Hero Xtreme 160R 4V Price : Hero MotoCorp ने Hero Xtreme 160R 4V चे अनावरण केले आहे. भारतीय दुचाकी कंपनीने स्टँडर्ड, कनेक्टेड आणि प्रो या तीन प्रकारांमध्ये नवीनतम मोटरसायकल लॉन्च केली आहे.
यांची किंमत ही 1.27 लाख रुपयांच्या सुरुवातीच्या एक्स-शोरूम किंमतीत बाजारात लॉन्च केले गेले आहे. हिरोच्या नवीन बाईकमध्ये 163 सीसी इंजिन आहे, जे आधीच्या मॉडेलच्या तुलनेत खूप अपग्रेड केले गेले आहे. जाणून घेऊया फीचर (Features)
1. 2023 Hero Xtreme 160R 4V: किंमत (Price)
नवीन Hero Xtreme 160R 4V चे बुकिंग १५ जूनपासून सुरू होईल. कंपनीने सांगितले की ते स्टँडर्ड, कनेक्टेड आणि प्रो या तीन प्रकारांमध्ये ही बाईक (Bike) विकली जाणार आहे. नवीनतम बाईकच्या मानक प्रकाराची एक्स-शोरूम किंमत रु. 1,27,300 आहे. त्याच वेळी, कनेक्टेड वेरिएंटची एक्स-शोरूम किंमत 1,36,500 रुपये आहे. प्रो च्या सर्वात महाग व्हेरियंटची एक्स-शोरूम किंमत 1,32,800 रुपये आहे.
2. 2023 Hero Xtreme 160R 4V: तपशील
हिरोच्या नवीन मोटरसायकलची डिलिव्हरी जुलैच्या दुसऱ्या आठवड्यापासून सुरू होईल. बजाज पल्सर N160, TVS Apache RTR 160 4V आणि Bajaj Pulsar NS160 यांसारख्या बाइक्सशी त्याची थेट स्पर्धा होईल. Hero Xtreme 160R 4V चे इंजिन अपग्रेड करण्यात आले आहे. यात 163 सीसी ऑइल कूल इंजिनची शक्ती मिळेल. त्याचबरोबर पॉवर ट्रान्समिशनसाठी 5-स्पीड गिअरबॉक्स देण्यात आला आहे.
3. 2023 Hero Xtreme 160R 4V: वैशिष्ट्ये
Hero Xtreme 160R 4V च्या नवीन मॉडेलमध्ये पुढील बाजूस अपसाइड-डाउन फोर्क्स आहेत. मागील शॉक शोषकांमध्ये कोणतेही बदल केले गेले नाहीत. याला फ्रंट डिस्क ब्रेक मिळेल तर रियर डिस्क आणि ड्रम ब्रेकचा पर्याय उपलब्ध असेल. नवीन बाईकमध्ये 17 इंची अलॉय व्हील, ट्यूबलेस टायर, शार्प एलईडी हेडलॅम्प, एलईडी डीआरएल सारखी वैशिष्ट्ये देण्यात आली आहेत.
4. दर्जात्मक अॅक्सेलरेशन
अद्वितीय रिअल-वर्ल्ड कार्यक्षमता प्रदान करण्याच्या माध्यमातून नवीन बेंचमार्क स्थापित करत एक्स्ट्रीम १६०आर ४व्ही मध्ये १६३ सीसी ४ व्हॉल्व्ह एअर-ऑईल कूल्ड बीएस-६ (ओबीडी-२ + ई२०) प्रमाणित इंजिन आहे, जे ८५०० आरपीएममध्ये १६.९ पीएसचे अधिकतम पॉवर आऊटपुट आणि ६५०० आरपीएममध्ये १४.६ एनएमचे सर्वोच्च टॉर्कची निर्मिती करते. मोटरसायकलमध्ये दर्जात्मक अॅक्सेलरेशन आहे, जी फक्त ४.४१ सेकंदांमध्ये ०-६० किमी/तास गती प्राप्त करते. ड्रॅगस्टर पोझिशनिंगला अधिक पुढे घेऊन जात एक्स्ट्रीम १६०आर ४व्ही ड्रॅग रेस (क्वॉर्टर-माइल) मध्ये दर्जात्मक टाइमिंग, ०-१०० किमी/तास आणि ० ते टॉप स्पीडची खात्री देते, ज्यामुळे ही तिच्या विभागातील फास्टेस्ट* १६० सीसी मोटरसायकल आहे.
