Swelling in brain nerves saam tv
लाईफस्टाईल

Cerebral edema: मेंदूच्या नसा फुगल्यावर शरीर देतं खास संकेत, वेळीच लक्ष द्या अन्यथा जीव गमवाल

Swelling in brain nerves: आपल्या शरीरात मेंदूचं कार्य महत्त्वाचं असतं. यावेळी मेंदूच्या कार्यात कोणताही बिघाड झाल्यास शरीर तुम्हाला त्याबाबत संकेत देतं. यावेळी मेंदूच्या नसांना सूज आल्यावर काय लक्षणं दिसतात ते पाहूयात.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मेंदू हा आपल्या शरीरातील एक महत्त्वाचा अवयव मानला जातो. अनेकदा डोक्याच्या नसांना म्हणजेच मेंदूच्या नसांना सूज येण्याची परिस्थिती उद्भवते. याला वैद्यकीय भाषेत सेरेब्रल एडिमा असं म्हणतात. मात्र ज्यावेळी ही परिस्थिती उद्भवते त्यावेळी शरीर तुम्हाला काही ना काही लक्षणं देत असतं.

मेंदूच्या नसांना सूज येण्यामागे अनेक कारणं असू शकतात. तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, मेंदूच्या नसांना सूज आल्याने रूग्णाच्या जीवालाही धोका असतो. वैद्यकीय भाषेत याला सेरेब्रल एडिमा असं म्हणतात. सामान्यपणे चुकीची लाईफस्टाईल आणि एखादी जखम यामुळे हा त्रास होण्याचा धोका असतो.

ब्लड प्रेशर आणि कोलेस्ट्रॉलमुळे मेंदूच्या नसांना सूज येण्याचा धोका असतो. या वेळी शरीर तुम्हाला नेमके कोणते संकेत देतो ते तुम्ही जाणून घेतलं पाहिजे. याकडे दुर्लक्ष झाल्यास रूग्णाचा जीवही जाण्याची वेळ येऊ शकते.

डोकेदुखी

जर तुम्हाला अचानक तीव्र डोकेदुखी होत असेल तर हे मेंदूंच्या नसांना सूज आल्याचे संकेत असू शकतात. जर तुम्हाला हा त्रास जाणवत असेल तर वेळीच डॉक्टरांची मदत घ्या.

झोपेच्या समस्या

रात्री चांगली आणि शांत झोप न लागणं हे देखील डोक्याच्या नसांना सूज येण्याचं एक लक्षण मानलं जातं. रात्रीच्या वेळेस जर तुम्हाला शांत झोप घेण्यास त्रास होत असेल किंवा रात्री सतत झोपमोड होत असेल तर याकडे दुर्लक्ष करू नये.

मान आखडणं

अनेकदा आपल्याला मान आखडल्याचा त्रास होतो. जर तुम्ही हे सामान्य समजून याकडे दुर्लक्ष केलं तर ते महागात पडू शकतं. याचं कारण म्हणजे हे मेंदूच्या नसांना सूज येण्याचं लक्षण असू शकतं. त्यामुळे याकडे दुर्लक्ष करू नये.

धुसर दिसणं

एखादी गोष्ट डबल दिसणं किंवा धुसर दिसण्याचा त्रास होत असेल तर वेळीच डॉक्टरांची मदत घेणं तुमच्यासाठी फायद्याचं ठरणार आहे. कारण हे देखील मेंदूच्या नसांना सूज आल्याचं लक्षण मानलं जातं.

उलटी होणं

कोणत्याही कारणाशिवाय जर तुम्हाला उल्टी होत असेल तर डोक्याच्या नसांना सूज आल्याची शक्यता आहे. त्यामुळे जर तुम्हाला हा त्रास होत असेल तर वेळीच डॉक्टरांची मदत घेणं फायद्याचं ठरणार आहे.

डिस्क्लेमर : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांना देत आहोत. आम्ही याचं समर्थन अथवा दावा करत नाही. कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानंच घ्यावीत

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Traffic Fine : वाहतूक नियम मोडणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी; थकीत ई-चलन वीज बिलातून वसुल होणार

Maharashtra News Live Update: २ तारखेच्या सीजेपीच्या आंदोलनाला आमचा पाठिंबा- उद्धव ठाकरे

Raj thackeray: ठाकरे बंधूंचा एल्गार! ४ ऑक्टोबरचा संयुक्त मोर्चा कुठून कुठपर्यंत निघणार? राज ठाकरेंनी सर्वकाही सांगितलं

Sarkari Yojana: ट्रॅक्टर घेणाऱ्या शेतकऱ्यांसाठी खुशखबर! सरकारकडून मिळू शकते 50% पर्यंत मदत

Eco-Friendly Nirmalya Collection: गणेशभक्तीला पर्यावरण संवर्धनाची जोड; गिरगाव चौपाटीवर श्रीसदस्यांकडून निर्माल्य संकलन

SCROLL FOR NEXT