Fatty Liver saam tv
लाईफस्टाईल

Fatty Liver: लिव्हरवर फॅट्स जमा होऊन सूज आलीये? रोज प्या ही ३ ड्रिंक्स, काही दिवसातच वितळून जाईल चरबी

Liver Detox Juice: फॅटी लिव्हरचा त्रास कमी करण्यासाठी बीटरूट ज्यूस, कॉफी आणि ग्रीन टी कसे फायदेशीर ठरू शकतात? तज्ज्ञ डॉ. सौरभ सेठी यांनी सांगितलेले हे ड्रिंक्स, योग्य आहार आणि जीवनशैलीतील बदलांसह लिव्हरचं आरोग्य सुधारण्यास मदत करू शकतात.

Surabhi Jayashree Jagdish

आजकाल फॅटी लिव्हरचा त्रास अनेकांमध्ये वाढताना दिसतोय. चुकीच्या खाण्यापिण्याच्या सवयी, कमी शारीरिक हालचाल आणि वाढलेलं वजन यामुळे ही समस्या अधिक आढळते. अशा वेळी योग्य आहार आणि जीवनशैलीत बदल करणं खूप महत्त्वाचं ठरतं. तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, जर तुम्ही आहारात योग्य ते बदल केले तर फॅटी लिव्हरचा त्रास कमी होण्यास मदत होते.

नुकतंच AIIMS, हार्वर्ड आणि स्टॅनफोर्डमध्ये प्रशिक्षण घेतलेले गॅस्ट्रोएन्टेरोलॉजिस्ट डॉ. सौरभ सेठी यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडीओ शेअर केलाय. यामध्ये त्यांनी फॅटी लिव्हरच्या रूग्णांसाठी काही खास डिंक्सची माहिती दिली आहे. हे ड्रिंक्स कोणते आहे ते पाहूयात.

बीटरूटचा ज्यूस

डॉ. सेठी यांच्या मते, बीटरूटच्या ज्यूसमध्ये नायट्रेट्स आणि अँटीऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात. हे घटक लिव्हरच्या आरोग्यासाठी फायदेशीर मानले जातात. बीटरूटमध्ये 'बेटालेन्स' नावाचे प्रभावी अँटीऑक्सिडंट असतं जे लिव्हरच्या पेशींना होणारं नुकसान कमी करण्यास मदत करू शकतं.

त्याचप्रमाणे लिव्हरमध्ये अतिरिक्त चरबी साचणं कमी करण्यासही त्याचा फायदा होऊ शकतो. लिव्हरमधील सूज आणि ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस कमी करण्यातही हा ज्यूस मदत करू शकतो. त्यामुळे लिव्हरचं काम अधिक चांगल्या पद्धतीने होण्यास मदत मिळू शकते.

कॉफी

अनेक संशोधनांमध्ये असं आढळलंय की, नियमित प्रमाणात कॉफी पिणाऱ्या लोकांमध्ये फॅटी लिव्हर आणि इतर काही लिव्हरच्या आजारांचा धोका कमी असू शकतो. डॉ. सेठी सांगतात की, कॉफी लिव्हरमध्ये साचलेली चरबी कमी करण्यास मदत करू शकते.

तसंच लिव्हरची सूज कमी करणं, लिव्हर एन्झाइम्समध्ये सुधारणा करणं आणि लिव्हरचं कार्य अधिक चांगलं ठेवणं यासाठीही तिचा फायदा होऊ शकतो. एवढंच नाही तर सिरोसिस आणि लिव्हर कॅन्सरसारख्या गंभीर आजारांचा धोका कमी करण्यासही कॉफी उपयुक्त ठरू शकते.

ग्रीन टी

ग्रीन टीमध्ये 'कॅटेचिन्स' नावाचं अँटीऑक्सिडंट भरपूर प्रमाणात असतात. डॉ. सेठी यांच्या म्हणण्यानुसार, ग्रीन टीमुळे लिव्हरमध्ये चरबी साचण्याचं प्रमाण कमी होण्यास मदत मिळू शकते. याशिवाय लिव्हर एन्झाइम्समध्ये सुधारणा होऊ शकते. तिच्या सूज कमी करणाऱ्या गुणधर्मांमुळे लिव्हरला पुढील नुकसान होण्यापासून संरक्षण मिळण्यास मदत होऊ शकतं. त्यामुळे नियमितपणे ग्रीन टीचं सेवन केल्यास फॅटी लिव्हर नियंत्रणात ठेवण्यास मदत मिळू शकते.

फक्त ड्रिंक्सवर अवलंबून राहू नका

  • ट्रान्स फॅट आणि सॅच्युरेटेड फॅट असलेले पदार्थ शक्य तितके टाळा

  • जास्त साखर आणि मैद्यापासून तयार होणारे पदार्थ कमी खा

  • संपूर्ण धान्ये, ताजी फळे आणि हिरव्या पालेभाज्यांचा आहारात अधिक समावेश करा.

  • दिवसभर पुरेसे पाणी पिण्याची सवय ठेवा

टीप : ही माहिती सर्वसाधारण माहितीसाठी आहे. कोणताही वैद्यकीय सल्ला घेण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

आता लाडक्या मुलींना 2 हजार मिळणार, GEN Z तरुणींना आता पॉकेट मनी

Fact Check: तुकाराम मुंढेंची राजस्थानात बदली? FDA आयुक्तपदावरून मुंढेंची उचलबांगडी?

फ्लॅटच्या मेंटेनन्सवर लागतो जीएसटी, पण कधी? जाणून घ्या हाऊसिंग सोसायटीचा नियम; तुमच्यावर किती पडणार फरक?

Crime News : कॅन्सरच्या बनावट औषधांच्या रॅकेटचा पर्दाफाश, १८ आरोपींच्या आवळल्या मुसक्या; दिल्ली-मुंबई-नवी मुंबईपर्यंत कनेक्शन

रिक्षावाल्या भैय्यांची मराठीची परीक्षा सुरू, RTOचा मराठी न बोलणाऱ्यांवर कारवाईचा धडाका

SCROLL FOR NEXT