच्या उद्देशाने आहे. रक्तदाबासंबंधी कोणताही त्रास असल्यास डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Actor Problem: 'त्या भूमिकेमुळे सरळ उभं राहता येत नाही...'; 'तारक मेहता' फेम अभिनेत्याचा धक्कादायक खुलासा

Gaurav - Akanksha : घटस्फोटाच्या चर्चेदरम्यान गौरव खन्नाची Lock Upp 2 मध्ये एन्ट्री, नवऱ्याला पाहून आकांक्षानं असं काही केलं की VIDEO पाहून तुम्हालाही बसेल धक्का

Monsoon Tips: पावसात एका सेंकदात कपडे सुकवायचे असतील तर 'हे Magical Gadgets' करतील मदत

पंढरीच्या वारीची सुरूवात पहिल्यांदा कोणी केली?| Pandharpur Wari

EPFO 3.0 : PF खातेधारकांसाठी महत्त्वाची बातमी! PF काढण्यापूर्वी 'या' गोष्टी तपासा, नाहीतर क्लेम होईल रिजेक्ट

SCROLL FOR NEXT