Health Tips : सकाळी उठल्यानंतर आपल्यापैकी काहीजण चहा-कॉफीचे सेवन करतात तर काही ते देखील वगळतात. सकाळच्या वेळी आपल्याला इतकी घाई असते की, आपल्याकडे नाश्ता करण्यासाठी देखील पुरेसा वेळ नसतो. अशावेळी काही न खाता आपण प्रवास किंवा दिवसाची सुरुवात केल्यास आपल्याला मळमळू लागते किंवा आपली एनर्जी डाउन होते.
नाश्ता हा आपल्या आहारातील सर्वात महत्त्वाचे जेवण आहे. जर आपण हे वगळले तर आपल्याला आरोग्याच्या अनेक समस्यांना सामोरे जावे लागू शकते. नाश्ता न केल्याने आपल्याला हृदय चांगल्या प्रकारे काम करत नाही. ज्यामुळे तुम्हाला हृदयाशी संबंधित समस्या देखील असू शकतात. जाणून घेऊया त्याचा कसा परिणाम होतो.
नाश्ता न केल्यास आरोग्यावर कसा परिणाम होतो -
1. हृदयाची समस्या -
सकाळच्या वेळी नाश्ता न केल्यास रक्तदाब हा सामान्यपेक्षा अधिक प्रमाणात वाढू लागतो. ज्यामुळे रक्तवाहिन्यांमधील रक्तप्रवाहावर परिणाम होतो. त्यासाठी नाश्ता चुकूनही वगळू नका
2. मधुमेह
सकाळच्या नाश्त्याकडे दुर्लक्ष केल्यास मधुमेह (Diabetes) होण्याची शक्यता अधिक वाढते. हा त्रास जास्त प्रमाणात ऑफिस वर्क करणाऱ्या लोकांमध्ये जास्त दिसून येतो.
3. वजन वाढणे
जर तुम्ही नाश्ता वगळलात, तर तुम्हाला दुपारच्या आणि रात्रीच्या जेवणात जास्त भूक लागते आणि तुम्ही जास्त सॅच्युरेटेड फॅट, कॅलरी आणि साखरेचा वापर करू लागतो. त्यामुळे वजन झपाट्याने वाढू लागते.
4. कर्करोगाचा धोका-
तुम्ही दिवसाची सुरुवात नाश्त्याने केली नाही तर तुम्हाला अनेक गंभीर समस्यांना सामोरे जावे लागू शकते. म्हणजेच तुम्ही देखील कॅन्सरचा (Cancer) बळी होऊ शकता. म्हणूनच नाश्ता कधीही वगळू नये.
5. मायग्रेन-
जेव्हा तुम्ही नाश्ता वगळता तेव्हा तुमच्या रक्तातील साखरेची पातळी कमी होते आणि यामुळे उच्च रक्तदाब आणि डोकेदुखी होऊ शकते. त्यामुळे त्याचा नाश्ता वगळण्याचा विचार करु नका.
6. ऊर्जा पातळी
मानसशास्त्रीयदृष्ट्या, जर तुम्ही सकाळी नाश्ता केला नाही तर तुम्हाला दिवसभर ऊर्जेची कमतरता जाणवते आणि तुमचा मूडही चांगला राहत नाही.
डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.