5 Early Warning Signs Before a Heart Attack saam tv
लाईफस्टाईल

Heart Attack Symptoms : प्रत्येकवेळी छातीत कळ आली म्हणजे हार्ट अटॅक नाही, त्याआधी शरीर देतं 5 संकेत

warning signs of heart attack : छातीत येणारी प्रत्येक कळ ही नेहमीच हृदयविकाराचा झटका असते असे नाही इतर अनेक साध्या कारणांमुळेही असा त्रास होऊ शकतो. जाणून घ्या या लक्षणांबद्दल

Saam Tv

हृदयविकाराचा झटका म्हणजेच हार्ट अटॅक म्हटले की सर्वप्रथम डोळ्यांसमोर येते ती छातीत होणारी तीव्र वेदना. मात्र, प्रत्येक वेळी हार्ट अटॅकची सुरुवात छातीत दुखण्यानेच होते असे नाही. काही वेळा छातीत वेदना जाणवण्यापूर्वीच शरीर काही संकेत देत असते. त्यामध्ये अचानक थकवा जाणवणे, श्वास घेण्यास त्रास होणे, मळमळणे किंवा थंड घाम येणे यांसारखी लक्षणे हार्ट अटॅकची सुरुवातीची चिन्हे असू शकतात. त्यामुळे या लक्षणांकडे दुर्लक्ष करणे जीवावर बेतू शकते.

छातीत दुखण्याआधी कोणती लक्षणे दिसतात?

हृदयविकाराचा झटका येताना प्रत्येक व्यक्तीला सारखीच लक्षणे जाणवतात असे नाही. काही रुग्णांमध्ये सुरुवातीला छातीत वेदना न होता इतर त्रास जाणवू शकतात.

अचानक प्रचंड थकवा जाणवणे

पुरेशी झोप आणि विश्रांती घेऊनही अचानक अशक्तपणा किंवा असामान्य थकवा जाणवणे हे संभाव्य धोक्याचे लक्षण असू शकते. विशेषतः महिलांमध्ये हे लक्षण दुर्लक्षित होण्याची शक्यता असते.

श्वास घेण्यास त्रास होणे

कोणतेही मोठे शारीरिक श्रम न करता धाप लागणे किंवा अचानक श्वास घेण्यास त्रास होणे हे हृदयाशी संबंधित समस्येचे संकेत असू शकतात. काही वेळा छातीत दुखत नसतानाही श्वास घेण्यास त्रास होऊ शकतो.

मळमळ आणि उलट्या होणे

अचानक मळमळणे, उलट्या होणे किंवा पोटात अस्वस्थता जाणवणे हीदेखील हार्ट अटॅकची संभाव्य लक्षणे आहेत. अनेकदा लोक याला अॅसिडिटी किंवा अपचन समजून दुर्लक्ष करतात.

शरीरावर थंड घाम येणे

कोणतेही शारीरिक श्रम न करता अचानक थंड घाम फुटणे, अंगाला घाम येणे आणि अस्वस्थ वाटणे ही लक्षणे गंभीर असू शकतात.

चक्कर येणे किंवा डोके हलके वाटणे

अचानक चक्कर येणे, डोळ्यांसमोर अंधारी येणे किंवा बेशुद्ध पडल्यासारखे वाटणे याकडेही गांभीर्याने पाहणे आवश्यक आहे.

महिलांमध्ये हार्ट अटॅकची लक्षणे वेगळी असू शकतात

महिलांमध्येही छातीत दुखणे किंवा दडपण जाणवणे हे हार्ट अटॅकचे महत्त्वाचे लक्षण आहे. मात्र, त्यासोबत किंवा त्याऐवजी पाठ, मान, जबडा आणि खांद्यामध्ये वेदना होणे, असामान्य थकवा, श्वास घेण्यास त्रास आणि मळमळ यांसारखी लक्षणे दिसू शकतात. त्यामुळे महिलांनी या लक्षणांकडे विशेष लक्ष देणे गरजेचे आहे.

हार्ट अटॅकची लक्षणे दिसल्यास काय करावे?

छातीत दडपण किंवा वेदना, श्वास घेण्यास त्रास, थंड घाम, चक्कर किंवा इतर संशयास्पद लक्षणे दिसल्यास तातडीने वैद्यकीय मदत घ्यावी.स्वतः वाहन चालवून रुग्णालयात जाण्याचा प्रयत्न करू नये. तसेच, लक्षणे आपोआप कमी होण्याची वाट पाहू नये. हार्ट अटॅक नेहमीच तीव्र छातीत दुखण्याने सुरू होतो असे नाही. शरीराने दिलेले छोटे संकेतही जीव वाचवण्यासाठी महत्त्वाचे ठरू शकतात. त्यामुळे कोणतीही संशयास्पद लक्षणे जाणवल्यास वेळ न घालवता तातडीने डॉक्टरांची मदत घ्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: दुष्काळी परिस्थितीत हळद पिकाचे व्यवस्थापन करा - केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव

Mangalsutra Vati Design: नव्या नवरीसाठी मंगळसूत्राच्या हटके वाटी डिझाइन्स; पारंपरिक अन् मॉडर्न कलेक्शन पाहिलंत का?

BJP Leader Arrested : घरात आढळल्या ६४५ दारूच्या बाटल्या, भाजप नेत्याला अटक, राजकारणात खळबळ

Union Cabinet: बंदरे ते एअरपोर्ट, 19,934 कोटींचा खर्च; केंद्राकडून ५ योजनांना मंजुरी, वाचा मोदी सरकारनं घेतलेले ५ मोठे निर्णय

शिंदे आणि फडणवीस यांना कोंडीत पकडणारा सवाल! पहाटेचा शपथविधी आणि मविआ काळाचा दाखला, कोर्टात नेमकं काय झालं?

SCROLL FOR NEXT