High blood pressure symptoms saam tv
लाईफस्टाईल

High Blood Pressure: BPचा त्रास आहे? मग वेळीच व्हा सावध! 'या' सवयींमुळे वाढतो हार्ट अटॅकचा धोका

Hypertension: उच्च रक्तदाब हा सायलेंट किलर आहे. चुकीच्या जीवनशैलीमुळे हार्ट अटॅक, स्ट्रोकचा धोका वाढतो. योग्य आहार, नियमित व्यायाम आणि तणाव नियंत्रणाने बीपी सुरक्षित पातळीवर ठेवता येतो.

Sakshi Sunil Jadhav

सध्याच्या धकाधकीच्या जीवनात चुकीच्या सवयी अनेकांनाकडून फॉलो केल्या जात आहेत. बाहेरचं खाणं, सतत स्क्रीनचा वापर, कमी झोप, जेवणातले पदार्थ अशा अनेक चुकीच्या सवयींमुळे तुम्हाला भविष्यात थेट BP सारख्या गंभीर समस्यांना सामोरं जावं लागू शकतं. त्यात हे आजार सहज ओळखता येत नाहीत. हे छुपे आजार असतात. त्यांची लक्षणंही सामान्य आजारांशी मिळती जुळती असतात. त्यामुळे त्यांच्याकडे दुर्लक्ष करणं फार महत्वाचं असतं.

उच्च रक्तदाब, ज्याला हायपरटेन्शन असंही म्हटले जातं, हा एक गंभीर पण अनेकदा दुर्लक्षित आरोग्याचा धोका आहे. त्यामुळे रोज रक्तदाब तपासणं गरजेचं आहे. रक्तदाब बरेच दिवस वाढलेलाच राहत असेल तर तो आपल्या धमन्यांच्या भिंतींवर जास्त दाब निर्माण करतो. यामुळे धमन्यांच्या आतील नाजूक अस्तराला इजा होते आणि त्या कमी लवचिक बनतात. मग त्यामध्ये चरबीचे थर साचतात, ज्याला अॅथेरोस्क्लेरोसिस असं म्हणतात. हीच स्थिती पुढे जाऊन कोरोनरी आर्टरी डिसीजसारख्या गंभीर हृदयरोगांना कारणीभूत ठरू शकते आणि हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका वाढतो.

जेव्हा Bp वाढतो, तेव्हा हृदयाला जास्त मेहनत घेऊन काम करावं लागतं. सततच्या ताणामुळे हृदयाच्या स्नायूंमध्ये जाडी येते आणि कालांतराने ते कमकुवत होऊ शकते. याने हृदय निकामी होण्याचा धोका वाढतो. तसेच उच्च रक्तदाबामुळे मेंदूला रक्तपुरवठा करणाऱ्या धमन्यांवरही परिणाम होऊन स्ट्रोकचा धोका वाढतो. किडनीचे कार्य बिघडणं, रक्तवाहिन्यांमध्ये सूज किंवा फुगीरपणा निर्माण होणं आणि स्मरणशक्ती कमी होणं या समस्यांना सामोरं जावं लागतं. त्यामुळे हा आजार फक्त हृदयापुरता मर्यादित नसून संपूर्ण शरीरावर परिणाम करतो.

मात्र सकारात्मक बाब म्हणजे योग्य काळजी घेतल्याने रक्तदाब नियंत्रणात ठेवणं शक्य आहे. जीवनशैलीतील बदल आणि गरज असल्यास डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधोपचार यांच्या मदतीने रक्तदाब सुरक्षित पातळीवर आणता येतो. आहारामध्ये ताजी फळं, भाज्या, संपूर्ण धान्ये आणि कमी फॅटी प्रथिने यांचा समावेश करणे फायदेशीर ठरते. मीठाचे प्रमाण कमी ठेवणे आणि पोटॅशियमयुक्त पदार्थ जसे केळी, पालक, कडधान्ये यांचा आहारात समावेश करणे उपयुक्त ठरते.

नियमित व्यायाम हा रक्तदाब नियंत्रणाचा महत्त्वाचा भाग आहे. दररोज तीस मिनिटं वेगाने चालणे, पोहणे किंवा हलका व्यायाम केल्याने हृदय निरोगी राहण्यास मदत होते. तणाव हा सुद्धा उच्च रक्तदाबाचा एक महत्त्वाचा घटक आहे. योगा, ध्यान, वाचन, लेखन किंवा निसर्गात वेळ घालवणं यांसारख्या उपायांनी मन शांत ठेवणे आवश्यक आहे. त्यामुळे उशीर न करता आजच आपल्या आरोग्याची जबाबदारी घ्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

70 वर्षांचा मित्र तुटला, तेल महागलं, रशियाने केली भारताची नाकेबंदी

Maharashtra Live News Update: पिंपरी चिंचवडमध्ये मोबाईल टॉवरला भीषण आग

Maharashtra Politics: भाजप-मनसेची युती होताच राजकारण ३६० डिग्री फिरलं! सभापतीपद राज ठाकरेंच्या पक्षाकडे गेलं

Shocking: स्कूटर देण्यास नकार दिल्याने तरुणाची सटकली, बायको अन् सासू-सासऱ्यांच्या अंगावर पेट्रोल टाकून जाळलं

काँग्रेसला मोठा धक्का! बड्या नेत्याची आमदारकी रद्द; राज्याच्या राजकारणात खळबळ

SCROLL FOR NEXT