Health Tips Obesity yandex
लाईफस्टाईल

Health Tips: बदलत्या जीवनशैलीमुळे मुलांमध्ये वाढतोय लठ्ठपणा; 'हे' आजार होण्याचा असतो धोका

Child Health: लहान मुलांमधील लठ्ठपणाची समस्या आजकाल वाढताना दिसत आहे. वाढलेल्या वजनामुळे मुलांना अनेक समस्या दिसून येतात. बदलत्या जीवनशैलीमुळे मुलांमध्ये लठ्ठपणाच्या समस्या दिसून येत आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

आजकाल लहान मुलांच्या चुकीच्या खाण्या पिण्याच्या सवयींमुळे त्यांना अनेक आजार होतात. वाढलेल्या वजनामुळे लठ्ठपणा, रक्तदाब, मधुमेह यासारखे आजार होण्याची शक्यता असते. वाढलेल्या वजनामुळे पालकांना त्यांच्या मुलांच्या आरोग्याची काळजी वाटू लागते. मुलांचे वजन कमी करण्यासाठी त्यांचे पालक अनेक प्रयत्न करतात. मात्र, जंक फूडच्या सेवनामुळे आणि नियमित व्यायाम नाही केल्यामुळे मुलांची रोगप्रतिकारक शक्ती कमी होत असते.

शरीर तंदुरुस्त ठेवण्यासाठी योग्य आणि पोषक आहाराचे सेवन गरजेचे आहे. बाजारात मिळणाऱ्या चिप्स, कोल्ड ड्रिंक्स आणि जंक फूडमध्ये सॅच्युरेटेड फॅट्स आढळतात, ज्यामुळे शरीरात चरबी जमा होते. त्यामुळे लठ्ठपणा सारख्या समस्या होतात. वजन वाढल्यामुळे शरीरामध्ये अनेक बदल होतात. वजन वाढणे आपल्या शरीरासाठी हानिरकारक असते. वाढलेल्या वजनामुळे आळशीपणा, हृदयाचे विकार, श्वावास घेण्यास त्रास अशा समस्या उद्भवू शकतात.

वजन नियंत्रित ठेवण्यासाठी पोषक आहाराचे सेवन करणे गरजेचे असते. आहारात विविध भाज्यांचा आणि फळांचा समावेश केल्यास वजन कमी होण्यास मदत होते. अनेकजण वजन कमी करण्यासाठी औषध घेतात. पण या औषधांच्या सेवनामुळे तुम्हाला गंभीर आजार होऊ शकतात. औषधांच्या सेवनामुळे किडनीस्टोन, हृदयविकार यासारखे गंभीर आजार होण्याची शक्यता असते. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनुसार शहरातील मुलांमध्ये लठ्ठपणाची संख्या वाढताना दिसली आहे. याचे मुख्य कारण म्हणजे मुलांची जीवनशैली.

हे आजार होऊ शकतात :

वजन वाढल्यामुळे कोलेस्टेरॉलची पातळी वाढते, ज्यामुळे रक्तवाहिन्या ब्लॉक होतात आणि हृदयाचे विकर दिसून येतात. लठ्ठपणामुळे मुलांमध्ये मधुमेहाचा धोका वाढतांना दिसतोय. वाढलेल्या वजनामुळे हाडांवर दबाव येतो. सांधेदुखी सारख्या समस्या होऊ शकतात. लठ्ठपणामुळे कर्करोगाचा धोका वाढतो. लठ्ठपणामुळे उच्च रक्तदाब, फॅटी लिव्हर यासारख्या देखील समस्या दिसून येतात. मात्र नियमित व्यायाम आणि पोषक आहाराच्या समावेश केल्यास वजन नियंत्रित राहू शकते.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Exit Poll: नागपूर दक्षिणमध्ये देवेंद्र फडणवीस होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Polls : कल्याण ग्रामीणमध्ये मनसेचं इंजिन धावणार का? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Poll: तुमसरमध्ये राजू कारेमोरे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

महाराष्ट्राचा महानिकाल, निवडणूक निकालाचं हेडक्वार्टर SAAM TV

Maharashtra Election Result : महाराष्ट्र कुणाचा? मतमोजणी कधीपासून आणि कुठे पाहाल?

SCROLL FOR NEXT