Diet plan, adult, health care ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
लाईफस्टाईल

Health tips : वयाच्या पन्नांशी नंतर कोणते पदार्थ आहारात असायला हवे ? स्त्री व पुरुषांनी निरोगी राहण्यासाठी आहारात हे बदल करा

वयोवृध्दांनी आहारात कोणत्या पदार्थांचा समावेश करावा ?

कोमल दामुद्रे

मुंबई : वयाची चाळीशी ओलांडल्यानंतर आपल्याला आरोग्याच्या अनेक समस्या जाणवू लागतात. खाण्यापिण्यातील बद्दलाबरोबर आपल्याला आरोग्याची काळजी घेणे अधिक गरजेचे आहे.

हे देखील पहा -

या वयात आपल्या शरीराची वाढ झालेली असते. परंतु, रोजच्या जीवनशैलीमुळे आपल्या शरीरातील पेशी कमकुवत होत जातात. हाडांची झिज, स्नायूंची पुर्नरचना होणे अधिक गरजेचे असते. आपण पन्नासाव्या वर्षाच पदार्पण केल्यानंतर आपल्याला सतत दुखणी सुरु होतात. अशावेळी सतत औषधे घेऊन अजूनच त्रास होऊ लागतो. ५० पेक्षा जास्त वयाच्या प्रत्येक स्त्री-पुरुषाने त्यांच्या जीवनशैलीत अवलंबले पाहिजेत. निरोगी अँटिऑक्सिडंट्स, फायटोन्युट्रिएंट्स, कॅल्शियम, फळे, सॅलड्स जोडण्यापासून ते रोगास कारणीभूत असाणरे घटक आपल्याला शरीराला अधिक सक्रीय ठेवतात. यासाठी आहारात कोणते खाद्यपदार्थ असायला हवे हे जाणून घेऊया.

या पदार्थाचा आहारात समावेश करा -

⁃ बीन्स, जे आपल्या अवयवांचे दीर्घायुष्य टिकवून ठेवण्यास मदत करतात,

⁃ स्प्राउट्स जे रोग प्रतिकारशक्ती निर्माण करण्यास मदत करतात,

⁃ राजगिरा, ओट्स, बाजरी इत्यादी ग्लूटेन मुक्त धान्य, जे पचनास मदत करतात.

- मांस कर्करोगाच्या पेशी (कार्सिनोजेन्स) सक्रिय करते आणि ते टाळले पाहिजे, तर मैदा, तेल (Oil) आणि साखर यांसारख्या पदार्थांचे सेवन करु नये.

- सूर्य हा आपल्या आहाराचाही आवश्यक भाग आहे. आपल्या शरीरासाठी जीवनसत्त्व ड -३ तयार करण्याचे काम करते त्यासाठी सकाळी कोवळ्या उन्हात फिरा.

- पाणी:, पुरेशी शीतपेये आणि टरबूज, संत्री इत्यादी पाण्याने (Water) युक्त अन्नपदार्थ घेतल्याने आपल्याला हायड्रेटही राहते.

- चालण्याने पाय हलतात, रक्त वाहते, मन सक्रिय होते.

- तसेच या वयात तेलाचे व तूपाचे प्रमाण आहारात कमी करावे. जीवनसत्त्वे व खनिजांचा आहारात अधिक समावेश करायला हव्या. समोतल आहार घेऊन शरीराची योग्य ती काळजी घ्यावी.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

Edited By - Komal Damudre

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Chest congestion: छातीत घट्ट पिवळा कफ साचलाय? हे 7 घरगुती उपाय करून पाहा, लगेच सैल होईल कफ

Accident : एक्सप्रेसवेवर भीषण अपघात! ट्रकला धडकून पिकअपचा चेंदामेंदा; ६ भाविकांचा मृत्यू, १४ गंभीर जखमी

Manoj Jarange: मनोज जरांगेंच्या उपोषणाचा चौथा दिवस, वैद्यकीय तपासणीला नकार; अंतरवाली सराटीत नेमकं काय घडतंय?

Lek Ladki Yojana : मुलींसाठी सरकारची मोठी योजना! ₹1.01 लाख थेट मदत; फक्त या कुटुंबांनाच मिळणार लाभ

Maharashtra News Live Update: गणेशोत्सव मिरवणुकीमध्ये लेझर लाईटचा वापर करण्यास निर्बंध

SCROLL FOR NEXT