High Blood Pressure Saam Tv
लाईफस्टाईल

High Blood Pressure : सायलेंट किलरचा आजार हाय बीपी! झोपेतून उठताच ही लक्षणे दिसल्यास घ्या काळजी...

High Blood Pressure Disease : हल्ली उच्च रक्तदाबाची समस्या तरुणांमध्ये सहज पाहायला मिळते. जगभरात रक्तदाबाचे रुग्ण झपाट्याने वाढताना दिसून येत आहे. पूर्वी हा आजार वयाच्या पन्नाशीनंतर होत असे, पण आजकाल २५ ते ३० वर्ष वयातील लोकांनाही उच्च रक्तदाबाचा त्रास होऊ लागला आहे.

कोमल दामुद्रे

High Blood Pressure Symptoms :

हल्ली उच्च रक्तदाबाची समस्या तरुणांमध्ये सहज पाहायला मिळते. जगभरात रक्तदाबाचे रुग्ण झपाट्याने वाढताना दिसून येत आहे. पूर्वी हा आजार वयाच्या पन्नाशीनंतर होत असे, पण आजकाल २५ ते ३० वर्ष वयातील लोकांनाही उच्च रक्तदाबाचा त्रास होऊ लागला आहे.

आजकाल बहुतांश तरुणांमध्ये बीपीचा त्रास होताना दिसून येत आहे. चुकीची जीवनशैली, खाण्यापिण्याच्या सवयी, मिठाचे अधिक प्रमाणात सेवन, तणाव आणि अनुवांशिकता यामुळे उच्च रक्तदाब होऊ शकतो. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

बरेचदा सकाळी झोपेतून उठल्यानंतर आपल्याला अस्वस्थ वाटू लागते, अचानक घाम येतो, झोपेतून उठताच डोके आणि डोळे दोन्ही जड होतात. अशावेळी रक्तदाब नियंत्रणात नसल्यास आरोग्यावर परिणाम होऊन हृदयविकाराचा धोका (Heart Attack) लक्षणीयरित्या वाढतो. सकाळी उठल्यानंतर जर तुम्हाला देखील ही लक्षणे दिसल्यास तुमचे बीपी (Blood Pressure) वाढले आहे हे कळेल. जाणून घेऊया त्याबद्दल

रक्तदाब जास्त झाल्यास शरीरात दिसतात ही लक्षणे

1. चक्कर येणे

सकाळी उठल्याबरोबर चक्कर येत असेल किंवा उलटीसारखे होत असेल तर उच्च रक्तदाबाची लक्षणे आहेत. चुकूनही या लक्षणांकडे (Symptoms) दुर्लक्ष करु नका. अशावेळी तुमचा रक्तदाब तपासा. समस्या वाटल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.

2. खूप तहान लागणे

सकाळी उठल्याबरोबर खूप तहान लागली किंवा घसा कोरड्या पडण्याचा त्रास होत असेल तर डॉक्टरांचा सल्ला घ्या. ही लक्षणे सतत दिसत असल्यास काळजी घ्या.

3. थकवा जाणवणे

रात्री पुरेशा प्रमाणात झोप घेऊनही तुम्हाला सतत थकवा जाणवत असेल, अशक्तपणा जाणवत असेल तर याचे कारण उच्च रक्तदाब असू शकते. ही लक्षणे वारंवार जाणवत असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.

4. धुसर दिसणे

उठल्यानंतर लगेच किंवा काही वेळाने धूसर दिसत असेल तर डोळ्यांवर ताण येतो. परंतु, असे सतत होत असेल तर हे देखील उच्च रक्तदाबाचे लक्षण समजले जाते. यावेळी डोळे तपासून घ्या.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: - विधान परिषद निवडणुकीची आज मतमोजणी, निकालाकडे सर्वांचे लक्ष

Monday Horoscope : रखडेलेली सर्व कामे पूर्ण होणार, कामगारांची होणार चांदीच चांदी; वाचा आजचे राशीभविष्य

Best Bus Strike: अखेर तोडगा निघालाच! बेस्टचा संप मागे, कर्मचाऱ्यांना मिळणार २००० रुपये मासिक हंगामी वाढ

ओमराजे निंबाळकरांचं अखेर ठरलं! ठाकरेंच्या मनधरणीच्या प्रयत्नांना अपयश

मुलीला वाचवण्यासाठी बाप बिबट्याशी भिडला; मृत्यूच्या जबड्यातून चिमुकलीची सुटका

SCROLL FOR NEXT