Health Care During Periods Saam Tv
लाईफस्टाईल

Health Care During Periods : मासिक पाळीच्या दरम्यान कधी 'या' चुका करु नका, अन्यथा...

पौगंडावस्थेनंतर मुलींना मासिक पाळी येऊ लागते. तुम्हीही या काळात फक्त स्वच्छतेकडे जास्त लक्ष देता का?

कोमल दामुद्रे

Health Care During Periods : मासिक पाळी ही पौगंडावस्थेनंतर मुलींमध्ये येऊ लागते. या काळात मुली काही माहित नसल्यामुळे साधारण चुका करतात ज्याचा पुढे जाऊन आरोग्याला हानी होते.

पौगंडावस्थेनंतर मुलींना मासिक पाळी येऊ लागते. तुम्हीही या काळात फक्त स्वच्छतेकडे जास्त लक्ष देता का? यावेळी तुम्ही तुमचे संपूर्ण शरीर निरोगी ठेवावे. अन्यथा अनेक प्रकारच्या समस्या निर्माण होतात. या काळात काय करावे आणि काय करू नये हे जाणून घेतले पाहिजे. आज आम्ही तुम्हाला मासिक पाळी दरम्यान काय करू नये हे सांगणार आहोत. जाणून घेऊया, त्याबद्दल

1. योग्य वेळी पॅड न बदलणे -

मासिक पाळी दरम्यान पॅड वापरताना किंवा तो बदलताना विशेष काळजी (Care) घ्यावी का? हा एक अतिशय सामान्य प्रश्न असला तरी, त्याबद्दल अनेक मुली खूप गोंधळलेल्या आहेत. याविषयी वेळीच माहिती न मिळाल्यास गंभीर समस्या निर्माण होऊ शकतात. विशेषतः संसर्गाची भीती कायम आहे.

म्हणूनच तुम्ही योग्य वेळी पॅड बदलले पाहिजेत. एकच पॅड ४ तासांपेक्षा जास्त काळ वापरू नका. पॅड बराच काळ रक्त शोषत नाही. त्यामुळे काही वेळाने पॅड क्रॅक होऊ लागते. त्यामुळे पॅड बदलले पाहिजेत. दिवसातून किमान 3 वेळा पॅड बदला आणि ते रक्तप्रवाहावर देखील अवलंबून असते.

2. व्यायाम वगळू नका (why you should not skip excercise )

मासिक पाळी दरम्यान होणाऱ्या वेदनेमुळे थकवा येतो. यामुळे अनेक जण व्यायाम करणे टाळतात पण व्यायाम केल्याने आपला मूड फ्रेश होतो व मासिक पाळीतील वेदनेचा त्रासही कमी होतो. या काळात सोपा व हलका व्यायाम करा. जड व्यायामामुळे तुमच्या शरीराला हानी पोहोचू शकते. भद्रासन, बालासन आणि उत्तन शिशुसन करावे. हे आसन मासिक पाळीच्या वेदना कमी करण्यास मदत करेल.

3. मीठ खाऊ नका

मासिक पाळीच्या काळात पोट फुगण्याची समस्या अधिक असते. त्यामुळे अशा गोष्टी टाळल्या पाहिजेत ज्यामुळे ही समस्या वाढू शकते. मिठाच्या अतिसेवनामुळे शरीरात अनेक आजार (Disease) होतात. पीरियड्स दरम्यान मीठाचे सेवन केल्यास समस्या वाढू शकते. त्यामुळे खारट पदार्थांचा आहारात समावेश करू नका.

4. नाश्ता न करणे

मासिक पाळीच्या काळात आपल्या शरीरातून रक्त बाहेर पडतं. त्यामुळे या काळात शरीराला अधिक पोषणाची गरज असते. तसेच या काळात बरेच स्त्रिया वेदनेमुळे नाश्ता करत नाही अशावेळी पोषक तत्वांनी भरपूर असलेले अन्न खायला हवे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Palak Kofta Recipe: घरीच बनवा कुरकुरीत पालक कोफ्ते; चव चाखून विसराल हॉटेलची डिश

Maharashtra Live News Update : अंबादास दानवे यांनी घेतली संजय राऊत यांच्या निवासस्थानी भेट

Putin india tour : पुतिन यांच्या भारत दौऱ्याने काय मिळणार? या क्षेत्रात होणार फायदा, ८ महत्वाचे करार गेमचेंजर ठरणार?

मार्केट होणार जॅम! Maruti Suzuki e-Vitara लॉन्च; ५०० किमीची रेन्ज अन् ५ हायटेक फीचर्स

नागपूर हादरलं! मुलीच्या डोक्याला दुखापत, मुलाच्या छातीवर शस्त्रानं वार; नंदनवन कॉलनीतील 'त्या' खोलीत जोडप्यासोबत काय घडलं?

SCROLL FOR NEXT