high cholesterol symptoms google
लाईफस्टाईल

High Cholesterol: जेवण गिळताना त्रास होतोय? कोलेस्टेरॉलचं प्रमाण वाढलं तर नाही ना? जाणून घ्या लक्षणं

Silent Killer: जेवण गिळताना त्रास, डोळ्यांवर पिवळे डाग आणि हातपाय मुंग्या येणे ही वाढलेल्या कोलेस्टेरॉलची लक्षणे असू शकतात. वेळेत तपासणी गरजेची आहे.

Sakshi Sunil Jadhav

कोलेस्टेरॉल हा प्रत्येक व्यक्तीच्या शरीरातल्या पेशींमध्ये वाढणारा पदार्थ आहे. जेव्हा याचं प्रमाण वाढतं तेव्हा हृदयविकार आणि स्ट्रोकचा धोकाही वाढतो. पण याची लक्षणे खूप कॉमन असतात. त्यामुळे हा आजार ओळखणं कठीण होतं. म्हणूनच डॉक्टर याला सायलेंट किलर असं म्हणतात. यामध्ये जास्त प्रमाणात आढळणारं लक्षण म्हणजे जेवण गिळताना अचानक घशाला त्रास होणे. पुढे आपण यासंबंधित संपूर्ण लक्षणे जाणून घेणार आहोत.

कोलेस्टेरॉलची लक्षणे

जेव्हा घशात अन्न गिळताना त्रास होतो तेव्हा शरीरातले काही बदल कारणीभूत असतात. चेहरा आणि घशाला रक्तपुरवठा करणाऱ्या धमन्यांमध्ये चरबीचा थर साचल्यामुळे बोलताना किंवा चघळताना त्रास होतो. इतकंच नाही तर थकवा, दम लागणं किंवा श्वास घेताना त्रास जाणवत असेल, तर हा कोलेस्टेरॉल वाढण्याचा इशारा आहे.

डोळ्यांच्या बाजूला पिवळसर डाग येणे

अचानक झोपेतून उठल्यावर डोळ्यांच्या आजूबाजूला पिवळ्या रंगाचे डाग दिसत असतील तर हे कोलेस्टेरॉल वाढण्याचं लक्षण असू शकतं. डोळ्यांच्या पापण्यांवर किंवा आजूबाजूला छोटे पिवळे किंवा सपाट डाग दिसले, तर ते त्वचेखाली साचलेला फॅट असू शकतो. याने त्रास होत नसला तरी रक्तात खराब कोलेस्टेरॉल किंवा ट्रायग्लिसराइड्सचे प्रमाण जास्त असल्याचं लक्षण असू शकतं.

डोळ्याच्या बाजूला पांढरी रेघ दिसणे

डोळ्यांच्या बाजूला जर पांढरी किंवा करडी वर्तुळाकार रेघ दिसत असेल. यात जर तुम्ही ४५ वर्षापेक्षा कमी वयाचे असाल तर हे खूप गंभीर लक्षण असू शकतं. कारण वय वाढल्यावर ही समस्या जाणवते. जर हे कारण नसेल तर तुमच्या कोलेस्टेरॉल वाढलेला आहे.

हातापायावर मुंग्या येणे

हातपायांत वारंवार मुंग्या येणं किंवा बधिरपणा जाणवणं हे लक्षण दुर्लक्षित करू नका. वाईट कोलेस्टेरॉल वाढल्यामुळे लहान रक्तवाहिन्यांचा आकार वाढते आणि रक्तपुरवठाही कमी होतो. त्यामुळे हात किंवा पायांमध्ये टोचल्यासारखं वाटतं, मुंग्या येतात किंवा सुन्नपणा जाणवतो. यामागे इतर कारणं असू शकतात, पण स्पष्ट कारण नसताना अशी लक्षणं जाणवत असतील तर कोलेस्टेरॉल तपासून घ्या.

टीप : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Hair Care: लांब घनदाट आणि शाईनी केस पाहिजेत? मग आजीने सांगितलेला हा नुस्खा नक्की करा ट्राय

महापालिका निवडणुकीत हलगर्जीपणा; 1200 कर्मचाऱ्यांना नोटिस|VIDEO

Blouse Designs: सिल्कच्या साड्यांवर उठून दिसतील हे 5 ब्लाऊज प्रकार, तुम्हीही ट्राय करा

Maharashtra Live News Update: मुंबईतील भाजप उमेदवाराचा अर्ज रद्द करण्याची मागणी, अनधिकृत बांधकामाचा आरोप

Pune: शिवसेना काँग्रेसला विकली, शाखाप्रमुखाचं उद्धव ठाकरेंना जळजळीत पत्र; तिकीट कापल्यानं कार्यकर्त्यानंही दिला भाजपला शाप

SCROLL FOR NEXT