Sleep  Saam Tv
लाईफस्टाईल

High Blood Pressure Causes: रोज ६ तासांहून कमी झोप घेताय? सावध व्हा! होऊ शकतो 'हा' गंभीर आजार, युवकांना धोका अधिक

Sleep and Sleep Disorders: कमी झोप घेणाऱ्या व्यक्तींना गंभीर आजार होण्याची शक्यता अधिक असते. ६ तासांहून कमी झोप घेणाऱ्या व्यक्तींना हायपरटेन्शन (उच्च रक्तदाब) सारख्या आजारांचा सामना करावा लागू शकतो.

Vishal Gangurde

High Blood Pressure Causes:

शरीराला निरोगी ठेवण्यासाठी दररोज ७ ते ८ तास झोप घेणे गरजेचे आहे. या कालावधीपेक्षा कमी झोप घेणाऱ्या व्यक्तींना गंभीर आजार होण्याची शक्यता अधिक असते. ६ तासांहून कमी झोप घेणाऱ्या व्यक्तींना हायपरटेन्शन (उच्च रक्तदाब) सारख्या आजारांचा सामना करावा लागू शकतो. रिपोर्टनुसार, भारतात २५ टक्के प्रौढ्य व्यक्तींना उच्च दाबाचा सामना करावा लागत असल्याची माहिती समोर आली आहे. (Latest Marathi News)

'नॅशनल सेंटर फॉर बायोटेक्नोलॉजी इन्फॉर्मेशन'च्या अभ्यासानुसार, झोपेमुळे आपल्या नर्व्हस सिस्टमच्या मज्जासंस्थेचे कार्य, हार्मोन्स आणि अन्य शारीरिक घटकात बदल होतात. स्लीप डिसॉर्डरमुळे उच्च रक्तदाबाच्या आजाराला निमंत्रण मिळतं. तुम्ही दिवसाला ७ ते ८ तासांची झोप घेत असाल तर, तुमचा रक्तदाब कमी राहतो. तुम्ही ८ तासांपर्यंत झोप घेतली तर रक्तदाब १० ते २० टक्के कमी होतो.

रात्री कमी झोप, आजारांना निमंत्रण

रात्री कमी झोप घेतल्यामुळे उच्च रक्तदाब, क्रॉनिक किडनी रोग, मधुमेह इत्यादी अनेक आजारांचा धोका संभावतो. अपुऱ्या झोपेमुळे आरोग्यावर वाईट परिणाम होत असल्याचे अभ्यासातून समोर आले आहे.

अपुऱ्या झोपेमुळे हृदयावर परिणाम होतो. उच्च रक्तदाबामुळे हृदयविकाराचा झटका येऊ शकतो. त्यामुळे प्रौढ्य व्यक्तींनी दिवसाला कमीत कमी ७ ते आठ तासांची झोप घेतली पाहिजे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

हार्मोन्समध्ये होतो बदल

७ ते ८ तासांपेक्षा कमी झोप घेण्याऱ्या रक्तदाब आणि इतर आजारांचा धोका बळावतो. ६ तासांहून कमी झोप घेणे आरोग्यासाठी धोकादायक असते. ६ तासांपेक्षा कमी झोप घेतल्यामुळे शरीरातील हार्मोन्समध्ये बदल होतात. हार्मोन्समध्ये बदल झाल्यामुळे उच्च रक्तदाब आणि हृदय रोग होण्याची शक्यता बळावते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai-Pune Expressway Missing Link: मुंबई- पुणे कनेक्टिव्हिटी बिघडली; एक्सप्रेसवेवर कोंडी नियोजनचं 'मिसिंग'

LPG Cylinder: महागाईच्या झळा, सामान्यांना 'कळा'! व्यावसायिक सिलेंडर 993 रुपयांनी महागला; खाद्यपदार्थांच्या किंमती वाढणार?

Pune Crime: गुरांच्या गोठ्यात ४ वर्षाच्या मुलीवर बलात्कार, लैंगिक अत्याचारानंतर चिमुरडीची हत्या

Mumbai Pune Missing Link : 'मिसिंग लिंक'ला विरोध; लोणावळ्यातून प्रवेश देण्याची मनसेची मागणी

Ladki Bahin Yojana: राज्यातील १ कोटी ८९ लाख लाडक्या बहिणी पात्र; ५४ लाख बहिणींना नाही मिळणार १५०० रुपये

SCROLL FOR NEXT