Winter Hair Care Tips Saam Tv
लाईफस्टाईल

Winter Hair Care Tips : हिवाळ्यात 'या' 5 गोष्टी ठरतील केसांसाठी हेल्थ सिक्रेट, जाणून घ्या त्याबद्दल

आपले केस गळणे, केस कोरडी पडणे किंवा केसंमधील चमक नाहीशी होणे अशा प्रकारच्या समस्यांना सामोरे जावे लागते.

कोमल दामुद्रे

Winter Hair Care Tips : काळे, दाट आणि लांब केस सगळ्याच स्त्रियांना आवडतात. अशातच थंडीच्या दिवसांत आपली त्वचा कोरडी असते. त्यामुळे आपले केस गळणे, केस कोरडी पडणे किंवा केसंमधील चमक नाहीशी होणे अशा प्रकारच्या समस्यांना सामोरे जावे लागते. आज आम्ही तुम्हाला काही कमालीच्या घरगुती टिप्स सांगणार आहोत. जेणेकरून तुमचे केस शायनी, सिल्की आणि चमकदार बनतील.

केसांची चमक वाढवण्यासाठी आपण अनेक प्रकारच्या गोष्टींचा वापर करतो. अशातच काही प्रसाधणामुळे केसांची सुंदरता वाढते पण ती तात्पुरतीचं असते. अशाने केस गळणे, केसांमध्ये कोंडा होणे अशा प्रकारच्या समस्या वाढत जातात त्याचबरोबर अनेक स्त्रिया वेगवेगळ्या प्रकारच्या केमिकल्सचा वापर आपल्या केसांवर करतात.परंतु याचा रिझल्ट दिर्घकाळ टिकून राहत नाही. त्यामुळे नॅचरल पद्धतीने केसांची निगा आणि काळजी अशा पद्धतीने घ्याल तर तुम्हीं तुमचे केसांची हरवलेलं स्वास्थ पुन्हा आणू शकता.

1. हेड मसाज :

हेड मसाज करणे आपल्या केसांसाठी अत्यंत फायदेशीर असते. थंडीमध्ये हेड मसाज केल्याने तुमच्या डोक्यामध्ये ब्लड सर्क्युलेशन व्यवस्थीत होते. त्याचबरोबर केस गळणे या समस्येपासून सुटका मिळते आणि केसांमधील कोंडा देखील कमी होतो. थंडीच्या दिवसांत आठवड्यातून 2 ते 3 वेळा हेड मसाज केला पाहिजे. हेड मसाज करण्यासाठी तुम्ही तुमच्या आवडीचे तेल (Oil) गरम करून केसांवरती लावू शकता.

2. केस धुण्यासाठी शाम्पूचा वापर करावा :

थंडीच्या दिवसांत केमिकलयुक्त शाम्पू वापरू नये. यामुळे तुमची त्वचा कोरडी पडते. म्हणूनच तुम्ही एसएलएस मुक्त शाम्पू वापरला पाहिजे. अशाने तुमचे केस मुलायम आणि चमकदार बनवण्यासाठी मदत होईल.

Hair Care Tips

3. केसांना मास्क लावा :

बाजारामध्ये (Market) बऱ्याच प्रकारचे हेअर मास्क आले आहेत. त्यामधे हेअर स्पा , हेअर रीबौंडींग अशा ट्रीटमेंटचा समावेश असतो. पण घरच्या घरी आयुर्वेदिक पद्धतीने हेअर मास्क कसा बनवावा. त्यासाठी तुम्ही मेथीचा वापर करू शकता. मेथीच्या पावडरमध्ये नारळाचे तेल मिक्स करून केसांना लावावे आणि 1 तास केस तशीच ठेवावी. नंतर स्वच्छ पाण्याने (Water) केस धुवून टाकायची. तुम्हाला घरच्या घरी मास्क बनवून केस गळणे, कोंडा होणे, त्वचा कोरडी पडणे या सगळ्या समस्यांना पळवून लावता यईल.

4. कोरफडीचा वापर करणे :

कोरफडीचा वापर केल्याने केस अतिशय मुलायम आणि चमकदार बनतात. कोरफडीचा सततच्या वापरामुळे तुमचे केस (Hair) खुपचं सिल्की बनतात. त्याचबरोबर कोरफडीमध्ये एंटीबॅक्टरियल, अँटीइम्पलेमेंटरी आणि स्यालीसिलिक असिड असल्यामुळे केस खूप मजबूत बनतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IMD Weather Update: IMDच्या नव्या अंदाजानं शेतकऱ्यांची चिंता वाढवली; महाराष्ट्रात दोन आठवडे पावसाची दांडी

Plane Crash: अमेरिकेत आणखी एक दुर्घटना; समुद्रात कोसळले विमान

Mumbai Crime: मुंबई हादरली! तरुणाकडून अल्पवयीन मेहुणीवर बलात्कार, गर्भवती पीडितेने दिला बाळाला जन्म

Tuesday Horoscope : वाईट संकटांचा सामना करावा लागेल, वाचा मंगळवारचे राशीभविष्य

Milk Mithai: दूधापासून घरीच बनवा 'या' टेस्टी मिठाई

SCROLL FOR NEXT