healthy diet for teenagers, Health Tips in Marathi ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
लाईफस्टाईल

युवावस्थेतील व्यक्तींनी आहार कसा घ्यावा ?

वाढत्या वयामुळे मुलांच्या शरीरात अनेक बदल होत असतात.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : बाल्यावस्थेतून युवावस्थेत जाण्याची महत्त्वपूर्ण अवस्था म्हणजे तारुण्य. वाढत्या वयामुळे मुलांच्या शरीरात अनेक बदल होत असतात. त्यांना या वयात अधिक चांगले पोषण गरजेचे आहे. (Healthy diet for teenagers)

हे देखील पहा -

या वयात मुलं (Child) व मुली दोघांच्याही शारीरिक व मानसिक अवस्थेत बदल होताना दिसून येते. त्यामुळे त्याच्या स्वभावात व आहाराच्या सवयी देखील बदलतात. या वयातील मुलांवर त्याच्या मित्र-मैत्रिणीचा अधिक प्रभाव असतो. त्यामुळे कमी खाणे किंवा वजन कमी करण्यासाठी इतर प्रयोग ते करत असतात. या वयात युवकांच्या आहाराची विशेष काळजी (Care) घेणे महत्त्वाचे ठरते.

आहारशास्त्राच्या दृष्टिकोनातून या गोष्टींवर विशेष लक्ष द्याः

मुलं लहान असतात तेव्हाच त्यांच्या खाण्यापिण्यात आपण आरोग्यदायी पदार्थ समावेश करायला हवे. मुलांमध्ये आहाराच्या चांगल्या सवयी लावणे, त्यांना लहानपणापासूनच शारीरिकदृष्ट्या सक्रिय करणे ही आपली जबाबदारी आहे. आपली मुले बाहेर काय खातात हे आपण आधी जाणून घ्यायला हवे. त्यांच्या खाण्यात अति जंकफूड आहेत का हे तपासा. त्यांना जर बाहेरचे खायचे असेल तर कोणते पदार्थ शरीरासाठी चांगले आहे ते त्यांना समजावून सांगा.

आरोग्यदायी पदार्थाचा आपल्या आहारात समावेश कसा कराल ?

- आहारात कडधान्यांचा समावेश करा. वाढत्या वयात कडधान्य आपल्या शरीरात ऊर्जा निर्माण करण्याचे काम करते. कडधान्य हे फायबर आणि व्हिटॅमिन बी चे उत्कृष्ट स्त्रोत आहे.

- भरपूर फळे आणि भाज्या खा. यात असलेले अँटिऑक्सिडंट्स आपली प्रतिकारशक्ती वाढवतात आणि फायबर बद्धकोष्ठतेच्या त्रासापासून दूर करते.

- स्किम मिल्क आणि कमी चरबीयुक्त दुग्धजन्य पदार्थांचे सेवन करा. यात आपल्या शरीराला हवे असणारे प्रथिने आणि कॅल्शियम भरपूर प्रमाणात मिळते. यामुळे आपली हाडे आणि स्नायू अधिक बळकट होतात.

- तेलाचे पदार्थ आणि ड्रायफूटचे मर्यादित प्रमाणात सेवन केले पाहिजे कारण, यात कॅलरीज जास्त असतात. यामध्ये असणाऱ्या गुणधर्मामुळे चरबीमध्ये विरघळणारे जीवनसत्त्व मिळतील जे आपल्या आरोग्यासाठी चांगले असले.

- भरपूर पाणी (Water) किंवा पेयाचे सेवन करा.ज्यामुळे आपल्या शरीरातील पाण्याचे संतुलन राखता येईल आणि बद्धकोष्ठतेपासून आराम मिळेल.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

Edited By - Komal Damudre

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: MIM ने शोधला 'वंचित'ला पर्याय? महाराष्ट्राच्या राजकारणात 'रावण'ची एण्ट्री महाराष्ट्रात 'MD' फॅक्टर किंगमेकर?

Weather Update: अचानक गायब झालेला मान्सून धो धो बरसतोय! कोणत्या जिल्ह्यांना धोका?

Mumbai Crime : तरुणीने डेटिंग ॲपवरून ओळख केली; हॉटेलमध्ये एकटं बोलावलं अन्...; बोरिवलीतील तरुणासोबत घडला भयंकर प्रकार

Maharashtra Live News Update : नाशिकच्या इगतपुरीत दरड कोसळली, आदिवासी पाड्यांचा संपर्क तुटला

Nashik Crime News: नाशिकमध्ये चड्डी गँगचा कहर; घरात घुसून ४ तोळे सोनं लंपास| VIDEO

SCROLL FOR NEXT