Health Tips Canva
लाईफस्टाईल

Health Tips: उन्हाळ्यात कोरडा खोक्यामुळे त्रस्त आहात? मधात 'या' गोष्टी मिसळून सेवन केल्यास मिळेल आराम

Health: तापमानात अचानक बदल झाल्यामुळे अनेकांना कोरडा खोकला आणि सर्दी या सारख्या समस्या होतात. बदलत्या ऋतूमुळे अनेक लोकांना कोरडा खोकल्याचा त्रास होतो. थंड पाण्याच्या सेवनामुळे श्वसनमार्गामध्ये जळजळ होते ज्यामुळे खोकला होतो.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Summer Tips : तापमानात अचानक बदल झाल्यामुळे अनेकांना कोरडा खोकला आणि सर्दी या सारख्या समस्या होतात. वाढत्या गरमी मुळे अनेक लोकं थंड पाण्याचे सेवन करतात ज्यामुळे घसा दुखू लागतो. बदलत्या ऋतूमुळे अनेक लोकांना कोरडा खोकल्याचा त्रास होतो. थंड पाण्याच्या सेवनामुळे श्वसनमार्गामध्ये जळजळ होते ज्यामुळे खोकला होतो. वाढत्या तापमाणामुळे शरीराची प्रतिकारशक्तीही कमी होते आणि उष्मघाताचा त्रास होऊ शकतो. मात्र, असे काही घरगुती उपाय आहेत ज्यामुळे तुम्हाला कोरड्या खोकल्या पासून आराम मिळू शकतो.

खोकल्यामुळे संपूर्ण पोटात आणि बरगड्यांमध्ये वेदना जाणवतात. कोरडा खोकला आणि सर्दी या समस्या सहसा फ्लू सारख्या विषाणूच्या संसर्गामुळे होतात. मोठ्यांपासून ते लहान मुलांपर्यंत सर्वांना मध खायला आवडतं. मध हा असा नैसर्गिक पदार्थ आहे ज्यामुळे कोरड्या खोकल्यापासून आराम मिळू शकतो. मधामध्ये काही खास गोष्टी मिसळून त्याचे सेवन केल्यास खोकल्यापासून त्वरित आराम मिळतो.

मध आणि आले

कोरड्या खोकल्याच्या समस्येपासून आराम मिळवण्यासाठी मधात आले मिसळून खाणे खूप फायदेशीर ठरते. मधामध्ये बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करणारा पदार्थ असतो आणि त्यासोबतचं अँटिऑक्सिडेंट गुणधर्म असतात ज्यामुळे कोरड्या खोकल्यापासून आराम मिळतो. मधमुळे घशाची जळजळ कमी होते आणि खोकला कमी करण्यास मदत करते.

मध आणि लवंग

लवंग मसाल्यामध्ये मिळणारा घटक आहे ज्यामध्ये बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करणारा पदार्थ आणि दाहक-विरोधी गुणधर्म असतात. याचे मधामध्ये मिसळून सेवन केल्यास घसा खवखवणे कमी होते. त्यामुळे ५ ते ५ तव्यावर थोडे भाजून आणि बारीक करून घ्या. त्यात मधा मिसळा आणि या मिश्रणाचे दिवसातून ३ वेळा सेवन केल्यास खोकल्यापासून आराम मिळतो.

मध आणि काळी मिरी

मध आणि काळी मिरी यांचे मिश्रणाचे सेवन केल्यास खोकल्यापासू त्वरीत आराम मिळतो. ३-४ काळी मिरी दाबून तव्यावर भाजून घ्या. त्याची पावडर बनवून त्याचे मधासोबत सेवन करा.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ind Vs Eng सामना उशिराने सुरु, पावसामुळे भारताची विजयाची संधी हुकणार?

Bogus Soyabean Seeds : पेरलेले सोयाबीन उगवलेच नाही; शेतकऱ्यांकडून सोयाबीनची दुबार पेरणी

Unmarried Bollywood Actress: 'या' प्रसिद्ध अभिनेत्रींनी अजून केलं नाही लग्न

Mahayuti: नवी मुंबईत राजकीय घडामोडींना वेग; अजित पवार गट महायुतीतून बाहेर पडणार?

Mumbai Shocking : लव्ह, समलैंगिक संबंध अन् १६ वर्षीय मुलाचा संशयास्पद मृत्यू; मुंबईत अनोख्या प्रेमाचा धक्कादायक अंत

SCROLL FOR NEXT