Exercise For Weight Loss Saam Tv
लाईफस्टाईल

Exercise At Home: घरबसल्या बेडवर झोपून करा हे व्यायाम; वजन कमी होण्यास होईल मदत

Exercise For Weight Loss: शरीर निरोगी ठेवण्यासाठी व्यायाम करणे महत्त्वाचे आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Exercise For Health :

रोजच्या धावपळीच्या जीवनात अनेकदा शरीराकडे दुर्लक्ष होतं. त्यामुळे आपण अनेकदा आजारांना बळी पडतो. या सगळ्यावर एक चांगला उपाय म्हणजे व्यायाम आणि योगासने. व्यायाम आणि योगासने केल्यावर शरीर निरोगी राहते.

योग आणि व्यायाम शरीरासाठी खूप महत्त्वाचे आहे. परंतु व्यायाम करण्यासाठी अनेकदा वेळ मिळत नाही. घर आणि ऑफिसची कामे सांभाळून शरीराकडे लक्ष देण्यासाठी वेळ मिळत नाही. त्यामुळे अनेकजण जिमला जातात. जिमला जाण्यासाठीदेखील पैसे आणि वेळ द्यावा लागतो. या सगळ्यावर उपाय म्हणूनच आज आम्ही तुम्हाला असे काही व्यायाम सांगणार आहोत जे तुम्ही बेडवर बसून किंवा झोपून करु शकतात.

क्रंचेस

पोटाची चरबी कमी करण्यासाठी क्रंचेस हा सर्वोत्तम व्यायाम आहे. ज्या लोकांना abs बनवायचे आहेत. त्यांच्यासाठी हा व्यायाम अत्यंत फायदेशीर आहे. हा व्यायाम करण्यासाठी बेडवर पाय वाकवून झोपा. त्यानंतर आपले हात डोक्याच्या मागे ठेवा. आणि आता पोटावर दाब देऊन उठण्याचा प्रयत्न करा. किमान ७ ते १० वेळा हे करण्याचा प्रयत्न करा.

एअर सायकलिंग

एअर सायकलिंग करणे हा सर्वोत्तम व्यायाम आहे. यात तुम्हाला फक्त पलंगावर झोपून सायकल चालवायची आहे. म्हणजेच पलंगावर झोपून तुम्हाला हवेत सायकलिंग करतात तसे पाय हलवायचे असतात. हा व्यायाम केल्याने तुम्ही पोट, कंबर आणि मांड्यावरील अतिरिक्त चरबी कमी करु शकता. हा व्यायाम तुम्ही ५ ते १० मिनिटांसाठी करा.

पाय लिफ्ट करणे

पाय हवेत लिफ्ट करणे हा सर्वात चांगला व्यायाम आहे. यासाठी पलंगावर पाठीवर सरळ झोपावे. त्यानंतर हात खाली ठेवा. यानंतर श्वास घेताना पाय वर करा. काही सेकंद थांबा आणि नंतर श्वास सोडा आणि पाय खाली घ्या. हा व्यायाम केल्याने तुमचे वजन कमी होईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shocking : अल्पवयीन मुलीला फ्लाईंग किस देणं पडलं महागात, तरुणाला भोगावा लागणार ३ वर्षाचा तुरुंगवास

Maharashtra Live News Update: अमोल कोल्हे यांचा गौप्य स्फोट

AI इम्पॅक्ट समिटमध्ये PM मोदींविरोधात घोषणा, युवा काँग्रेसच्या आंदोलनामागचं कारण काय?

Spinach Paneer Toast Recipe: पिझ्झा-बर्गर विसरून जाल! मुलांसाठी बनवा सुपर हेल्दी क्रिस्पी पालक पनीर टोस्ट; रेसिपी आहे एकदम सोपी

Tata Punch EV Price: 15 मिनिटांत चार्ज होणारी टाटा पंच इलेक्ट्रिक भारतात लॉन्च; परवडणारी किंमत, 468 KM रेंज अन् बरंच काही, वाचा सविस्तर

SCROLL FOR NEXT