Health care tips in marathi, how to hide aging, how can I hide my deep wrinkles ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
लाईफस्टाईल

Health Tips : या पदार्थांचा वापर करुन वाढते वय लपवा!

आपण त्वचेची काळजी घेतली आणि खाण्या-पिण्याचे पथ्य सांभाळले तर सुरकुत्या आणि बारीक रेषा कमी होण्यास मदत होते.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : वाढत्या वयाबरोबर आपल्या चेहऱ्यावर अनेक बदल पाहायला मिळतात. वृद्धत्व हे आपल्या चेहऱ्यावरील नैसर्गिक प्रक्रिया आहे जी थांबवता येणे कठीण आहे. परंतु, आपण त्वचेची (Skin) काळजी घेतली आणि खाण्या-पिण्याचे पथ्य सांभाळले तर सुरकुत्या आणि बारीक रेषा कमी होण्यास मदत होते. जास्त ताण, नैराश्य, हार्मोनल असंतुलन, आहारातील अति गोड पदार्थांचे सेवन यामुळे त्वचेची काळजी घेणे गरजेचे आहे. (Health care tips in Marathi)

हे देखील पहा -

कशी घ्याल चेहऱ्याची काळजी -

१. नारळाच्या दुधात भरपूर प्रमाणात अँटीऑक्सिडंट्स आणि उष्णता कमी करण्याचे गुणधर्म आहेत ज्यामुळे आपल्याला सुरकुत्यापासून दूर ठेवण्यास मदत होऊ शकते. सुरकुत्याच्या समस्येपासून दूर ठेवण्यासाठी नारळाचे दूध कापसाच्या मदतीने चेहऱ्यावर लावा. १० मिनिटे चेहऱ्यावर राहू द्या आणि नंतर थंड पाण्याने धुवा. आठवड्यातून तीनदा असे केल्यास महिन्याभरात चेहऱ्यावर बदल दिसून येतील.

२. केळीमध्ये जीवनसत्त्वे (Vitamins) ए आणि बी अधिक प्रमाणात आढळून येते. ज्यामुळे आपल्या त्वचेला सुंदर बनवू शकतो. पिकलेले केळे मॅश करून त्यात गुलाबजल, मध आणि त्यात दही घाला. नंतर ही पेस्ट चेहऱ्यावर लावा आणि १० मिनिटांनी धुवा. चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी होतील.

३. बटाट्यातील व्हिटॅमिन सी व्यतिरिक्त, शरीरातील प्रथिने पुन्हा निर्माण करण्यास मदत करते. त्वचेची लवचिकता टिकवून ठेवण्यासाठी आणि बारीक रेषा काढून टाकण्यासाठी मदत करते. अर्ध्या बटाटा किसून त्याचा रस काढा. नंतर कापसाच्या (Cotton) मदतीने हळूहळू चेहऱ्यावर लावा. असे दर आठवड्याला केल्यास सुरकुत्यांपासून आराम मिळेल.

४. मध हे चेहऱ्यासाठी मॉइश्चरायझर म्हणूनही काम करते. मधात असणाऱ्या अँटिऑक्सिडेंट गुणधर्मांमुळे आपली त्वचा निरोगी बनते. त्वचेच्या पोतमध्ये लवचिकता राखण्याचे काम करते. बोटांनी किंवा कापसाच्या मदतीने चेहरा, मान इत्यादींवर मध लावा. यामुळे सुरकुत्यापासून आराम मिळतो.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. कृपया आपल्या डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.

Edited By - Komal Damudre

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Unmarried Bollywood Actress: 'या' प्रसिद्ध अभिनेत्रींनी अजून केलं नाही लग्न

Mahayuti: नवी मुंबईत राजकीय घडामोडींना वेग; अजित पवार गट महायुतीतून बाहेर पडणार?

Mumbai Shocking : लव्ह, समलैंगिक संबंध अन् १६ वर्षीय मुलाचा संशयास्पद मृत्यू; मुंबईत अनोख्या प्रेमाचा धक्कादायक अंत

Maharashtra Live News Update : वाशिम जिल्ह्यात जोरदार पाऊस, पुढील तीन दिवस मुसळधार पावसाचा इशारा

Pune Crime : कोंढवा तरुणी अत्याचार प्रकरणात पुन्हा ३६० डिग्री टर्न, आरोप असलेल्या तरुणाला अटकच नाही

SCROLL FOR NEXT