How to improve children handwriting ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
लाईफस्टाईल

मुलांचे खराब हस्ताक्षर सुधारण्यासाठी काही सोप्या युक्त्या

लेखन सुधारण्याचा प्रयत्न करूनही आपल्याला हस्ताक्षर सुधारता येत नाही.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : हस्ताक्षार वळणदार करण्यासाठी अगदी बालवयापासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांचा प्रयत्न सुरु असतो. सुंदर हस्ताक्षर आपल्या सर्वांनाच हवे असते, पण काही चुकांमुळे, लेखन सुधारण्याचा प्रयत्न करूनही आपल्याला हस्ताक्षर सुधारता येत नाही. खराब हस्ताक्षराची समस्या लहान मुलांपासून (Child) मोठ्यांपर्यंत दिसून येते. आपली लिहिण्याची सवय किंवा पेन-पेन्सिल योग्यरित्या न पकडणे हे यामागचे मोठे कारण असू शकते. आपण पालकही आपल्या मुलांच्या खराब हस्ताक्षरामुळे सतत चिंतेत असतो. त्यासाठी आज काही सोप्या टिप्सचा (Tips) वापर करुन आपण मुलांचे हस्ताक्षर सुंदर व वळणदार बनवू शकतो.

हे देखील पहा -

सुंदर व वळणदार हस्ताक्षरासाठी काही सोप्या टिप्स

१. ज्यावेळी आपल्याला काही लिहायचे असेल तेव्हा योग्य मुद्रेत बसून लिहीणे गरजेचे आहे. आपण झोपून किंवा उभे राहून लिहिले तर आपले लेखन अधिक खराब होते. जेव्हा आपण लिहायला बसू तेव्हा खुर्ची-टेबल किंवा अभ्यासाच्या टेबलाचा आधार घ्या.

२.लिहिताना पेन (Pen) किंवा पेन्सिल फार घट्ट धरू नका किंवा कागदावर जास्त दाबून लिहू नका. असे केल्यास आपले अक्षर सुधारण्यास मदत होईल.

३. आपल्याला हस्ताक्षर सुधारायचे असेल तर आपण आपल्या लेखनाचा वेग कमी करायला हवा. त्यामुळे अक्षर वळणदार होण्यास मदत होईल.

४. बरेचदा विद्यार्थी लिहिताना फक्त हात म्हणजेच पंज्याचा वापर करतात आणि त्यांचा पाठीचा भाग पूर्णपणे स्थिर राहतो. त्यामुळे संपूर्ण हातात रक्ताभिसरण नीट होत नाही. एक-दोन पान लिहिल्यानंतर हात दुखू लागतो. म्हणूनच लिहिताना संपूर्ण हाताचा वापर करावा. याच्या मदतीने तुम्ही हस्ताक्षर सुधारू शकता.

५. जेव्हाही आपण लिहितो तेव्हा दोन शब्दांमधील अंतर सारखे ठेवावे. असे केल्याने, हस्ताक्षर सुंदर व वळणदार दिसेल.

६. एकाच वेळी बरोबर लिहिण्याचा प्रयत्न करा. जेणेकरून आपल्याला पुन्हा पुन्हा लिहिण्याची गरज भासणार नाही.

७. लेखन सुधारायचे असेल तर पेन्सिलने रोज एक-दोन पाने लिहावी. याशिवाय शाईच्या पेनाने रोज लिहिण्याचा सराव केल्यास लेखन झपाट्याने सुधारते.

अशाप्रकारे मुलांचे लेखन आपण सुंदर व वळणदार करु शकतो.

Edited By - Komal Damudre

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी मुख्यमंत्री अ‍ॅक्टिव मोडमध्ये

Rohit Pawar: भरसभेत CM फडणवीस म्हणाले होते, श्री सचिन घायवळ...! रोहित पवारांनी लावला तो VIDEO, पाहा

Homemade Pizza Recipe: घरच्याघरी पिझ्झा बनवण्याची सोपी ट्रीक, लहानमुले चाटून पुसून खातील

Diwali 2025: दिवाळीत मातीच्या पणत्यांचा उपयोग का करावा? जाणून घ्या ५ प्रमुख कारणे

Politics : निवडणुकीपूर्वी माजी मुख्यमंत्र्यांना मोठा झटका, बड्या नेत्याने दिला तडकाफडकी राजीनामा

SCROLL FOR NEXT