आरोग्यदायी आणि फिट राहण्यासाठी आहारात भाज्या आणि फळांचे सेवन करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. प्रत्येक भाज्या आणि फळांची स्वतःची खासियत असते, त्यामुळे आरोग्याला त्याचे खूप फायदे होतात. आरोग्यदायी राहण्यासाठी न्यूट्रिशनची गरज असते. भाज्या आणि फळं मिनिरल्स आणि व्हिटॅमिनने भरलेले असतात. त्यामुळे डाएटमध्ये हिरव्या रंगाच्या भाज्यांसोबत वेगवेगळ्या रंगाच्या मोसमी भाज्या तसेच फळे खाण्यास सांगितले जाते. वजन कमी करण्यासाठी देखील भाज्या आणि फळे खाण्याचा सल्ला दिला जातो. पण तुम्हाला माहित आहे का की वेगवेगळ्या रंगाच्या भाज्या आणि फळं खाणं तुमच्या आरोग्यावर काय परिणाम करते?
डाएट करताना जास्तीत जास्त लोक हिरव्या पालेभाज्या खाण्यावर भर देतात. या व्यतिरिक्त वेगवेगळ्या रंगाच्या भाज्या आणि फळांचे वेगवेगळे न्यूट्रेशियन्स असतात. लाल, हिरवी, नारंगी आणि पर्पल रंगाच्या भाज्या आणि फळं खाल्याने काय होतं ते जाणून घेऊया.
लाल रंगाची फळे आणि भाज्या
जर तुम्ही तुमच्या डाएटमध्ये टॉमेटो, डाळिंब, बेटरूट, स्टॉबेरी, टरबूज, सफरचंद, लाल शिमला मिरची, चेरी यांसारख्या फळांचा किंवा भाज्यांचा समावेश करत असला तर त्यामुळे तुमच्या स्किनचे सूर्याच्या प्रकाशापासून नुकसान होणे टळते. याशिवाय हृदयाचे आरोग्य चांगले राहते आणि त्यात असलेले अँटीऑक्सिडंट्स रोगप्रतिकारक शक्ती मजबूत ठेवण्यास मदत करतात.
हिरवे पदार्थ खाण्याचे फायदे
तुम्ही तुमच्या आहारात हिरव्या भाज्या किंवा फळांचा समावेश केल्याने हृदयरोगाचा धोका कमी होण्यास मदत होते. त्यामध्ये कर्करोगविरोधी संयुगे आढळतात. या पदार्थांचे दाहक-विरोधी गुणधर्म जळजळ इत्यादींना प्रतिबंधित करतात आणि त्वचा नैसर्गिकरित्या चमकदार आणि तरुण बनवण्यास मदत करतात. हिरवे पदार्थ शरीराला नैसर्गिकरित्या विषमुक्त करण्यास मदत करतात.
नारंगी रंगाचे पदार्थ खाण्याचे फायदे
संत्र, पिकलेली पपई, भोपळा, रताळे या पदार्थांचा तुमच्या आहारात समावेश केल्याने प्रजनन रोग टाळण्यास मदत होते. या भाज्यांमध्ये बीटा-कॅरोटीन भरपूर प्रमाणात असते, त्यामुळे डोळ्यांसाठी ते फायदेशीर असते. याशिवाय, त्यात भरपूर अँटीऑक्सिडंट्स असतात जे कोलेजन वाढवण्यास मदत करतात.
जांभळ्या रंगाच्या पदार्थांचे काय फायदे आहेत?
जांभळ्या रंगाच्या पदार्थांमध्ये पॉलीफेनॉल असतात जे अनेक आरोग्य समस्या टाळतात. हे पदार्थ तुमचे वय वाढत असताना तुम्हाला निरोगी ठेवतात, तुमची त्वचा तरुण ठेवतात, तुमचे हृदय निरोगी ठेवतात, खराब झालेल्या पेशी दुरुस्त करतात आणि तुमचे चयापचय वाढवतात. याशिवाय, वांगी, बेरी, द्राक्षे इत्यादी जांभळ्या रंगाचे पदार्थ खाल्ल्याने देखील आरोग्य चांगले राहते.
Edited By - Purva Palande
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.