Raw Mango Benefits Saam Tv
लाईफस्टाईल

Raw Mango Benefits: उन्हाळ्यात खा आंबट-गोड कैरी; उष्माघातापासून होईल संरक्षण

Benefits of Eating Raw Mango (Kaccha Amba): कच्ची कैरी ही कडक उष्णतेवर मात करण्यासाठी फायदेशीर आहे. कैरीचे पन्ह बहुतेकदा उन्हाळ्याच्या हंगामात लोक अधिक प्रमाणात सेवन करतात. कच्ची कैरी उष्माघात टाळण्यासाठी उपयुक्त आहे.

Manasvi Choudhary

Kaccha Amba (Kairi) Benefits:

उन्हाळा सुरू झाला की वेध लागतात ते म्हणजे आंबे, करवंद आणि जांभूळ खाण्याचे. या महिन्यात सर्वत्र आंबे पाहायला मिळतात. या ऋतूमध्ये बाजारात देखील आंब्याला मोठी मागणी असते.

कडाक्याच्या उन्हाळ्यात कैरीपासून विविध पदार्थ बनवून खाल्ले जातात. जेवणासोबत लोणचे, कॅन्डी, मुरंबा, कैरी मसाला अशा अनेक पदार्थांची चव चाखायला मिळते. कच्ची कैरी ही कडक उष्णतेवर मात करण्यासाठी फायदेशीर आहे. कैरीचे पन्ह बहुतेकदा उन्हाळ्याच्या हंगामात लोक अधिक प्रमाणात सेवन करतात. कच्ची कैरी उष्माघात टाळण्यासाठी उपयुक्त आहे.

कच्च्या कैरीचे फायदे:

1. रोगप्रतिकारशक्ती मजबूत होते

कैरीमध्ये व्हिटॅमिन सी असते. व्हिटॅमिन सीमुळे रोगप्रतिकारशक्ती मजबूत होण्यास मदत होते. यामुळे उन्हाळ्यात तुम्हाला जर थकवा जाणवत असेल तर कैरीचे सेवन करणे फायदेशीर ठरेल.

2. उष्माघातापासून संरक्षण

कैरी खाल्ल्याने उष्माघातापासून संरक्षण होते. कडाक्याच्या उन्हात तुम्ही कैरीचं पन्ह प्यायल्याने शरीरातील उष्णता कमी होते. तसेच शरीराचे डिहायड्रेशनपासून बचाव होण्यास मदत होते.

3. पचनक्रिया सुधारते

कैरी खाल्ल्याने पचनक्रिया सुधारते. अपचन आणि बध्दकोष्ठता यांसारख्या समस्या जाणवत असतील तर तुम्ही कैरी खा.

4. साखरेची पातळी नियंत्रित करते

इतर फळांच्या तुलनेने कच्ची कैरीमध्ये साखर कमी असते. त्यामुळे मधुमेह असणाऱ्यांनी कच्ची कैरी खाणे फायदेशीर आहे.

5. हृदय निरोगी ठेवण्यासाठी उपयुक्त:

आंब्यामध्ये पोटॅशियम आणि मॅग्नेशियम सारखे आवश्यक पोषक घटक असतात, हे एक सुपर अँटिऑक्सिडेंट आहे, जे हृदय व रक्तप्रवाह सुरळीत ठेवण्यास मदत करतात.

6. कॅन्सरचा धोका कमी होतो

कच्च्या कैरीमध्ये असलेल्या पॉलिफेनॉलमुळे हे फळ कॅन्सरसारख्या धोकादायक आजाराशीही लढू शकते. कच्च्या आंब्यामध्ये कार्सिनोजेनिक गुणधर्म असतात, जे ऑक्सिडेटिव्ह तणावापासून संरक्षण करतात.

डिस्क्लेमर:

सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: सरकारने काढलेला जीआर वादग्रस्त - छगन भुजबळ

Maharashtra Politics: योगेश कदम का? मग नितेश राणे फेल झाले का? – विनायक राऊतांनी डिवचले|VIDEO

Nashik Tourism: मालेगावपासून 80 किमी दूर आहे 'हे' शांत आणि थंड ठिकाण; नक्की भेट द्या

Apollo Tyres टीम इंडियाचे नवे स्पॉन्सर, ड्रीम ११ पेक्षा जास्त पैसे देऊन केला करार

Milk Rate: सर्वसामान्यांसाठी आनंदाची बातमी; दूध, तूप, लोणी झालं स्वस्त; जाणून घ्या नवे दर

SCROLL FOR NEXT