How to make Summer drinks recipe in Marathi Saam tv
लाईफस्टाईल

Tulsi Benefits : तुळशीचे १० प्रकार लाभदायी, सेवन केल्याने दुर्धर आजार होईल दूर

Holy Basil Plant : सहारनपुरातील कुंज हर्बल वाटिकामध्ये १० प्रकारचे तुळशीचे रोपटे लावण्यात आले आहेत. हिंदू धर्मात तुळशीचं भरपूर महत्व आहे. तुळशीच्या पानाचा उपयोग करून आयुर्वेदिक उपचार केले जातात.

Vishal Gangurde

Health tips :

सहारनपुरातील कुंज हर्बल वाटिकामध्ये १० प्रकारचे तुळशीचे रोपटे लावण्यात आले आहेत. हिंदू धर्मात तुळशीचं भरपूर महत्व आहे. तुळशीच्या पानाचा उपयोग करून आयुर्वेदिक उपचार केले जातात. या वाटिकामध्ये लावण्यात आलेल्या १० प्रकारच्या तुळशीमध्ये दुर्धर आजारांवर मात करण्याची क्षमता असते. (Latest Marathi News)

मीडिया रिपोर्टनुसार, सहारनपूरच्या दिल्ली रोड येथील हर्बल वाटिकाचे अध्यक्ष राजेंद्र अटल यांनी सांगितलं की, लोकांना रामा आणि श्यामा मुख्यत:दोन प्रकारच्या तुळशीची अधिक माहिती असते. खरंतर तुळशीचे १० प्रकार असतात. हर्बल वाटिकामध्ये १० प्रकारचे तुळशी लावण्यात आल्या आहेत.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

तुळशीचे आहेत १० प्रकार

रामा आणि श्यामा या तुळशी व्यतिरिक्त १० प्रकार आहेत. बद्रीनाथ तुळशी, मरवा तुळशी, पिपरमेंट तुळशी, लिंबू तुळशी, मीठी तुळशी, मसाला तुळशी, हिमालय तुळशी, वन तुळशी या प्रजातीच्या तुळशी वाटिकामध्ये उपलब्ध आहेत.

तुळशीचे पान खा अन् दुर्धर आजारांवर मात करा

आचार्य राजेंद्र अटल यांच्या म्हणण्यानुसार, तुळशीच्या पानाचे ४० दिवस सेवन केल्यास कँसर सारख्या दुर्धर आजारावरही मात करता येऊ शकते. तुळशीचे सात पाने पाण्यात टाकून उकळवून प्यायल्यास लाभदारक फायदा होऊ शकतो. तुळशीच्या बीजामुळे नपुंसकता सारख्या आजारांवरही मात करता येऊ शकते'.

'तुळशीच्या पानाचे सेवन केल्यानं स्त्री-पुरुषांना होणाऱ्या लैंगिक व्याधींवरही मात करता येऊ शकते, असेही ते म्हणाले. 'कोरोना काळात तुळशीच्या पानाचे सेवन केल्यानेही रुग्णांना चांगला आरोग्यदायी फायदा मिळाला,असेही त्यांनी सांगितले.

डिस्क्लेमर : हा लेख आरोग्य क्षेत्रातील जाणकार,आरोग्य तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीच्या आधारावर लिहिण्यात आला आहे. हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

2025 NaraliPurnima : नारळी पौर्णिमेचे दुसरे नाव काय आहे?

Friendship Day 2025 : 'फ्रेंडशिप डे'ला मित्रांसाठी खास बनवा 'मिष्टी दोई', नात्यात वाढेल गोडवा

Marathi Film Awards: महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कारांची घोषणा; महेश मांजरेकर, मुक्ता बर्वेसह 'या' कलाकारांचा होणार सन्मान

Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांना मोठा धक्का; भारताने घेतला महत्वाचा निर्णय

Amravati News: ग्रामपंचायत कार्यालय बनला कुस्तीचा आखाडा; सरपंच आणि सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी|VIDEO

SCROLL FOR NEXT