High Blood Pressure Effects google
लाईफस्टाईल

High Blood Pressure: सायलेंट किलर 'हाय BP'चा हृदयावर परिणाम, वेळीच सावध होण्यासाठी डॉक्टरांनी दिला महत्त्वाचा सल्ला

Hypertension Heart Risk: हाय बीपी हा सायलेंट किलर असून तो हृदयावर गंभीर परिणाम करतो. वेळेवर नियंत्रण न ठेवल्यास हार्ट अटॅक, स्ट्रोक आणि हृदय निकामी होण्याचा धोका वाढतो.

Sakshi Sunil Jadhav

एखादा पदार्थ आपण खाताना खूप आवडीने पोटभर खातो. पण त्याने पोटावर कसा परिणाम होईल याचा आपण विचार करत नाही. बऱ्याचदा आपल्याला माहितही नसतो. असेच काही सायलेंट किलर आजार असतात. ज्याकडे आपण दुर्लक्ष करतो आणि त्याचा थेट परिणाम तुमच्या हार्टवर होत असतो. कारण याची लक्षणं सुरुवातीला कळत नाहीत. पण याकडे दुर्लक्ष केलं की, हार्ट अटॅक किंवा स्ट्रोकचा धोका वाढतो.

हाय ब्लड प्रेशर नियंत्रणात ठेवण्यासाठी औषधं आणि जीवनशैलीत बदल आवश्यक करणं गरजेचं आहे. नाहीतर याने ह्रदयावर पुढीलप्रमाणे गंभीर परिणाम होऊ शकतात.

१. ह्रदयाच्या स्नायूंमध्ये जाडी वाढते.

जर तुमचे ब्लड प्रेशर सतत हाय असेल तर ह्रदयाला जास्त मेहनत घ्यावी लागते. यामुळे ह्रदयाच्या डाव्या व्हेंट्रिकलची जाडी वाढते (LVH). यानेच ह्रदय कडक बनतं आणि कार्यक्षमता कमी होते.

२. ब्लॉकेज आणि हार्ट अटॅकचा धोका वाढतो.

हाय बीपीमुळे रक्तवाहिन्यांच्या आतल्या भिंतींच हळूहळू नुकसान होत असतं. कारण याठिकाणी कोलेस्ट्रॉल जमा होऊन प्लाक तयार होतो. त्यामुळे रक्तपुरवठा कमी होतो आणि हार्ट अटॅकचा धोका वाढतो.

३. ह्रदय निकामी होणे.

उच्च रक्तदाबामुळे ह्रदयावर ताण वाढतो आणि ते कमकुवत होतं. त्यामुळे शरीराला पुरेसा रक्तपुरवठा होत नाही. यामुळे थकवा, श्वास घ्यायसा त्रास आणि पाय सूजणे अशी लक्षणं दिसतात.

४. हार्ट वाल्व आणि रिदममध्ये बिघाड होणे.

हाय बीपीमुळे ह्रदयाच्या वाल्ववर परिणाम होतो. तसेच हृदयाच्या ठोक्यांमध्ये अनियमितता (Atrial Fibrillation) निर्माण होऊ शकतो. ज्यामुळे स्ट्रोकचा धोका वाढतो.

५. रक्तवाहिन्या कडक होणे.

उच्च रक्तदाबामुळे रक्तवाहिन्या जाड आणि कमी लवचिक होतात. यामुळे रक्तप्रवाह अडतो आणि छातीत दुखतं (अ‍ॅन्जायना), हार्ट अटॅक आणि स्ट्रोकचा धोका वाढतो.

टीप : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Raghav and Shehnaaz: राघव जुयाल-शहनाज गिल रिलेशनशिपमध्ये? बर्थडे पार्टीनंतरची 'ती' मूव्हमेंट कॅमेऱ्यात कैद

Vande Bharat Sleeper: मुंबई-बंगळुरू प्रवास आता आणखी सुसाट! देशातील दुसरी 'वंदे भारत स्लीपर' तयार; किती डबे अन् मार्ग कोणता?

मिमिक्री अर्टिस्ट बोलायला लागले; मुख्यमंत्र्यांचा राज ठाकरेंना अप्रत्यक्षपणे टोला

Health Care : महिनाभर केळी खाल्ली तर शरीवर काय परिणाम होतो?

Maharashtra News Live Update: अनेक लोकांना माझ्या भाषणाने मिरची लागली - देवेंद्र फडणवीस

SCROLL FOR NEXT