5. राइड कम्फर्ट
राइडर व सहप्रवासीसाठी अधिक लेगरूमचे इंटरप्ले, लोअर्ड हँडलबारसह आरामदायी पिलियन स्प्लिट सीट पर्याय आणि व्यापक स्प्लिट रिअर ग्रिप्स राइडर व सहप्रवाशाला सर्वोत्तम आरामदायीपणा व सुरक्षित राइडिंगची खात्री देतात.
6. हिरो कनेक्ट २.०
एक्स्ट्रीम १६०आर ४व्ही हिरो कनेक्ट २.० वैशिष्ट्यासह येते, जे मोटरसायकलचे डिस्प्ले व मोबाइल अॅपच्या माध्यमातून वेईकलचे हेल्थ व सुरक्षिततेबाबत २५ हून अधिक महत्त्वाचे नोटिफिकेशन्स देत राइडर्सचा प्रवास सुनिश्चित करते.
7. सुरक्षितता
रिमोट इमोबिलायझेशन वापरकर्त्यांना बाइकच्या सुधारित सुरक्षिततेसाठी दूरूनच वेईकलचे मोबिलायझ / इमोबिलायझ करण्याची सुविधा देते. तसेच, जिओ फेन्स वैशिष्ट्य वेईकल आल्यास किंवा पूर्व-निर्धारित केलेल्या भौगोलिक क्षेत्रांमधून बाहेर गेल्यास अलर्ट पाठवते. याव्यतिरिक्त वापरकर्त्यांना अॅपवर थेफ्ट अलर्ट्स व बॅटरी रिमूव्हल नोटिफिकेशन देखील मिळू शकते.
8. सुरक्षा
राइडरद्वारे ट्रिगर केलेले एसओएस अलर्ट अॅपमध्ये वापरकर्त्याने निर्धारित केलेल्या एमर्जन्सी कॉन्टॅक्ट्सना नोटिफिकेशन पाठवते. इतर सेफ्टी अलर्ट्स आहेत, लो फ्यूएल, ओव्हर-स्पीडिंग, टॉपल इत्यादी.
9. नेव्हिगेशन
इन-अॅप नेव्हिगशन सर्विसेस्, रिअल-टाइम वेईकल ट्रॅकिंग आणि शेअर लोकेशनचा पर्याय यांचा समावेश.
10. ड्रायव्हिंग रिपोर्ट
ओव्हर-स्पीडिंग, हार्श अॅक्सेलरेशन, ब्रेकिंग व वेईकल इडलिंग अशा घटकांच्या माध्यमातून राइडिंग वर्तणूकीची नोंद ठेवते.
11. रंग
हिरो एक्स्ट्रीम १६०आर ४वही खाली देण्यात आलेल्या व्हेरिएण्ट्ससाठी आकर्षक कलर स्किम्समध्ये येते -
स्टॅण्डर्ड (सिंगल सीएच एबीएससह फ्रण्ट अॅण्ड रिअर डिस्क): ब्लेझिंग स्पोर्टस् रेड, मॅट स्लेट ब्लॅक
कनेक्टेड २.० (सिंगल सीएच एबीएससह फ्रण्ट अॅण्ड रिअर डिस्क): मॅट स्लेट ब्लॅक
प्रो (सिंगल सीएच एबीएससह फ्रण्ट अॅण्ड रिअर डिस्क, यूएसडी फोर्क्स, स्प्लिट सीट): निऑन शूटिंग स्टार आणि मॅट स्लेट ब्लॅक
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.