Sudden Sweating Causes
Sudden Sweating Causes Saam Tv
लाईफस्टाईल

Sudden Sweating Causes : अचनाक थकवा जाणवतोय ? काम न करता घाम येतोय ? दुर्लक्ष करु नका, अन्यथा...

कोमल दामुद्रे

Sudden Sweating Causes : रोजच्या धावपळीच्या जीवनात आपण आपल्या आरोग्याकडे पुरेसे लक्ष देत नाही. त्यामुळे आपल्या दिवसभरात होणाऱ्या हालचालींकडे दुर्लक्ष होते. कुठले मेहनतीचे काम करताना, अधिक उष्णता असेल किंवा पाण्याचे (Water) सेवन कमी केल्यामुळे आपल्याला घाम येऊ लागतो.

तसेच आपल्याला अचानक पावसाळ्यात घाम आला तर, हा सगळ्यात मोठा चिंतेचा प्रश्न आहे. तज्ज्ञांचे असे मत आहे की, अचानक घाम येणे हे गंभीर हृदयविकाराचे लक्षण असू शकते. आपल्या शरीरात अचानक घाम येऊ लागला तर वेळेवर डॉक्टरांकडे जा. त्यामुळे काही प्रमाणात धोका टळू शकतो. अचानक घाम का येतो आणि त्यासंबंधित आजारांबद्दल जाणून घेऊया.

नेमके कारण काय ?

अचानक घाम येण्याचे कारण म्हणजे रक्तवाहिन्यांतील अडथळे. जेव्हा कोलेस्टेरॉलमुळे रक्तवाहिन्यांमध्ये चरबी जमा होते, तेव्हा रक्त परिसंचरण प्रभावित होऊ लागते, त्याला कोरोनरी धमन्या म्हणतात. कोलेस्टेरॉलमुळे रक्तवाहिन्यांमधील जागा हळूहळू कमी होतात त्यामुळे हृदयापर्यंत रक्त सहज पोहोचत नाही. अशा परिस्थितीत, शरीराचे तापमान कमी ठेवण्याच्या प्रयत्नात, जास्त घाम येणे सुरू होते, जे हृदयविकाराच्या लक्षणांपैकी एक आहे.

हृदयविकाराचा झटका

एका अहवालानुसार, जर तुम्हाला नेहमीपेक्षा जास्त किंवा अचानक घाम येत असेल तर ते हृदयविकाराच्या झटक्याचे लक्षण असू शकते. जर तुम्ही कोणताही व्यायाम करत नसाल आणि गरम होत नसेल तर असा घाम येणे चिंताजनक आहे. जेव्हा एखाद्याला हृदयविकाराचा झटका येतो तेव्हा त्या काळात हृदयाच्या धमन्या हृदयाला योग्यरित्या रक्त पंप करण्यास सक्षम नसतात. अशावेळी हृदयाला रक्ताची जास्त गरज असते, त्यामुळे हृदयापर्यंत रक्त (Blood) वाहून नेण्यासाठी धमन्यांना जास्त मेहनत करावी लागते आणि त्यामुळे अचानक घाम येतो.

रात्री घाम येणे

महिलांना रात्री अनेकदा घाम येतो. ही देखील हृदयविकाराची लक्षणे आहेत. तसे, रजोनिवृत्ती दरम्यान, रात्री घाम येणे किंवा गरम असताना घाम येणे सामान्य आहे. पण याशिवाय जास्त घाम येत असेल तर काळजी घेण्याची गरज आहे.

वैद्यकीय स्थिती देखील कारण आहे ?

अनेकांना त्यांच्या वैद्यकीय स्थितीमुळे अचानक घाम येऊ लागतो. त्यामुळे कुठली गोष्ट लक्षात न राहण्याचा धोका वाढतो. तज्ज्ञांनी अभ्यासातून निष्कर्ष काढला की, स्ट्रोक किंवा हृदयविकाराचा झटका अशा स्थितीत असलेल्या लोकांमध्ये स्मृतिभ्रंशाचा धोका तिप्पट असतो.

हायपरहाइड्रोसिस

जास्त घाम येणे हे काही वेळा धोक्याचे लक्षण असते. बर्‍याच प्रकरणांमध्ये हायपरहाइड्रोसिसने ग्रस्त असलेले लोक ही समस्या अधिक असतात. त्यामुळे बेफिकीर राहणे योग्य नाही. तुम्हालाही अचानक घाम येत असेल तर नक्कीच डॉक्टरांचा सल्ला घ्या.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shirdi News: अवघ्या एका रुपयात लग्न.. शिर्डीतील कोते दाम्पंत्याचा आदर्श उपक्रम; २४ वर्षात केले २३०० मुलींचे कन्यादान

Shukrawar Upay: शुक्रवारी महिलांनी करू नका ही कामे, माता लक्ष्मी होईल नाराज

Abijeet Patil News | अभिजीत पाटील यांच्या साखर कारखान्यावरची जप्ती टळली, नुकताच केला होता भाजपमध्ये प्रवेश

Yawal Fire News : प्राचीन श्रीराम मंदिरासह बँकेला आग; शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचा अंदाज

Sony AC : रखरखत्या उन्हात रस्त्यावरून जातानाही मिळणार एसीची हवा; कसं? जाणून घ्या सविस्तर

SCROLL FOR NEXT